जाणून घ्या डेंग्यूची लक्षणे काय आहेत ? आणि करा हे उपचार | Dengue Chi Lakhane

पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यातही थंडी वाढल्यावर डेंग्यूचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. तो एडिस नावाच्या मच्छरांच्या चावल्याने होतो. डेंग्यूचा आजार हा 4  प्रकारच्या (DENV-१, (DENV-१, , DENV-3) व्हायरस मुळे होतो. जे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करू शकतात. भारतात पावसाळ्यात आणि नंतर म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या दरम्यान डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ होते.
डेंग्यूची लक्षणे डास चावल्यानंतर साधारणपणे 4 ते 10 दिवसांमध्ये दिसायला लागतात. या लक्षणांबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. डेंग्यूची लक्षणे काय आहेत आणि त्यावर काय उपचार आपण केले पाहिजेत ते आपण या लेखामधून बघणार आहोत.

सुरुवातीला आपण बघू डेंग्यू म्हणजे नेमकं काय असतं.

डेंग्यूची लक्षणे काय आहेत ? आणि करा हे उपचार

डेंग्यू म्हणजे नेमकं काय ?

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या मार्फत होणारा एक आजार आहे. प्रामुख्याने एडिस इजिप्ती या मच्छरांच्या प्रजाती पासून डेंग्यू पसरतो. डेंग्यूला हाड मोडून काढणारा ताप (Bone brake fever) असेही म्हणतात. या तापामुळे काहींना हाडे आणि स्नायूंमध्ये खूप दुखते. डेंग्यूचे निदान NsI, IgM, IgG या रक्ताच्या ताज्यांद्वारे केले जाते. खाली आपण डेंग्यूची प्रमुख लक्षणे कोणती असतात ते बघू.

डेंग्यूची लक्षणे कोणती आहेत ?

डेंग्यू तापाचे दोन प्रकार आहेत –
1) Dengue fever (DF)
2) Dengue Hemorrhagic Fever (DHF)
डेंग्यूची लक्षणे खालील प्रमाणे –

⇒ डेंग्यूमध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. खूप जास्त ताप डेंग्यू मध्ये येतो.
⇒ तसेच डोकेदुखी भरपूर प्रमाणात होते. विशेषतः कपाळाच्या भागामध्ये डोकेदुखी होते.
⇒ मळमळ तसेच उलटीही होते.
⇒ अंगावर सूज आणि चट्टे येतात.
⇒ खूप तापामुळे रुग्णाला थकवा कमजोरी जाणवते आणि चक्करही येऊ शकतात.
⇒ डेंग्यू मध्ये डोळ्यांच्या मागे वेदना होणे हे लक्षण देखील दिसू शकते, यामध्ये रुग्णाच्या डोळ्याच्या मागे खूप वेदना होतात. डोळे           उघडझाप करताना वेदना होतात.
⇒ डेंग्यूच्या संक्रमणामुळे त्वचेवर लालसर पुरळ उठतात हे पुरळ पूर्ण शरीरावर पसरलेले असू शकतात आणि त्यामध्ये खाज येऊ           शकते.
⇒ रुग्णाला काही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे शरीरात पोषण तत्वाची कमतरता निर्माण होते.
⇒ दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे म्हणजे DHF मुळे तापा सोबत रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
⇒ सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होते.
⇒ नंतर शरीरावर पुरळ येतात, नाकातून किंवा हिरड्यातून, लघवीद्वारे रक्तस्त्राव होऊ शकतो. ही लक्षणे दिसू शकतात.
सतत तहान लागणे हे लक्षण आहे डेंग्यूमध्ये दिसू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डास चावल्यानंतर साधारणपणे 4 ते 10 दिवसांमध्ये लक्षणे दिसू लागतात. आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत ती लक्षणे कायम असतात. लवकर उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या मेंदू फुफ्फुस तसेच किडनीवरही परिणाम होऊ शकतो. तसेच व्यक्तीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे लक्षणे ओळखून वेळीच त्यावर उपचार घेणे गरजेचे असते. जर तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटून त्यावर योग्य उपचार करून घेतले पाहिजेत.

डेंग्यू वर उपचार काय आहेत ?

आतापर्यंत ही डेंग्यूवर कोणतेही ठराविक असं औषध उपलब्ध नाही. यावर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये लक्षणं ना आटोक्यात ठेवणे तसेच रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.
ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटॅमॉल सारखी औषधे दिले जातात. उपचारादरम्यान रुग्णाला भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाते. भरपूर विश्रांती ही यावेळी घेणे गरजेचे असते. रुग्णांना साधा आहार घ्यावा असं डॉक्टर सांगतात.
डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट ची संख्या कमी होते. म्हणून प्लेटलेट्स वर लक्ष देणे गरजेचे असते. आपल्या 1 घन मिलिलीटर रक्तामध्ये = 1.5 ते 4.5 लाख प्लेटलेट्स असतात. इतकं याचं प्रमाण असणे गरजेचे असते. हे प्रमाण जर दहा हजारांच्या खाली गेलं तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात.
साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण 3 ते 8 दिवसात बरा होतो.

डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावे ?

डेंग्यू कसे होणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. घरात फ्रिज खाली साचलेलं पाणी, फ्लावर पॉट, पाण्याचे ड्रम याकडे लक्ष द्या. या ठिकाणी खूप दिवस पाणी साचू देऊ नका.
घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवणे ही महत्त्वाचे आहे.
डेंग्यूचे डास सहसा दिवसात जास्त चावतात त्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावं.
घराच्या खिडक्यांना मच्छर न येण्यासाठी जाळी लावावी.
खूप डास झाले असतील, तर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय करावेत.

WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 39 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असावी असा अंदाज आहे.
जगभरात डेंग्यूमुळे जवळपास 25,000 रुग्णांचा मृत्यू होतो.
आणि यातील 70% रुग्ण हे आशियातलेच असतात.

समारोप –

मित्रांनो आज या लेखांमधून आपण डेंग्यू च्या आजाराची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर कोणते उपचार आपण केले पाहिजेत हे बघितले. तर डेंग्यू झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरात डासच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि सुरक्षित राहिले पाहिजे. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top