मित्रानो स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!!!!! कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असणे खूप गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्ट्रोक येण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढलेला असला तरी लोक याला हवे तितके सिरीयसली घेत नाहीत कशामुळे मग घातक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून कॉलेज म्हणजे काय आपले कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे कोणती आहेत हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. तेच आपण या लेखामधून बघणार आहोत. म्हणून लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. चला तर मग सुरुवातीला बघूया कोलेस्ट्रॉल म्हणजे नक्की काय असतं ते.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?
कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तामध्ये असणारा मेणासारखा चिकट पदार्थ असतो. हे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात तयार केले जाते तसेच काही प्रमाणात बाहेरूनही येत असते. कोलेस्ट्रॉल ऐकून आपल्याला ते वाईटच आहे असं वाटतं पण असं नाहीये. शरीरातील अनेक महत्त्वाचे फंक्शन्स हे कोलेस्ट्रॉल करते जसे – हार्मोन्स वाढवण्यासाठी, पचनक्रियेसाठी, विटामिन्स तयार करण्यासाठी अशा विविध कामांसाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा याचे प्रमाण शरीरात जास्त होते तेव्हा समस्या निर्माण होते.
कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात दोन पद्धतींनी बनते. पहिला म्हणजे आपल्या यकृत कोलेस्ट्रॉल तयार करत असतं. आणि दुसरे म्हणजे ॲनिमल फूड जसे चिकन, अंडी, मटन, दूध, दुधाचे पदार्थ, चीज, पनीर इत्यादी मधून आपल्याला शरीराला कोलेस्ट्रॉल हे मिळत असते.
आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल किती असावे ?
आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे लेवल किती असते. हे जाणून घेण्या अगोदर त्यातील फॅक्टर्स बद्दल समजून घेणे गरजेचे आहे तर आपल्याला जेव्हा कोलेस्ट्रॉलची टेस्ट ज्याला लिपीड प्रोफाइल टेस्ट असे म्हणतात. ते बघतो तेव्हा आपल्याला HDL, LDL, ट्रायग्सलीसरोईड, असे terms दिसतात, ते काय असतात ते अगोदर आपण बघू.
तर कोलेस्ट्रॉलचे प्रामुख्याने दोन भाग केले जातात –
1) Good Cholesterol 2) Bad Cholesterol
तर हे गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL.
1) HDL – High Density Lipo Protien
हे शरीरात तयार झालेले Bad Cholesterol कलेक्ट करून यकृताकडे पाठवते. आणि body मधून बाहेर टाकायला मदत करते. म्हणून याला Good Cholesterol म्हणतात. HDL मध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आणि फॅट्स चे प्रमाण कमी असते.
2) LDL – Low Density Lipo Protien
Bad Cholesterol म्हणजे LDL. गाठींच्या स्वरूपात जमा होते. म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते आणि प्रोटीनचे प्रमाण कमी असते.
कोलेस्ट्रॉलचे अजून काही प्रकार म्हणजे VLDL (very low density lipoprotein ) याला very bad cholesterol असेही म्हणतात. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप कमी तर फॅटसचे खूप जास्त असते. आणि अजून एक term असतो ट्रायग्सलीसरोईड जेव्हा आपण आपल्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज घेतो तेव्हा या उरलेल्या कॅलरीज फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवल्या जातात. त्यांनाच ट्रायग्सलीसरोईड म्हणतात
ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यांच्यामध्ये LDL, VHDL आणि ट्रायग्सलीसरोईड हे वाढलेलं असतं आणि HDL कमी झालेलं असतं. म्हणजे Good Cholesterol कमी झालेल्या आणि Bad Cholesterol वाढलेले असतं.
कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी –
डॉक्टरांच्या मते,
LDL(Bad Cholesterol) → 100 mg/dL पेक्षा कमी असले पाहिजे.
जर याचे प्रमाण 130 mg/dL किंवा त्याहून अधिक झाले तर ती सीमारेषा मानली जाते आणि हे 160 mg/dL पेक्षा अधिक झाला तर उच्च कोलेस्ट्रॉल मानले जाते.
HDL (Good Cholesterol) → 60 mg/dL
जर हे प्रमाण 40 mg/dL पेक्षा कमी असेल तर ते खूप कमी मानले जाते. आणि शरीराला नुकसान पोहोचवू लागते.
तर रक्तातील
ट्रायग्सलीसरोईड हे 150 mg/dL → पेक्षा कमी असले पाहिजे.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची सामान्य लक्षणे –
आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर खालील लक्षणे दिसून येतात.
⇒ थोडसं तरी चाललं तरी थकवा जाणवतो किंवा धाप लागते.
⇒ थोडसा चालल्यानंतर किंवा विनाकारणच पाय दुखतात.
⇒ गरजेपेक्षा जास्त घाम येतो.
⇒ सतत वजन वाढते. शरीर जड वाटते.
⇒ डोळे हातांचे तळवे आणि पायांच्या खालचा भाग तांबडा किंवा पिवळसर दिसू लागतो.
⇒ हात पाय थंड पडतात.
⇒ मळमळल्यासारखे वाटते.
⇒ शरीर सुन्न पडते.
⇒ अचानक छातीत दुखायला लागतं.
⇒ उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
वरील लक्षणे दिसून येत असतील तर वेळ न घालवता LDL Cholesterol Test म्हणजेच Force Lipid Test करून घेतली पाहिजे. वर आपण कोलेस्ट्रॉलची लक्षणे बघितली. आता कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते ते बघू.
शरीरात कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते ?
आपण वर बघितले की ॲनिमल फूड मुळे शरीराला कोलेस्ट्रॉल मिळत असते. पण आपण जर ॲनिमल फूडचे सेवन जास्त प्रमाणात केले तर त्यामुळे आपल्या लिव्हर नॉर्मली जेवढे कोलेस्ट्रॉल तयार करतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढते. याचे रक्तातील प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराची रिस्क खूप प्रमाणात वाढते. म्हणून वेळोवेळी कोलेस्ट्रॉल चेक करणे खूप गरजेचे असते.
समारोप –
मित्रांनो आज आपण शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ? कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते ? लक्षणे कोणती आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेतले. तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आणि आणि अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!