आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक जण चिडचिडेपणाच्या समस्येला सामोरे जात असल्याचे आपण बघतो. सततचा ताण, अपूर्ण झोप, इतर आरोग्य विषयक समस्या, स्वतःच्या किंवा इतरांकडून पूर्ण न होणाऱ्या अपेक्षा यासारख्या अनेक कारणामुळे आजकाल चिडचिडेपणा आणि अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. हा राग चिडचिडेपणा फक्त आपल्या मानसिक स्वास्थ्यावरच परिणाम करत नाही तर तो आपल्या नातेसंबंधावर कामाच्या कार्यक्षमतेवर तसेच आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम करत असतो. घरातला एखादा व्यक्ती चिडचिड करत असेल तर घरातलं पूर्ण वातावरणच बिघडून जात आणि ही चिडचिड वाढली, तर संवाद हे वादामध्ये बदलतात. घरातली आणि मनातीलही शांतता नष्ट होते. म्हणून चिडचिडेपणा कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आपण या लेखांमधून बघणार आहोत.
चिडचिडेपणाचे नेमकं कारण ओळखा –
चिडचिडेपणा कमी करण्यासाठी सर्वात आधी त्या मागचं कारण शोधणे गरजेचं आहे. तुम्ही थकलेले आहात का ? कोणत्या गोष्टीचा ताण तुमच्या मनावर येत आहे का ? की इतर कोणते टेन्शन आहे ? असे प्रश्न तुमच्या मनाला विचारा. एकदा चिडचिडेपणाचे कारण समजली की त्यावर उपाय करणे सोपे होते.
चिडचिडेपणा कमी करण्यासाठी उपाय –
1) शांत, खोल श्वास घ्या →
चिडचिड होत असेल तेव्हा सर्वात आधी शांत व्हा. खोल श्वास घ्या. आणि हळूहळू सोडत श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तणाव कमी होतो. आणि मन शांत होते चिडचिड झाल्यावर बोलणे वगैरे थांबवून डोळे बंद करून 1 ते 10 पर्यंत आकडे मोजा यांने लक्ष विचलित होऊन चिडचिड राग शांत होण्यात मदत होते.
2) नियमितपणे व्यायाम करावा →
तुम्ही म्हणाल चिडचिडेपणा आणि व्यायामाचा काय संबंध आहे ? तर नक्कीच संबंध आहे. व्यायाम करताना आपल्या ब्रेन मधून एंडोफ्रिन नावाचे आनंदाची भावना उत्पन्न करणारे हार्मोन सीक्रेट होते. आपल्याला ताजेतवाने आणि सकारात्मक वाटण्यास मदत करते. जास्त काही नाही केले तरी रोज फक्त 20-30 मिनिटे चाललं तरीही फायदा होतो.
3) हेल्दी आहार घ्यावा →
तुमचा आहार तुमच्या मनस्थितीवर खूप परिणाम करतो. जास्त तेलकट मसालेदार पदार्थ तसेच साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार चिडचिड वाढवतो. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या, धान्य आणि प्रोटीन युक्त आहार आपण घेतला पाहिजे. चहा कॉफी किंवा गोड पिण्याचे प्रमाण कमी केलं पाहिजे.
4) मुबलक प्रमाणात झोप घ्या →
झोपेची कमतरता हे चिडचिडेपणा मागील एक महत्त्वाचे कारण असू शकते. झोप पूर्ण न घेतल्यास शरीराला आणि मनाला आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही. आपल्याला दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे आपले शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. झोपण्याच्या आधी टीव्ही मोबाईल आणि अन्य स्क्रीन चा वापर आपण टाळला पाहिजे. कारण यामुळे आपल्याला शांत गाढ झोप लागत नाही.
5) योग आणि ध्यान करावे →
योग आणि ध्यान हे मानसिक शांती मिळवण्याचे प्रभावी मार्ग आहेत. नियमित ध्यान केल्याने मन शांत होते. विचारशक्ती, स्मरणशक्ती सुधारते. आणि चिडचिडेपणा कमी होतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचे ध्यान करू शकता. श्वासांवर लक्ष केंद्रित करून ध्यान केल्याने मन लवकर शांत स्थिर होते.
6) तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत →
तणाव, टेन्शन हे चिडचिडेपणाचे मुख्य कारण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गोष्टीवर तुमच्या नियंत्रण नाही त्याचा जास्त विचार करणे टाळावे. प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा.
7) आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढावा →
आपलं मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या पाहिजेत. वाचन, संगीत ऐकणं, चित्रकला, बागकाम किंवा कोणत्याही तुमच्या आवडीचा छंद असेल त्याला थोडा वेळ तरी देत जा. यामुळे मनाला शांती, समाधान लाभते.
8) आपलं मत, विचार व्यक्त करा →
चिडचिड होण्याचं एक कारण म्हणजे आपण आपले विचार किंवा मनस्थिती इतरांसमोर मांडत नाही. किंवा एखाद्या व्यक्ती पर्यंत आपले मत व्यवस्थित पोहोचत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून आपण आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले पाहिजे पण त्यासोबतच समोरच्याला वाईट वाटणार नाही याचा विचार केला पाहिजे.
जाणून घ्या आत्मविश्वास वाढवण्याच्या सिम्पल टिप्स | How To Increase Self -Confidence (Marathi)
9) सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण ठेवा →
खूप जास्त वेळ इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप बर वेळ घालवल्याने त्यावर दुसऱ्यांच्या आयुष्यातील घटना किंवा गोष्टी बघून आपल्या मनात तुलनेची किंवा नकारात्मक भावना वाढू शकते ज्यामुळे आपली चिडचिड वाढते.
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? आजच करून बघा हे उपाय
10) सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा →
आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्या तितक्याच तात्पुरत्या असतात. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सर्व परिस्थितीत सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न निगेटिव्हिटी दूध ठेवून आनंदी समाधानी राहिलं तर चिडचिड दूर व्हायला मदत होते.
11) संगीत थेरपी चा वापर करा →
चिडचिड होत असेल तेव्हा शांत संगीत किंवा तुमच्या आवडीची गाणी ऐका. हा चिडचिडेपणा कमी करण्याचा सोपा उपाय आहे. संगीत मन शांत आणि प्रसन्न करण्याचे काम करते.
12) छोटे छोटे ब्रेक घ्या →
दिवसभर काम केल्याने शरीर आणि मन थकते. म्हणून मध्ये मध्ये दर दोन-तीन तासांनी दहा पंधरा मिनिटांचे छोटे ब्रेक तुम्ही घेतले पाहिजेत. कोणतेही काम तुम्ही करत असाल तर त्यामध्ये असे ब्रेक घ्यावेत. यावेळेमध्ये तुम्ही आजूबाजूला किंवा घरातच एखादा राऊंड मारू शकता. पाणी पिऊ शकता किंवा एखादं गाणं ऐकू शकता, आपल्या पेट बरोबर काही वेळ घालवू असे केल्याने पुढची कामे करण्यासाठी तुमच्या मध्ये उत्साह येईल आणि चिडचिड होणार नाही.
मानसिक आजार म्हणजे काय | मानसिक आजाराची लक्षणे कशी ओळखाल
13) स्वतःला माफ करा →
अनेक वेळा आपल्याला स्वतःचाच खूप राग येतो. त्यामुळे ही मग आपली चिडचिड होते. आपल्या चुका स्वीकारून त्या परत न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणे आपण थांबवलं पाहिजे. स्वतःला माफ केलं पाहिजे. यामुळे मनावरचा ताण कमी होतो.
14) मदत मागायला संकोच करू नका →
कधीकधी खूप उपाय करूनही तणाव चिडचिडेपणा यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशावेळी मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. सायकॉलॉजिस्ट किंवा समुपदेशक तुमचा प्रॉब्लेम समजून त्यावर योग्य मार्गदर्शन करू शकतात.
समारोप –
चिडचिडेपणा ही आपल्या व्यक्त होण्याची एक भावना आहे. पण तरी ती योग्य पद्धतीने हाताळणे महत्त्वाचं आहे. जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सवयी याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता. चिडचिडेपणा कमी करण्यासाठी वर सांगितलेले प्रभावी उपाय तुमच्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट करून बघा आणि आनंदी तणावरहित जीवन जगायला शिका. तुम्ही स्वतःला शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी जेवढे प्रयत्न कराल तेवढ तुमचा आयुष्य सुखकर बनेल.