जाणून घ्या चेहरा काळा पडण्याची असू शकतात हि कारणे

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!!!!  आपण सुंदर आकर्षक दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते मग ती महिला असो वा पुरुष. पण अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे स्किनच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. चेहरा काळा पडणे हे त्यामधलेच एक आहे. जर तुमचा पण चेहरा पहिल्यापेक्षा अधिक काळा झाला असेल तर त्याची कारणे कोणती असू शकतात. ते आपण या लेखामध्ये बघणार आहोत. त्यासोबत आपला कलर पूर्वीसारखा होण्यासाठी काही टिप्स पण बघणार आहोत.

त्वचेचा काळा होण्याची खूप करणे असू शकतात. त्यामधले सर्वात मोठे आणि कॉमन कारण म्हणजे जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे सूर्याच्या अल्ट्रा वोईलेट किरणांमुळे स्किन टॅन होणे हे आहे. चला तर मग बघूया चेहरा काळा पडण्याची अजून कोणकोणती कारणे असू शकतात ते.

चेहरा काळा पडण्याची कारणे

# चेहरा काळा पडण्याची कारणे –

⇒ काहींमध्ये weight gain , harmonal fluctuations , insulin resistance या कारणामुळे त्वचा काळी होऊ शकते.

⇒ स्वस्त आणि केमिकलयुक्त प्रोडक्टस चा वापर केल्यामुळेही त्वचा काळी पडते. त्यासोबतच स्किनवर रॅशेस, पिगमेंटेशन, पिंपल्स सारखी प्रॉब्लेम्स स्वस्त क्रीम्स वगैरे लावल्यामुळे होऊ शकतात. म्हणून नेहमी चांगल्या आणि हर्बल प्रोडक्टसचिच निवड आपण केली पाहिजे.

⇒ त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळेही स्किन काळी पडू शकते. हेल्थी आणि सुंदर स्किन साठी तुम्हाला एक प्रॉपर असे स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजे.

⇒ एडिसन या रोगामध्ये शरीर हार्मोन बनवणे बंद करते, ज्यामुळे त्वचेचा रंग काळा होऊ शकतो.

⇒ आपण वर बघितल्या प्रमाणे सुर्प्रकाशात जास्त गेल्यामुळे हि त्वचा काळी होऊ शकते.

⇒ हायपरथायरॉडिज्म च्या आजरामुळे पण त्वचेचा रंग काळा होऊ शकतो.

⇒ काही हार्मोनल संबंधित आजारांमुळे पण त्वचा काळी पडू शकते.

⇒ काही जणांची skin हि खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. म्हणून काही स्किन प्रोडक्टस च्या साइड इफेक्टमुळे किंवा पोल्युशन वगैरे च्या इरिटेशन मुळे देखील स्किन काळी पडू शकते.

त्वचा काळी पडण्याची अशी वेगवेगळी कारणे असू शकतात. तुमच्या बाबतीत ते कारण कोणते आहे, ते आधी तुम्ही शोधून काढले पाहिजे. म्हणजे त्यावर तुम्ही उपाय करून आपली स्किन परत पूर्वीसारखी बनवू शकता.  फक्त काळ्या पडलेल्या त्वचेचा कलर सुधारणेच महत्वाचे नाही, तर तो नेहमीसाठी तसाच मेंटेन करणेही तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी काही सवयी तुम्हाला नेहमीसाठी आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारण्याची गरज असते. ते आपण खाली बघू.

तर चेहरा काळा पडण्यापासून बचाव करण्यासाठी करता येतील, असे उपाय आपण खाली बघणार आहोत.

# चेहरा काळा होण्यापासून बचाव करण्यासाठी करा हे उपाय –

1. एखादी चांगली स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो  केली पाहिजे इथे मी काही स्टेप्स सांगत आहे त्या तुम्ही करू शकता. सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर चेहऱ्याला मॉइश्चराइजर जरूर लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे तुम्ही मॉइश्चराइजर निवडू शकता. दुपारी उन्हात जाण्याआधी तुम्हाला सनस्क्रीम हे लावलेच पाहिजे. तुम्ही मेकअप करत असाल तर रात्री मेकअप व्यस्थित रिमूव्ह करून चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून मग एखादे मॉइश्चराइजर किंवा सिरम तुम्ही लावले पाहिजे.

2. चेहऱ्याचा गडद रग कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश जरूर करा. यासाठी तुम्ही आंबट फळे जसे आवळा, संत्री, लिंबू, द्राक्षे, केळी, सफरचंद यासारखी फळे तसेच ब्रोकोली, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश केला पाहिजे.

3. त्यासोबत व्हिटॅमिन सी आपल्या चेहऱ्यावर पण लावणे फायदेशीर ठरते. संत्र्याच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्याच्या पावडरमध्ये दूध किंवा दही मिक्स करून चेहऱ्याला लावा १०-१५ मिनिटे राहू द्या मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्याचा रंग लाईट व्हायला मदत होते.

4. थंडीमध्ये किंवा इतर वेळी चेहरा जर तुम्ही गरम पाण्याने धुवत असाल तर ते आजच थांबवा. चेहऱ्याची स्किन सर्वात जास्त नाजूक असते. गरम पाण्याने चेहरा धुतल्यामुळे तो काळा हि पडू शकतो.

5. चेहऱ्याचा रंग dark होण्यापासून वाचण्यासाठी आपल्या आहारमधून तुम्ही व्हिटॅमिन डी पण घेतले पाहिजे.  व्हिटॅमिन डी त्वचेचं कॅन्सर पासून रक्षण करते आणि सूर्याच्या UV किरणांपासून पण रक्षण करते.

6. त्वचेचा रंग गडद होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही उन्हामध्ये घराबाहेर पडताना स्कार्फ, स्ट्रॉल, छत्री सनकोट सारख्या प्रोटेक्शन चा उपयोग केलाच पाहिजे. त्यासोबत एखादी चांगली सनस्क्रिम लावूनच तुम्ही घराबाहेर पडायला पाहिजे.

7. आपल्या आहारात हेल्थी डाएट चा समावेश करावा. ते म्हणतात ना जस आपण खातो तसेच आपण दिसतो. जंक फूड खाण्यापासून आपण स्वतःला रोकले पाहिजे. त्याऐवजी सिजनल व्हेजिटेबल, फळे, ताजे जेवण असे हेल्थी डाएट घेतले पाहिजे. जेणेकरून सर्व पोषक तत्वे त्यामधून आपल्या शरीराला मिळतील. आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल.

8. आठवड्यातून एकदा स्किन एक्सफॉलिएट जरूर करायला पाहिजे. ज्यामुळे तुमची डेड स्किन निघून जायला मदत होईल. फेस एक्सफॉलिएट करताना तुम्ही त्वचेला जोरजोरात चोळू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. ती अधिक रफ आणि ड्राय होऊ शकते. 

9. चेहऱ्यावर जास्त केमिकल प्रोडक्टस चा वापर आणि फेशियल आणि अन्य ट्रीटमेंट करण्यापासून स्वतःला रोकले पाहिजे. कारण याचा त्यावेळी जरी चांगला परिणाम दिसत असला तरी चेहऱ्याच्या त्वचेवर त्या प्रॉडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सचा विपरीत परिणाम होत असतो. म्हणून त्याऐवजी घरच्या घरी करता येतील असे उपाय तुम्ही करू शकता.  यामुळे आपले पैसे तर वाचतातच शिवाय कोणतेच side effects आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि स्किनला त्याचा फायदाच होतो.

10. जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्यातरी आजाराने ग्रस्त असाल, आणि औषधे सुरु असतील त्यामुळे पण तुमच्या त्वचेचा कलर काळा होऊ शकतो.

जर या उपायांनी तुम्हाला काहीच फरक जाणवत नसेल आणि चेहरा अधिकच काळवंडत असेल तर एखाद्या स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवले पाहिजे. म्हणजे ते योग्य उपचार करू शकतील.

 

समारोप –

तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये सुरवातीला चेहरा काळा पडण्याची कारणे बघितली. नंतर चेहरा काळा होण्यापासून वाचण्याचे काही उपायही बघितले. तुम्ही पण हे उपाय करून बघा. आणि अधिक ब्युटी आणि आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!

1 thought on “जाणून घ्या चेहरा काळा पडण्याची असू शकतात हि कारणे”

  1. Pingback: चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top