चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल | Cheharyavar Barf Lavnyache Fayade

नमस्कार स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!! आपली सुंदर चमकदार त्वचा असावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी वेगवेगळे क्रीम्स, केमिकल युक्त प्रोडक्टचा उपयोग केला जातो. त्यासोबतच घरगुती उपाय केले जातात. बर्फाने चेहरा धुणे किंवा चेहऱ्यावर बर्फ लावणे हा त्यातीलच एक !!!! चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे भरपूर फायदे आहेत. हो !!! अगदी साधा, छोटा बर्फाचा तुकडा तुमची त्वचा सुंदर बनवण्यास मदत करु शकतो. चला तर मग बघूया चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे कोणते फायदे आपल्या त्वचेवर होतात ते.

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे –

१) त्वचा चमकदार बनते –

आपल्या चेहऱ्यावर बर्फान मसाज करून तुम्ही ग्लोइंग चमकदार त्वचा मिळवू शकता. कारण बर्फ लावल्याने त्वचेवरील blood circulation वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. म्हणून जर तुमची स्कीन खूप dull दिसत असेल, तर तुम्ही चेहऱ्यावर बर्फाने मसाज जरूर केला पाहिजे.

२) सुरकुत्या कमी करते –

वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या येत असतील किंवा त्वचा सैल होत चालली असेल, तर बर्फामुळे सुरकुत्या दूर व्हायला मदत होते. बर्फाचे मसाज तुमच्या सुरकुत्या येण्याच्या processला delay करते. म्हणजेच बर्फ तुमचे स्किनला tight करण्याचे काम करते.

३) डार्क सर्कल्स दूर होतात –

आजकाल बहुतेकांना Dark circles समस्या असते. याची कारणे वेगवेगळे असू शकतात. डार्क सर्कल चेहऱ्याची सुंदरताच नष्ट करतात त्यामुळे त्याचे नक्की कारण काय आहे, हे आपल्याला कशामूळे आलेत हे शोधणे गरजेचे आहे. बर्फ लावणे म्हणजे काही जादू नाही, ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल दूर होतील.

कुणाला झोप व्यवस्थित न झाल्यामुळे तर कुणाला काही vitamins च्या कमतरतेमुळे dark circles येत असतात. तुमच्या बाबतीत ते कशामुळे आले आहेत. हे कारण आधी समजले तर त्यावर योग्य ते उपाय करण्यासोबत तुम्ही बर्फाचा उपयोग चेहऱ्यावर केला तर dark circles लवकर दूर व्हायला मदत होते.

४) Open pores कमी करते –

जर तुम्ही पण Open pores च्या समस्येने ग्रसित असाल, तर तुम्ही बर्फाचा उपयोग आपल्या चेहऱ्यावर केला पाहिजे. याच्या नियमित वापराने तुम्ही 30 दिवसांच्या आतच या समस्येपासून मुक्त होऊ शकाल. ते पण कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय !!!!!!

५) Sun burn मुळे irrited झालेली स्कीन relax होते –

बऱ्याच वेळा उन्हातून घरी आल्यावर आपली स्किन लाल होते, स्किन इरिटेट झाल्यासारखे वाटते. तसेच चेहऱ्याची जळजळही होते. अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर बर्फ फिरवू शकता. त्यामुळे तुमची स्किन छान relax होईल. त्वचेला थंडावाही मिळेल. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा परत glowing बनेल. बर्फाचा toner म्हणूनही उपयोग केला जातो. त्यामुळे बर्फ फिरवल्यावर तुमची स्किन हेल्दी दिसायला लागते. म्हणून बर्फ तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर फिरवायला पाहिजे.

६) पिंपल्स ची समस्या प्रॉब्लेम दूर होतो –

तुम्हाला जर पिंपल्स चा त्रास असेल तरी चेहऱ्यावर बर्फ लावल्याने हा त्रास दूर व्हायला मदत होते. त्वचा क्लिअर आणि सुंदर बनण्यास मदत होते.

७) चेहऱ्यावरील सूज कमी होते –

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग सुजलेला दिसतो. बर्फामुळे चेहऱ्यावरील सूज दूर होण्यास मदत होते. आणि चेहरा ताजातवाना दिसतो.

८ ) चेहऱ्यावरील तेल कमी करण्यास मदत करतो –

चेहऱ्यावरील  excess oil कमी करण्याचे काम ही बर्फ करते. त्याचबरोबर चेहऱ्यावर अतिरिक्त तेल येण्यापासूनही रोखते. आणि त्वचेचा natural glow ही कायम ठेवते.

चेहऱ्यावर करतो कसा लावावा –

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे आपण वर बघितले. पण याचा उपयोग कसा करायचा त्याची माहिती असणे जरूरी आहे. ते आता आपण बघू.

⇒ सर्वात आधी तुम्ही ice tray मध्ये किंवा मार्केटमध्ये ice face roller उपलब्ध आहे त्यामध्येही तुम्ही बर्फ बनवू शकता. बर्फ तयार करून घ्या.

⇒मग बर्फाचे cubes घेऊन डायरेक्ट चेहऱ्यावर मसाज न करता एखाद्या रुमाला मध्ये गुंडाळून त्याने चेहऱ्यावर मसाज करावा. जेणेकरून जास्त थंडाव्यामुळे skin ला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही.

⇒ पाच ते दहा मिनिटे बर्फाने हळुवारपणे मसाज करा.

⇒ याच्या नियमित वापराने तुम्हाला व सांगितलेले फायदे आपल्या त्वचेवर बघायला मिळतील.

⇒ जास्त benefits साठी तुम्ही साध्या बर्फाऐवजी पाण्यामध्ये गुलाबाच्या काही पाकळ्या तसेच essential oil  मिक्स करून त्याचे ice cube करून वापरू शकता.  त्यासोबत तुम्ही vitamin e कॅप्सूल ही टाकू शकता. pink  गुलाबाच्या पाकळ्या मुळे चेहऱ्यावर गुलाबी glow येण्यास मदत होईल.

⇒ Oily skin साठी तुम्ही Alovera gel,  टोमॅटोचा रस पाण्यासोबत मिक्स करून त्याच्या cubes चाही वापर करू शकता. यामध्ये काकडीचे कापही टाकू शकता.

⇒या cubes ने मसाज करून झाल्यावर चेहरा वाळू द्यावा. नंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

 

हे पण वाचा :

 

समारोप –

तर आज या पोस्ट मध्ये आपण चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे हे फायदे बघितले. चमकदार त्वचेसाठी हा बर्फाचा मसाज करण्याचा उपाय तुम्ही नक्की करू शकता. उन्हाळ्यामध्ये तर बर्फाचा काही त्रास होणार नाही, उलट थंडावाच मिळेल. पण थंड वातावरणामध्ये बर्फाचा त्रास होत असेल, तर तुम्ही दुहेरी कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून त्याने चेहऱ्यावर मसाज करू शकता, म्हणजे जास्त थंडावा हि जाणवणार नाही, आणि बर्फाचे आपल्या त्वचेला फायदेही मिळतील. तर तुम्ही पण हा उपाय जरूर करून बघा आणि अन्य ब्युटी आणि आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top