मित्रांनो सुंदर गोरा चेहरा असावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी मग महागड्या beauty products चा वापर केला जातो. पण केमिकलयुक्त क्रीम्समुळे चेहरा सुंदर बनण्याऐवजी अजूनच dull बनतो. गोरा चेहरा म्हणजे याचा अर्थ असा नाही की जे खूप जास्त सावळे सावळे आहेत त्यांचा काही लावल्याने उपाय केल्याने चेहरा एकदम गोरा सफेद बनतो. असे नैसर्गिकपणे होणे पॉसिबल नाही. गोरा बनतो म्हणजे आपला पूर्वीचा जो ओरिजनल स्किन कलर आहे, तो परत येण्यास मदत होते. त्यासोबत त्वचा तजेलदार, fresh दिसते. या पोस्टमध्ये आपण चेहरा गोरा कसा करायचा यासाठी करता येतील असे घरगुती उपाय बघणार आहोत.
चेहरा गोरा कसा करायचा ?
आपण सुंदर दिसावे आपली skin गोरी चमकदार दिसावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते पण आजच्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, चुकीचे राहणीमान, pollution यासारख्या अनेक कारणांमुळे त्वचा काळवंडते. Pimples वगैरेचा त्रास बघायला मिळतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि सुंदर glowing त्वचेसाठी सोपे उपाय आता आपण बघू.
1) संत्रीची साल मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ( आपल्याला इथे सुकलेली संत्री ची साल नाही ओलीच साल घ्यायची आहे. म्हणजे संत्री खाऊन झाल्यावर दिसाल आपण काढतो तिच्याच वापर करायचा आहे ) आता या पेस्टमध्ये एक ते दोन चमचे दूध टाका. जेवढे लागेल तेवढे दूध टाकून याची smooth paste तयार करून घ्या. आता यामध्ये एक vitamin E capsule मधले oil टाका. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या. सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुऊन टाका.
तुम्ही संत्र्याची साल दूध न घालता बारीक करून घेतली तर ती आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते.
2)टोमॅटो आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असते. हे त्वचेवर ब्लीचचे काम करते. एक टमाटर बारीक किसणीने किसून घ्या. नंतर त्या मधून टोमॅटोचा रस आता यामध्ये एक ते दोन चमचे बेसन पीठ मिक्स करा आणि चिमूटभर हळद टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. बेसन ही त्वचेसाठी खूप चांगले असते.
हे मिश्रण बोटावर घेऊन चेहऱ्यावर हळुवारपणे circular motion मध्ये पाच मिनिटे मालिश करा. पूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर ते सुकू द्या. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. पहिल्याच वापरात तुम्हाला याचा परिणाम दिसेल.
हा उपाय तुम्ही आठवड्यातूनतीन वेळा करू शकता आणि चेहऱ्यासोबतच हाता पायावर देखील हे वापरू शकता.
3) एक ते दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा एलोवेरा जेल, चार पाच थेंब गुलाब जल घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या. आधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या मग ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटे सुकू द्या मग थोडं पाणी स्प्रे करून १ ते २ मिनिटे हळुवारपणे मसाज करा. मग धुवून टाका. या face pack तुमची त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसायला मदत होईल.
4) फ्रेश एलोवेरा जेल घ्या त्यामध्ये एक चमचा बेसन थोडा मध थोडं हळद मिक्स करा. हे मिश्रण घेऊन चेहऱ्यावर हळुवारपणे मसाज करा. थोड्या वेळाने चेहरा धुऊन टाका.
5) एक ते दोन चमचे दही घ्या यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्या. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा.१० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुऊन टाका.हा उपाय तुम्ही दररोज सात दिवस त्याला काही करू शकता किंवा कुठे फंक्शनला जायचं असेल तर इन्स्टंट ग्लो हवा असेल तेव्हाही करू यामुळे चेहरा उजळायला मदत होते.
समारोप –
मित्रांनो या पोस्टमध्ये आपण चेहरा गोरा कसा करायचा यासाठी काही घरगुती उपाय बघितले. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला जो ओरिजनल कलर आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. तरच natural glow आपल्या चेहऱ्यावर येईल. मग आपण इतर घरगुती उपायांनी चेहरा glowing बनवू शकतो, तुमची काही प्रतिक्रिया असेल तर खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा. अधिक ब्युटी आणि आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!