मित्रांनो, विचार हे सतत आपल्या मनात येत असतात. आपले मन हे दैनंदिन जीवनातील विचारापासून ते जीवनाबद्दल गोड असे अनेक विचार करत असते. संशोधनानुसार साधारण व्यक्तीच्या मनात दिवसभरात 60,000 विचार येत असतात. त्यातले निगेटिव्हच जास्त असतात. त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह वाटतं, थकल्यासारखं वाटतं, मूड ऑफ असतो. तुम्ही चांगले विचार कसे करावे हे वाचण्यासाठी इथे आलात म्हणजे चांगल्या विचारांचे महत्त्व तुम्हाला माहित आहे असे मी समजते.
तर चांगले विचार म्हणजे नक्की काय ? चांगले विचार म्हणजे सकारात्मक, उत्साहवर्धक, मनाला नवी आशा देणारे प्रेरणा देणारे, आत्मविश्वास वाढवणारे असे विचार होत. जे विचार मनाला चांगलं फील करून देतात. ज्यामुळे मनाला हलक वाटतं, रिलॅक्स फिल होतं आनंद होतो, ते चांगले विचार असतात असे आपण म्हणू शकतो.
मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? आजच करून बघा हे उपाय
चांगले विचार कसे करावे ?
मित्रांनो तुमच्या मनात पण जर नकारात्मक वाईट विचार जास्त येत असतील तर याचे कारण म्हणजे तुमच्या मनाला तसे विचार करण्याची सवय झालेली आहे. आणि तुम्ही तसेच खाद्य आपल्या मनाला देत आहात. जसा आपल्या शरीराचा आहार अन्न आहे. तसच आपण दिवसभरात जे काही करतो ते म्हणजे आपल्या मनाचा आहार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आपल्या शरीराला जसे आपण जंक फूड जास्त दिले तर पोट खराब होते, आजार होतात. त्याचप्रमाणे आपण जे ऐकतो, बघतो, करतो ते मनाच खाद्य असतं. जर मनाला आपण निगेटिव्ह, अग्रेसिव्ह, व्हायलेंट असे खाद्य दिले, तर त्यातून पण त्याच प्रकारचे नकारात्मक विचार बाहेर येतील आणि मनही कमजोर बनत जाईल.
म्हणून जाणीवपुर्वक आपल्याला सकारात्मक गोष्टी कराव्या लागणार आहेत. तरच आपले विचारही सकारात्मक होतील. या लेखांमधून मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे त्याचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमचं मन पॉझिटिव्हिटीने भरलेल तुम्हाला दिसेल.
१. आभार मानायला शिका –
दिवसाची सुरुवात ही तर तुम्ही ईश्वर, युनिव्हर्स, देव ज्याला मानता त्याला नवीन दिवसाबद्दल धन्यवाद देऊन केली तर तुमच्या पूर्ण दिवस एका सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. मित्रांनो आभार मानणे ही खूप पावरफुल भावना आहे. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपले vibration किंवा ऊर्जा ही खूप जास्त वाढते.
दिवसभरामधूनही आपल्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण धन्यवाद मानले पाहिजेत. कारण असे खूप लोक आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट एक स्वप्नच आहे जिल्हा तुम्ही काहीच महत्त्व देत नाहीत.
ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याबद्दल आपण नेहमी तक्रार करत असतो, पण असलेल्या गोष्टींबद्दल कधी धन्यवाद करत नाही. हेच आपलं चुकतं… एकदा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करायला लागता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की आभार व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे खूप काही आहे. आणि मग मन ही सकारात्मक विचारांनी भरून जाते.
२. चांगल्या गोष्टींची यादी करा –
तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा. एखाद्या नोटबुक किंवा डायरीमध्ये एखादा कोपरा असा बनवा ज्या मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी लिहू शकता. यामध्ये मग अशा घटना लिहा ज्यामुळे तुम्ही मनापासून खुश झालात. त्यामुळे कितीही छोट्या का असेना. जसे तुम्ही ऑफिसमधून लवकर घरी आलात त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटलं, तुमच्यासाठी पप्पांनी जिलेबी आणली ती खाऊन तुम्हाला आनंद झाला किंवा तुम्हाला जेव्हा सायकल गिफ्ट म्हणून मिळाली तेव्हा खूप आनंद झाला होता. अशा तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या घटना लिहून काढा.
मग नियमितपणे चांगल्या घडणाऱ्या घटना या यादीमध्ये ऍड करत चला. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही यादी वाचा. यामुळे तुमचे मन चांगल्या गोष्टींनी भरून जाईल. आणि मग एकदा ही सवय झाली तर तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे लक्ष देण्याची सवयच होऊन जाते.
३. आपल्या self talk कडे लक्ष द्या –
Self talk म्हणजे आपण जे मनातल्या मनात स्वतः सोबत बोलतो तो संवाद. आपण जगात सर्वात जास्त स्वतः सोबतच बोलत असतो. लहानपणी समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत आपण स्वतःची सातत्याने बोलत असतो. हा संवाद कसा आहे यावर आपला मूड ठरतो. म्हणून आपला स्वतः सोबतचा संवाद हा नेहमी प्रेम पूर्ण, आदरपूर्वक असला पाहिजे. यामुळे आपल्याला चांगले फील होते. आणि आपलं स्वतः सोबत चांगलं रिलेशन असेल तर इतरांसोबत आपोआपच रिलेशन चांगले होत जातात.
जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर तू खूप पावरफुल आहेस तू सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतेस, सर्व परिस्थितीचा धैर्याने सामना करण्याची ताकद तुझ्यात आहे, अशी वाक्य बोलतो तेव्हा तुमचं मन आत्मविश्वासाने भरून जाते. आपण जेव्हा एखादा चांगलं काम करतो तेव्हा इतर कोणी शाबासकी देण्याची वाट बघत बसू नका, स्वतः मनात स्वतःला शाबासकी द्या. वा well done खूप छान काम केलंस तू पुढेही अशी कामे करत रहा.
आपल्याला मनात नकारात्मक संवाद करण्याची सवय झालेली असते त्यामुळे सुरुवातीला थोडे कठीण जाईल. पण जसा तुम्ही जाणीवपूर्वक जास्त वेळ सराव केला. तर स्वतः सोबतच संवाद तुमचा संवाद बनत जाईल, तितके तुम्ही अधिकाधिक सकारात्मक बनत जाल. आणि चांगले विचार तुमच्या मनात येतील.
४. दिवसभर आपण काय बघतो याकडे लक्ष द्या –
मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः सोबत सुसंवाद करत राहिलात चांगले विचार करत राहिलात आणि दिवसभरातून सोशल मीडिया, वेब सिरीज, टीव्ही, मोबाईल वरून नकारात्मक गोष्टी बघत ऐकत राहिला,तरी तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येतच राहतील.
जसे आपण वर बघितले आपण जे दिवसभर करतो ते आपल्या मनाचे अन्न असते. म्हणून मनाला हेल्दी असे अन्न च आपण दिले पाहिजे. म्हणून नकारात्मक गोष्टी बघण्यापासून ऐकण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. असे तुम्ही सुरुवातीला फक्त पंधरा ते वीस दिवस करून बघा. तुमच्या विचारांमध्ये झालेला सकारात्मक बदल तुम्हाला स्पष्ट दिसेल.
५. मनाला सकारात्मक गोष्टी द्या –
जर आपण म्हणतो, नकारात्मक गोष्टींपासून मनाला दूर ठेवा तर मग मनाला काय द्यायचं. तर ज्या गोष्टी मनाला आवडतात अशा गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. यासाठी तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज बघू शकता किंवा चांगली पुस्तके वाचू शकता, निसर्गासोबत काही वेळ घालवू शकता, तुमच्या पेट सोबत थोडा वेळ खेळू शकता या सर्व गोष्टींमुळे मन प्रसन्न होण्यास मदत होईल.
जाणून घ्या आत्मविश्वास वाढवण्याच्या सिम्पल टिप्स | How To Increase Self -Confidence (Marathi)
चांगले विचार रोखणाऱ्या या गोष्टी टाळा –
⇒ जर तुमचा एखादा नकारात्मक बोलणारा किंवा तुमच ज्याच्या सोबत पटत नाही असा मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्याच्यापासून शक्य तेवढे दूर राहा.
⇒ इतरांसोबत स्वतःची तुलना करणे टाळा.
⇒ तुमच्याकडून एखादी चूक झाली तर स्वतःला नेहमी नेहमी दोष देणे टाळा. ती चूक स्वीकारा आणि ती परत न करण्याचे स्वतःला वचन द्या.
⇒ दुसऱ्यांसाठी जगणे टाळा तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा मनमोकळेपणाने जगा.
समारोप –
मित्रांनो आज आपण चांगले विचार कसे करावे हे बघितलं. आपल्या मनात विचार हे येणारच पण ते चांगले म्हणजे सकारात्मक असले तर आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होत असतो. तर तुम्ही पण वर सांगितलेले उपाय करून बघा तुमच्या विचारांमध्ये नक्कीच बदल दिसून येईल .असेच माहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ पुन्हा भेट नक्की द्या.
लेख पुन्हा वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!