हॅलो फ्रेंडस स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र 24 वर !!!! आज या लेखांमधून आपण ब्लड कॅन्सर बद्दल जाणून घेणार आहोत. ब्लड कॅन्सर ज्याला रक्ताचा कर्करोग म्हणतात. हा शरीरातील रक्त निर्मितीच्या प्रक्रियेतील एक गंभीर आजार आहे. हा कर्करोग मुख्यतः रक्तपेशी, बोन मॅरो आणि लिम्फेटिक सिस्टीम वर परिणाम करतो. हा गंभीर आजार असला तरी सुरुवातीलाच लक्षात आला तर आपण त्यातून पूर्ण बरे होऊ शकतो. आज या लेखांमधून आपण ब्लड कॅन्सर होण्यामागची कारणे कोणती असतात ते सुरुवातीला बघू कारण जर तुम्हाला ब्लड कॅन्सर कशामुळे होतो ते माहीत असेल तर तुम्ही तो होण्याआधीच स्वतःला वाचवू शकता. त्यानंतर आपण ब्लड कॅन्सर ची लक्षणे आणि शेवटी ब्लड कॅन्सर पासून वाचण्यासाठी उपायही बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता वळूया लेखाकडे.
ब्लड कॅन्सर कशामुळे होतो ?
ब्लड कॅन्सर होण्याचे नेमके कारण अद्याप करू शकले नसले तरी हा आजार होणे मागे काही महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात. त्या पण खाली बघू.
ब्लड कॅन्सर होण्याची कारणे –
अनुवंशिक कारणे ⇒
१)डीएनए मध्ये बदल – शरीरातील पेशींच्या विभाजन प्रक्रियेमध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास कॅन्सर जन्यपेशी निर्माण होतात. या बिघाडामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढत जातात आणि ब्लड कॅन्सर होऊ शकतो.
२) कौटुंबिक इतिहास – जर कुटुंबातील कुणाला कॅन्सरचा इतिहास असेल तर ब्लड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. काही विशिष्ट अनुवंशिक दोष देखील या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात.
पर्यावरणीय कारणे ⇒
१) रेडिएशन आणि केमिकल्स – खूप जास्त प्रमाणात रेडिएशन च्या संपर्कात आल्यास ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. औद्योगिक ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना केमिकल्स मुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो.
२) प्रदूषण – हवेत असलेल्या विविध विषारी वायूचा आपल्या पेशींवर विपरीत परिणाम होत असतो. म्हणून वायु प्रदूषण देखील कॅन्सरचा रिस्क फॅक्टर ठरू शकते.
धूम्रपान आणि मद्यपान करणे ⇒
सिगरेट आणि तंबाखू मधील निकोटीन हे आपल्या DNA वर विपरीत परिणाम करतात. खूप वर्षे धूम्रपान केल्याने ब्लड कॅन्सर प्रकार असलेल्या ल्युकेमियाचा धोका दुप्पट होतो. मद्यपान देखील शरीरातील अनियंत्रित पेशींच्या वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम करते. म्हणून आपण धूम्रपान आणि मद्यपान टाळले पाहिजे.
प्रतीरक्षा प्रणालीतील बिघाड ⇒
१) ऑटो ईम्यून डिसीज – या आजारामध्ये शरीर स्वतःच्या पेशींवर बाहेरून आलेला शत्रू समजून हल्ला करते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
२) अविकसित रोग प्रतिकारक शक्ती – ज्या व्यक्तीमध्ये लहानपणापासूनच रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते, त्यांना ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.
औषधे आणि उपचार ⇒
१) केमोथेरपी आणि रेडिएशन उपचार – पूर्वी असलेल्या कॅन्सरवर उपचार म्हणून दिले जाणारे केमोथेरपी आणि रेडिएशन मुळे नंतर ब्लड कॅन्सरचा धोका वाढवतात.
२) इम्यूनोप्रसिव्ह औषधे – अंग प्रत्यारोपणानंतर घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या साईड इफेक्ट मुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता असते.
ब्लड कॅन्सर होण्याची कारणे आपण वर बघितली आता आपण ब्लड कॅन्सर झाला वर दिसणारी लक्षणे बघूया.
ब्लड कॅन्सरची लक्षणे | Blood Cancer Symptoms In Marathi
ब्लड कॅन्सर ची प्रमुख लक्षणे खालील प्रमाणे आहेत :
- थकवा आणि अशक्तपणा जाणवणे – अगदी थोडेसे काम केले तरी शरीरातली ऊर्जा संपल्यासारखे वाटणे, शरीरातील लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे असे होते.
- अचानक वजन कमी होणे – रुग्णाचे वजन अचानक कमी होऊ लागते. जे कॅन्सर गंभीर स्टेजमध्ये असल्याचे दर्शवते.
- सांधेदुखी आणि हाडांमध्ये वेदना -हाडांच्या आतील बोन मॅरो प्रभावित झाल्यामुळे सांधे आणि हाडांमध्ये सतत वेदना जाणवतात.
- वारंवार ताप येणे आणि इतर संसर्ग होणे – रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्यामुळे वारंवार ताप येतो तसेच लहान संसर्ग पटकन होतात हे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
- त्वचेवर चट्टे पडणे किंवा रक्तस्त्राव होणे – त्वचेवर कुठेही निळसर किंवा जांभळ्या रंगाचे चट्टे पडतात, रक्तस्राव होतो किंवा जखमा लवकर भरून येत नाहीत यासारखी लक्षणे दिसू शकतात.
- श्वास घेण्यास त्रास होणे – रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींची कमतरता निर्माण झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.
- लिंफ नोडची सूज – गळा, बगल किंवा जागेमध्ये लिंफ नोडस सुजल्याचे जाणवते.
- भूक न लागणे – भूक कमी होते किंवा थोडं खाल्ल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटते.
वरीलपैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे आहे अन्यथा आजारातून बरे होणे कठीण होऊन जाते.
ब्लड कॅन्सर चे प्रकार आता आपण थोडक्यात बघू.
ब्लड कॅन्सर चे मुख्य तीन प्रकार आहेत –
१) ल्युकेमिया – हा कॅन्सर रक्त आणि अस्थिमज्जातील पांढऱ्या रक्त पेशींशी संबंधित आहे. यामध्ये पांढऱ्या रक्त पेशंटची असामान्य वाढ होते ज्यामुळे इतर आरोग्यपूर्ण पेशींची जागा कमी होते.
२) लिम्फोमा – या प्रकारचा कॅन्सर हा लिम्फटिक सिस्टीमशी संबंधित आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या लिंफोसाईट नावाच्या पेशी प्रभावित होतात. त्यामुळे आपली संसर्गांशी लढण्याची क्षमता कमी होते.
३) मायलोमा – हा कॅन्सर प्लाज्मा पेशीमवर होतो. ज्या हे अँटिबोडी तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे ही शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
ब्लड कॅन्सर टाळण्यासाठी करा हे उपाय –
ब्लड कॅन्सर हा आजार कशामुळे होतो याचे नेमके कारण माहित नसल्याने हा आजार पूर्णतः टाळणे शक्य नसले तरी त्याचा धोका कमी करण्यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो.
1. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा –
धूम्रपान आणि मद्यपान आपण टाळले पाहिजे. पौष्टिक आहार घेण्यावर भर दिला पाहिजे. ज्यामध्ये फळे भाज्या प्रोटीन भरपूर प्रमाणात असतील.
2. प्रदूषण टाळले पाहिजे –
वायु प्रदूषण असलेल्या ठिकाणी कमीत कमी वेळ राहिले पाहिजे. शुद्ध हवेत श्वास घेतला पाहिजे.
3. केमिकल्स पासून स्वतःचा बचाव केला पाहिजे –
औद्योगिक ठिकाणी काम करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बेंझिन सारख्या घातक केमिकल पासून दूर राहिले पाहिजे.
4. विषाणू प्रतिबंध केला पाहिजे –
HIV आणि इतर विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
5. नियमित आरोग्य तपासणी करायला हवी –
वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्याने कॅन्सर तसेच इतर आजारांचे लवकर निदान होते.
समारोप –
ब्लड कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे असे असले तरी योग्य माहिती आणि उपचारांच्या आधारे त्याचा सामना करता येतो. ब्लड कॅन्सर कशामुळे होतो ते आपण या लेखाच्या माध्यमातून बघितले आणि ब्लड कॅन्सरची लक्षणे ही बघितली. तूमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!