जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Bit Khanyache Fayde

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण Fit असणे खूप गरजेचे आहे. आपली health, immunity strong नसेल तर वारंवार आपण आजारी पडतो. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारातून रोजच्या जेवणासोबतच फळे आणि पालेभाज्यांच्या समावेश ही जरूर केला पाहिजे. बीट किंवा बीटरूट ज्याला आपण म्हणतो. ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही बीट खाल्ले तरी ते त्याच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. डॉक्टरांकडूनही आपल्याला आहारात बीटाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. या लेखामधून आपण बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे बघणार आहोत त्यासोबतच बीट कोणी खावे आणि कोणी खाऊ नये मीठ खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती ते देखील आपण जाणून घेणार आहोत.

बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बीटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वर्षाच्या बाराही महिने हे मिळते. पण उन्हाळ्यात बीटाचे सेवन जास्त केले जाते. कारण तो खाल्ल्याने थंडावा मिळतो. टेस्टी असण्यासोबतच हे खूप गुणकारी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे‌ कारण यामध्ये विटामिन बी, व्हिटॅमिन सी, आर्यन, पोटॅशियम, नायट्रेट, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचा पूर्ण फायदा आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपण योग्य पद्धतीने याचे सेवन करतो. चला तर मग बघूया बीट खाण्याची योग्य वेळ कोणती असते ते.

बीट खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?

⇒ बीट खाण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळची असते. सकाळी नाश्त्याच्या वेळी तुम्ही सॅलडच्या रूपात बीट घेऊ शकता. बीटाचे बारीक काप करून त्यावर मीठ, चाट मसाला घालून तुम्ही नाश्ता सोबत घेऊ शकता. बीट कच्चे खाणे आवडत नसेल तर तुम्ही एक ग्लास बीटाचा ज्यूस किंवा गाजर आणि बीटाचा ज्यूस मिक्स करून देखील पिऊ शकता. तुम्हाला ज्या स्वरूपात आवडत असेल तसं तुम्ही बीट खाऊ शकता.

⇒ सकाळच्या वेळी बीटाचा रस घेतल्याने दिवसभर आपल्या ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि आपली ओव्हरऑल हेल्थ पण सुधारते.

⇒ पण वेळ अभावी किंवा इतर कारणांमुळे जर सकाळी वीट खाणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पिठाचे सेवन करू शकता कारण ते कधीही खाणे हे चांगलेच आहे.

बीट खाण्याची योग्य पद्धत कोणती ?

⇒ बिट तुम्ही कच्चा शिजवून कसाही खाऊ शकता पण हे तुम्ही कच्चे खाणे जास्त फायद्याचे असते. तुम्हाला कच्चा आवडत नसेल तर तुम्ही बीटाचे काप करून ते एखाद्या डब्यामध्ये ठेवून कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून मग खाऊ शकता.

⇒ तुम्ही मिठाचे पराठे कटलेट भाजी तसेच स्वादिष्ट असा बीटाचा हलवा पण बनवू शकता.

बीट किती प्रमाणात खावे ?

⇒ रोज तुम्ही बीटाचे सेवन करत असाल तर दिवसभरातून एक cup बीटाचा रस पुरेसा आहे. एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन बीट तुम्ही खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त खाणे नुकसानदायक ठरू शकते.

⇒ खास करून लहान मुलांनाही आपण बीट देऊ शकतो. आठ ते दहा महिन्यांच्या बाळाला बीट उकळून ते कुस्करून मीठ वगैरे टाकून खाऊ घालू शकतो. पण लक्षात ठेवा – फक्त एक ते दोन चमचे देण्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू याचे प्रमाण वाढवा यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ॲनिमियाचा धोका कमी होतो.

⇒ बीट मुख्यतः लहान मुले आणि वयस्कर लोकांच्या आहारात जरूर समाविष्ट केले पाहिजे.

चला आता आपण बीट खाण्याचे चमत्कारी फायदे कोणते आहेत ते बघू.

बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

  1. ज्यांना ॲनिमिया चा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर हे एखाद्या वरदानासारखेच आहे. कारण यामध्ये आर्यन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे red blood cells वाढण्यास मदत होते.
  2. बिटमध्ये antioxidants आणि antiaging properties पण खूप असतात. त्यामुळे वाढत्या वयासोबत येणाऱ्या सुरकुत्या आणि डागांपासून आपला बचाव होतो.
  3.  बीट हे रक्ताला पण purify करते आणि dead cells कमी करते. बिट आपली त्वचा चमकदार ठेवण्यामध्येही उपयुक्त आहे. नियमितपणे बिट खाल्ल्याने आपली त्वचा तजेलदार बनते.

  1. बीटामध्ये नायट्रेट नामक तत्व असते, जे ब्लड प्रेशरला कंट्रोल मध्ये ठेवायला मदत करते, म्हणून जर तुम्हाला high blood pressure चा त्रास असेल तर बीटाचे सेवन जरूर केले पाहिजे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोज बीटाच्या रसासोबत गाजरचा रस मिक्स करून त्याचे सेवन केल्याने हाय बीपी मध्ये फायदा होतो.
  2. बीमध्ये बीटेन नामक तत्व असते, जे लिव्हर मधील toxin दूर करायला मदत करते. परिणामी लिव्हरची कार्यक्षमता सुधारते.
  3. तुम्ही वजन कमी करत असाल ,तर बीट तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यासोबत पिठामध्ये फायबर नाईट रेट विटामिन सी सारखे पोषक तत्व असतात जे आपलं बेली फॅट कमी करण्यामध्ये खूप फायद्याचे असतात. तसेच विटा मध्ये पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला खूप वेळ भूक पण लागत नाही.
  4. बीट रूट मध्ये काही केमिकल असतात. जे आपल्या मेमरी साठी आणि ब्रेन हेल्थसाठी चांगले मानले जातात. म्हणून बीटाच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती ही सुधारते.
  5. विद्या मध्ये अँटिफ्लेमेटरी प्रॉपर्टीज पण असतात म्हणून तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल किंवा कोणत्या इन्फेक्शन झालं असेल तर तेही बीटामुळे दूर होतं.
  6. बीटच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. आणि शरीरातील रक्ताची कमी दूर करण्यात मदत करते.
  7. बीट हे आपल्या केसांसाठी पण खूप फायदेशीर आहे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही बीटाच्या ज्यूसचे सेवन जरूर केले पाहिजे.
  8. बीट हे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. म्हणून जसं जमेल तसं आपल्या आहारात बीटाचा समावेश केला पाहिजे.

बीट खाण्याचे नुकसान –

बिट खाण्याचे खूप फायदे जरी असले तरी ते सर्वांसाठीच फायद्याचे नाहीत. बिट जास्त प्रमाणात खाल्ले आणि काही आजार असणाऱ्यांनी जर बिट खाल्ले तर ते नुकसानदायक ठरू शकते.चला तर मग बघूया बीटमुळे होणारे दुष्परिणाम

  1. जास्त प्रमाणात बिट खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकता.
  2. जास्त बिट खाल्याने यकृतासाठीही धोकादायक ठरू शकते.
  3. जास्त प्रमाणात बिट खाल्ल्याने कॅल्शियमचा लेवलही कमी होऊ शकते.
  4. बीटमध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकते म्हणून जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर बीटरूट खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
  5. गर्भवती महिलांनी बिट कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.
  6. ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी बिट खाणे टाळले पाहिजे.
  7. हाय ब्लड शुगर असणाऱ्यांनी बिट खाणे टाळले पाहिजे.
  8. जास्त बीटच्या सेवनाने थकवा, चक्कर येणे यासारख्या सस्य उद्भवू शकता.

समारोप –

तर आज आपण बिट खाण्याचे भरपूर आरोग्यदायी फायदे बघितले म्हणून तुम्ही लठ्ठ असाल तर वजन कमी करण्यासाठी आणि बारीक जरी असाल तरी चांगल्या आरोग्यासाठी बीटाचे सेवन हे केले पाहिजे. मला खात्री आहे, बीटाचे इतके सारे फायदे वाचून तुम्ही सुद्धा याचे सेवन नक्की सुरू कराल.त्यासोबतच बिट खाल्ल्याने होणारे नुकसानही आपण बघितले म्हणून जर तुम्हाला यातला कोणता त्रास असेल तर बीटापासून दूर राहिलेलेच चांगले आहे. चला तर मग पुन्हा भेटू लवकरच !!!!

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

 

Frequently Asked Questions (FAQs)

Q1. मी रात्री बीट खाऊ शकतो का?

Ans – तुम्ही रात्री देखील बिट खाऊ शकता. रात्री बीटचा रस पिल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते. एका अभ्यासात असे दिसून आले होते CPOD चे जे रुग्ण रात्री झोपण्याआधी बीटरूटचा रस पिट होते. त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारलेली दिसून आली.

Q2. मी रोज बीटरूट खाऊ शकतो का?

Ansतुम्ही रोज बीटरूट खाऊ शकता. पण ते प्रमाणात खाल्ले पाहिजे कारण जास्त प्रमाणात बिट खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, ऍलर्जीची समस्या होऊ शकते.

Q3. बीट खाल्ल्याने वजन वाढते का?

Ans – बिट खाल्ल्याने अजिबात वजन वाढत नाही. उलट वेट लॉस मध्ये बिट खाणे फायद्याचे ठरते. कारण यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे खूप वेळपर्यंत भूक लागत नाही.

Q4. बीटरूट कोणी टाळावे?

Ans – किडनी स्टोन किंवा मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी बिट खाणे टाळले पाहिजे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top