बाळंतपणानंतर आई आणि बाळ दोघेही निरोगी आणि हेल्दी राहावे, अशी आईची आणि पूर्ण फॅमिली ची इच्छा असते. बाळंतपण झाल्यानंतर आईची प्रकृती नाजूक असते. या काळात तिला पोषक आहाराची आणि आरामाची गरज असते. ज्यामुळे शरीराची झालेली लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते. यासोबतच योग्य आहार घेणे ही महत्त्वाचे असते. बाळाच्या जन्मानंतर एक ते दीड वर्ष बाळ हे आईच्या दुधावर अवलंबून असते आणि आईचं दूध हे बाळासाठी अमृता सारखं असत. म्हणून कमीत कमी एक वर्ष तरी बाळाला आईच दूध हे मिळालेच पाहिजे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तब्येत सुदृढ बनायला मदत होते. या लेखामध्ये बाळंतिणीच्या आहारात असायलाच हवेत असे पौष्टिक पदार्थ कोणते आहेत ते बघणार आहोत.
बाळंतिणीने दर दोन तासांनी काहीतरी खाल्लं पाहिजे असा सल्ला डॉक्टर देतात. कारण बाळ दूध पित असल्यामुळे आईला कमजोरी येऊ नये आणि प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स युक्त आहार आईच्या पोटात गेल्यामुळे आई आणि बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींचा बाळाला त्रास होईल असे पदार्थ घेणे टाळले पाहिजे.
# बाळंतिणीने आहारातून घ्यायलाच हवे हे पदार्थ –
1. शतावरी दुधा सोबत घेतल्याने कारण आईला दूध व्यवस्थित येण्यास मदत होते.
2. गव्हाच्या पिठाचा शिरा नियमितपणे नाश्त्यामध्ये घ्यावा. भरपूर तुपामध्ये गव्हाचे पीठ घालून मग गुळ घालून हा शिरा बनवावा. यात ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता. यामुळे भरपूर एनर्जी मिळते.
3. बाजरीचे सूप पिणे ही खूप चांगले असते. हे सूप बनवण्यासाठी बाजरीचे पीठ भाजून या पिठामध्ये पाणी टाकून त्याचं मिश्रण बनवा. मग कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये हळद, जिरं, कडीपत्ता, मिठ, लसूण टाकून फोडणी द्या. त्यामध्ये पिठाचे मिश्रण घालून याची चांगली उकळी काढून घ्या. थोडासा घट्टसर झाल्यावर हे सुप तयार आहे. हे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता.
4. नाचणी सत्वाच्या तसेच खसखशीच्या खिरीचा आहारात समावेश करणे ही खूप फायद्याचे ठरते.
5. अळीवाची खीरही उत्तम असते. पण ही बाळंतपणा शनंतर दोन महिन्यांनी सुरू केली पाहिजे.
6. दोडका, दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, कोबी, मेथी, शेपू, पालक यांच्या पातळ भाज्या बनवून त्यांचा रोजच्या जेवणात समावेश केला पाहिजे.
7. आईच्या दुधात पाणी हे 70 टक्के असते. त्यामुळे या काळात शरीराला पाण्याची खूप गरज असते. म्हणून पाणी भरपूर प्रमाणात पिले पाहिजे.
8. डिंकाचे लाडू ही जरूर खाल्ले पाहिजेत. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, खारका सारखे ड्रायफ्रुटस ऍड केले पाहिजे आणि भरपूर तूप घालून बनवलेले लाडू खाणे फायद्याचे असते.
9. बाळंतपणानंतर पहिले दहा दिवस फळांचे सेवन करू नये. पण त्यानंतर तुम्ही सिजनल आणि सर्व फळे खाऊ शकता.
10. आहारामध्ये दुधाचे आणि तुपाचे सेवानही जरूर केले पाहिजे.
# बाळंतीनीने आहाराबाबत ही काळजी घ्यावी –
1.बाळंतिणीचा आहार हा पचायला हलका असायला हवा.
2. तेलकट तिखट, मसालेदार, पचायला जड असलेले अन्नपदार्थ टाळले पाहिजे.
3. बाळंतिणीने नेहमी ताज अन्न च खाल्लं पाहिजे. सकाळचं उरलेलं जेवण संध्याकाळी खाऊ नये. कारण ते पचायला जड जाते. प्रत्येक वेळी ताजे बनवलेल्या गरम गरम अन्नच घेतले पाहिजे.
4. खाऊ शकता.पण जेवताना अन्न हे व्यवस्थित कुस्करून किंवा त्याचा काला करून च खाल्लं पाहिजे. चपाती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता. मग ते आमटी मध्ये किंवा भाजीमध्ये कुस्करून खाल्लं पाहिजे कोरडे अन्न खाऊ नये.
5. कांदा, कंदमुळे, बटाटा, वांगे हे पचायला जड असल्यामुळे खाऊ नये.
6. फर्मेंटेड फूड जसे इडली, डोसा, प्रोसेस फुड खाणे टाळले पाहिजे.
समारोप –
या लेखामध्ये आपण बाळंतिणीच्या आहारात असायलाच हवेत असे पौष्टिक पदार्थ बघितले. तुमच्या ओळखीचे कोणी असेल त्यांना पण ही पोस्ट शेअर करा. अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!