अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

मित्रांनो , स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र २४ वर !!!! अस्थमा ज्याला आपण दमा पण म्हणतो हा श्वसनाचा एक आजार आहे. यामुळे आपल्याला श्वासोश्वास करायला त्रास होतो. दमा कोणत्याही वयामध्ये बघायला मिळतो. हा श्वसनाचा आजार फुफुसांशी संबंधित आहे. ज्यामध्ये फुफुसांमध्ये हवेचे वाहन करणाऱ्या वाटा लहान होतात. ज्यामुळे श्वास घेण्यापेक्षा बाहेर सोडायला जास्त त्रास जाणवतो. हा आजार उन्हाळ्यापेक्षा थंड वातावरणामध्ये जास्त गंभीर होतो. हृदयविकार , निकामी मूत्रपिंड , शरीरात रक्ताची कमी तसेच लठ्ठपणा मुळे पण असा श्वसनाचा त्रास होऊ शकतो पण त्याला अस्थमा असे म्हणता येणार नाही. अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ? खाली आपण सविस्तरपणे बघू  –

अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

 अस्थमा म्हणजे नेमकं काय ?

जस आपल्याला माहीतच आहे हा श्वसनासंबंधित आजार आहे. यामध्ये आपल्याला फुफुसांमध्ये (lungs) हवेचे वाहन करणाऱ्या ज्या वाहिन्या (bronchie) असतात त्यांचा आकार लहान होतो. ज्यामुळे हवेच्या वाहनात अडथळा निर्माण होतो आणि व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास जाणवतो. यासोबत अस्थमामध्ये खोकला, कफ, छातीमध्ये भारी वाटणे अशी लक्षणे दिसून येतात.

नेहमी आपल्या श्वसन वाहिन्या मोकळ्या असतात ज्यामुळे आपण सहजपणे श्वास घेतो पण कामामध्ये या वाहिन्यांना सूज येते. सोबतच mucus (चिकट द्रव्य ) पण जास्त जमा होते ज्यामुळे त्या वाहिन्यांमधून हवा पास व्हायला अडचणी निर्माण होतात. हा आजार व्यक्तीच्या फुफुसांवर परिणाम करतो.

अस्थमा काहींसाठी एक साधारण आजार असू शकतो पण काहींसाठी हा गंभीर असू शकतो ते याच्या तीव्रतेमुळे. दमा असलेल्या व्यक्तींमध्ये श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये भारीपण घाबरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे आढळून येतात. पण याला दम्याचा अटॅक आपण तेव्हा मानतो जेव्हा हे इन्हेलरने पण ठीक होत नाही. इन्हेलरची गरज दर चार तासांनंतर लागेल असेल सोबतच व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास जाणवत असेल आणि कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नसेल तर त्याला ‘ अस्थमा अटॅक ‘ म्हणतात.

अस्थमाची कारणे कोणती असू शकतात ?

अस्थमा हा आजार वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतो. त्यातील काही ठळक कारणे आपण खाली बघू –

  1. पोल्युशन (Pollution).
  2. स्मोकिंग / तंबाखू वगैरे सारखी व्यसने करणे.
  3. धुळीचे कण (घरातील किंवा बाहेरचे).
  4. स्किन इन्फेक्शन किंवा allergy.
  5. Fatty foods.
  6. जेनेटिक कारणामुळे .
  7. खराब वातावरणामुळे .
  8. Perfume वगैरेंच्या वासामुळे.
  9. जास्त आद्र वातावरणामुळे.
  10. कॉकरोचेसमुळे.
  11. Lungs मध्ये Bacteria किंवा virusच्या aatack मुळे.

अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

  • जर तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर तुमच्याकडे इन्हेलर हे असायलाच हवे. यामध्ये दोन प्रकारचे इन्हेलर असतात.

  १) Long acting     २) Short acting  

  •  Short acting  इन्हेलर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच आहे. याचा एक पफ तुम्हाला दर ३० ते ६० सेकंदामध्ये एकदा घ्यायचा आहे. अनेकजण कन्टिन्यूसली पफ घेत जातात. पण तसं करायचं नाही . ३० ते ६० सेकंदामधून एकदा इन्हेलर पफ घ्यायचं आहे.
  • यावेळी तुम्ही आपले मन आणि शरीराला पूर्णपणे शांत ठेवा. आरामशीर बसा झोपू नका. कारण आडवे पडल्यावर श्वास घयायला जास्त त्रास होतो. सरळ थोडे ताठ बसून इन्हेलर घ्या.
  • एका वेळी जास्तीत जास्त १० पफ तुम्ही , ३० ते ६० सेकंदाच्या अंतराने घेऊ शकता.
  • जर एवढे करून (१० वेळा पफ घेऊन ) तुम्हाला बरे वाटत असेल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. पण याने तुम्हाला relief नाही मिळाला आणि त्रास जाणवत असेल. तर तुम्हाला डॉक्टरकडे गेलंच पाहिजे.
  • अशा वेळी मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अशा अटॅक च्या वेळी व्यक्ती घाबरून जाते. ज्यामुळे बॉडी मध्ये जास्त स्ट्रेस हार्मोन तयार होतात. जे श्वसन नलिकांमध्ये प्रॉब्लेम निर्माणकरू शकतात.
  • हा आजार श्वासांचा आहे. म्हणून श्वसनाशी संबंधित exercise चा यामध्ये खूप फायदा होतो. त्यासाठी काही उपयुक्त breathing exercise आपण आता बघू –

Breathing Exercises –

अस्थमामध्ये उपयोगी काही Breathing exercise  आपण खाली बघू –

१) Pursed Lip Breathing Exercise –

अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

  • हि Exercise तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नसाल त्यावेळीहि. हा व्यायाम कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी हि करणे फायद्याचे आहे.
  • नाकातून खोल श्वास घ्या. त्यासोबतच दोन पर्यंत मोजा .
  • आता ओठांना O चा shape देऊन हळुवारपणे श्वास ३ ते ४ सेकंदापर्यंत बाहेर सोडा. लक्षात ठेवा श्वास आत घेण्याचा वेळ हा सोडण्याच्या वेळेपेक्षा दुप्पट असायला हवा.
  • दिवसातून ४ ते ५ वेळा हा व्यायाम तुम्ही करू शकता.

या एक्सारसईज मुळे तुमच्या श्वासांची गती नॉर्मल व्हायला मदत होते.

२) Diaphragmatic Breathing  –

अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?

  • यासाठी तुम्ही एका ठिकाणी आरामशीरपणे बसा. आता तुमच्या खांद्यांना Relax ठेऊन नाकाने हळुवारपणे दीर्घ  श्वास घ्या. एक  हात तुमच्या छातीवर ठेवा आणि दुसरा हात पोटावर ठेवा. जेवढी हवा तुम्ही फुफुसांमध्ये भरू शकता तेवढी भरा.
  • तोंडावाटे हळुवारपणे श्वास सोडा. दीर्घ श्वास घेणे आणि सोडण्याची प्रक्रिया सुरु ठेवा आणि हे करताना तुमच्या पोटाच्या मुव्हमेंटवर फोकस करा आणि तुमच्या श्वासांच्या sensation वर लक्ष ठेवा.
  • हि  Exercise  तुमच्या श्वासाची गती कमी करते. आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात oxygen पुरवते आणि स्ट्रेस कमी करून मनाला relax करते.

समारोप –

तर मित्रांनो आज या लेख यामध्ये आपण बघितले कि अस्थमा म्हणजे काय ? सोप्या शबदामध्ये मी अस्थमाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ? हे पण आपण जाणून घेतले. मला अशा आहे कि तुम्हाला हा लेख वाचून मदत झाली असेल. आरोग्यविषयक अधिक पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या !!!!!!!!

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

FAQs

Q1. दमा कशामुळे होतो?
Ans – दमा होण्याची कारणे वेवेगळी असू शकतात. खराब हवामान, धूळ , सुगंध किंवा अन्य प्रकारची ऍलर्जी , कोरड्या , थंड हवेमध्ये श्वास घेणे ,औषधामुळे , काही चेमिकॅल श्वासामधून शरीरात गेल्याने देखील दमाचा अटॅक येऊ शकतो.

Q2. मला अचानक दमा का झाला?
Ans – दमा होण्याचे स्पष्ट कारण सांगणे कठीण आहे. कारण तो कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. दम्याच्या वाढीस कारणीभूत असेलेले काही घटक खालीलप्रमाणे आहेत –
श्वसन मार्गातले संक्रमण (infection), enviremental pollution, लठ्ठपणा, जेनेटिक कारणे, मानसिक ताण तणाव हे आहेत.

Q3. दमा बरा होऊ शकतो का?
Ans – दम्यावर कोणताही इलाज सध्या मेडिकल सायन्समध्ये उपलबध नाही. पण काही श्वसनाचे व्यायाम आणि इन्हेलर वगैरेचा वापर करून तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकता .
Q4. माझ्या मुलाला दमा किंवा ऍलर्जी आहे का?
Ans – दमा असलेल्या मुलांमध्ये दम लागणे , खोकला येणे , श्वास घेताना घरघर अशी लक्षणे दिसून येतात .काही मुलांमध्ये नुसता तीव्र खोकला हे एकच लक्षण पण दिसू शकते. मुलाला विशिष्ट प्रकारची ऍलर्जी असेल तरी दम्याचा त्रास होऊ शकतो.
Q5. दम्यासाठी काय मदत करते?
Ans – दम्यामध्ये इन्हेलर ची खूप मदत होते. इन्हेलर हे थोड्याच वेळात श्वसन वाहिन्यांची सूज कमी करतात ज्या शवसनामध्ये अडथळा निर्मण करतात.
Q6. एखाद्या प्रौढ व्यक्तीने दम्यासाठी रुग्णालयात कधी जावे?
Ans – जर इन्हेलच्या वापराने आराम मिळत नसेल आणि खूप त्रास जाणवत असेल तर त्वरित रुग्णालयात जायला हवे.
Q7. दम्याच्या खोकल्यापासून तुम्ही कसे मुक्त व्हाल?
Ans – दम्यामध्ये खोकला हा कोणत्या ना कोणत्या ऍलर्जी मुळे किंवा श्वसन मार्गामध्ये इन्फेकशन किंवा अन्य अडथळा निर्माण झाल्यामुळे होत असते . म्हणून तुमच्या डॉक्टरने दिलेल्या औषधे घेतल्यावर खोकला कमी होण्यासमदत होईल .
Q8. दम्याचा इनहेलेशन किंवा श्वास सोडण्यावर परिणाम होतो का?
Ans – दम्याच्या आजारामध्ये श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडायला जास्त त्रास होतो.
Q9. दमा तुम्हाला थकवू शकतो का?
Ans – दम्याच्या अनेक लक्षणांपैकी थकवा हे एक लक्षण आहे. पण तुम्हाला थकवा येतो आहे म्हणजे तुम्हाला दमा आहे असे नाही. रक्तामधील ऑक्सिजची लेवल कमी झाल्याने तसेच अन्य कारणांनी थकवा जाणवू शकतो.

1 thought on “अस्थमा म्हणजे काय ? अस्थमा अटॅक आल्यावर काय करावे ?”

  1. Pingback: ही आहेत लिव्हर खराब होण्याची लक्षणे | Liver Kharab Honyachi Lakshane

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top