अनेकांना अंगाला खाज येणे लालसर पुटकुळ्या येणे असा त्रास होत असतो सामान्यतः आपण त्याला अंगावर पित्त उठणे किंवा ऍलर्जी असे म्हणतो. खाज येण्यालाच आयुर्वेदामध्ये शित पित्त असेही म्हणतात. बहुतेक वेळा अशी खाज आल्यावर डॉक्टर कडे जाऊन आपण उपचार करून घेतो आणि ती खाज तात्पुरती बसते. पण काही काळानंतर पुन्हा हा त्रास सुरू होतो. तर आपल्या अंगाला खाज सुटण्याची नेमके कारणे कोणते आहेत ते आपल्याला माहित नसते. त्याबद्दलच आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत. त्यासोबतच अंगाला खाज सुटल्यावर सात सोपे घरगुती उपाय आहे बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत जरूर वाचा.
आपल्या अंगाला खाज का सुटते ?
आधुनिक शास्त्रानुसार आपण बघितलं, तर जेव्हा आपल्या शरीरातील एक पेशी दुसऱ्या पेशीविरुद्ध काही प्रतिक्रिया निर्माण करते. आणि त्यामुळे इस्टामाइन नावाचे केमिकल शरीरात तयार होते. त्यामुळे अशी प्रक्रिया होते आणि मग शरीराला खाज येणे, त्वचा लाल होणे, पित्त उठणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात.
जर कुणाला एलर्जीची सर्दी होत असेल, तेव्हा त्यामागे हेच कारण असतं. हे पेशीममधले हे बदल नेमके कशामुळे होतात. हे अनेकदा डॉक्टरांकडून सांगितलं जात नाही. डॉक्टर फक्त सांगतात की या या गोष्टींची तुम्हाला एलर्जी आहे.
त्वचेवर होणाऱ्या काही वेगवेगळे एलर्जी खालील प्रमाणे आहेत –
⇒ पावसाळ्यात पावसाचे थेंब अंगावर पडल्यामुळे अंगाला येणारी खाज, पित्त उठणे.
⇒ बऱ्याच जणांना सकाळी आंघोळ केल्यानंतर संपूर्ण अंगाला खाज येते.
⇒ काहींना सूर्यप्रकाशात गेल्यावर अंगावर खाज येते.
⇒ तर काहींना लोणचं, पापड, तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर अंगावर खाज येते.
⇒ अनेकांना आर्द्र (humid climate) वातावरणात जसे समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर अंगाला खाज येते.
⇒ काहींना काही विशिष्ट क्रीम पवडर परफ्युम यामुळेही खाज येते.
असा त्रास झाल्यावर बोललं जातं की या या या गोष्टीची तुम्हाला एलर्जी आहे त्यामुळे असं होतं. पण आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की असा त्रास सगळ्यांना होत नाही. म्हणजे काहींनाच अशी एलर्जी का असते तर त्यांच्या शरीरातील काही इंटरनल प्रॉब्लेम मुळे असे होत असते.
या रुग्णांच्या शरीरामध्ये काही बिघाड, दोष निर्माण झाले असतात. त्यामुळे काही गोष्टींच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला खाज येणे, स्किन एलर्जी सारखे लक्षणे दिसून येत असतात. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे एलर्जी होत आहे, त्या टाळण्यापेक्षा ज्या कारणामुळे ही एलर्जी होत आहे, ते दूर करणे गरजेचे असते. जेणेकरून कायमस्वरूपी तुम्ही या त्रासापासून मुक्त होऊ शकाल.
यासाठी आपल्याला हा त्रास कशामुळे होत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून नाडी चिकित्सा यामध्ये खूप उपयोगी ठरते. म्हणून तुम्ही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये जाऊन आपली नाडी चिकित्सा करून घेतली पाहिजे ज्याद्वारे शरीरात उत्पन्न झालेल्या दोषा मागचं नेमकं कारण समजेल आणि त्यानुसार डॉक्टर योग्य ट्रीटमेंट सांगतील.
अंगाला खाज सुटण्याची कारणे –
→ शरीरात उत्पन्न झालेली अतिरिक्त उष्णता ही त्वचेवर होणाऱ्या खाजेचे कारण बनू शकते.
→ त्यासोबतच काही जणांना सुरुवातीला काही काळ आम्लपित्ताचा त्रास होत असतो. नंतर उलटी, मळमळ, आंबट ढेकर यासारखे त्रास थांबतात आणि मग अंगावर पित्त उठणे अलर्जी यांसारखे त्रास सुरू होतात. तर यासाठीही शरीरातील पित्त कफ दोष किंवा पित्त वात दोष यांचं बिघडलेलं संतुलन जबाबदार असते.
→ हे दोष वाढण्यामागे पचनसंस्थेसंबंधी असलेले बिघाडही कारणीभूत ठरतात.
→ यकृताच्या कार्यक्षमतेमध्ये निर्माण झालेले बिघाडेही अशा एलर्जीचे कारण बनू शकतात.
→ या सर्व कारणांसोबतच जास्त ताणतणाव देखील याला कारणीभूत ठरू शकतो आणि अशा खाजेचे कारण बनू शकते.
अंगाला खाज सुटल्यावर सोपे घरगुती उपाय –
नेहमी शरीरावर उठणाऱ्या पित्ताचा खाजेचा कायमस्वरूपी इलाज तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे, असा सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छिते. पण अंगाला खाज येत असल्यास तात्पुरत्या स्वरूपात आणि लगेच आराम मिळण्यासाठी आपण काही घरगुती उपायही करू शकतो. चला तर मग बघूया कोणते आहेत ते सोपे घरगुती उपाय –
⇒ वीस ते पंचवीस तुळशीची पाने घेऊन ती एका पातेल्यात एक ते दीड ग्लास पाण्यात मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळवा. नंतर हा काढा आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केल्याने खाज दूर होण्यास मदत होते.
⇒ आंघोळीच्या पाण्यात थोडा खाण्याचा सोडा आणि लिंबाचा रस पिळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने खाजेचा त्रास दूर होतो.
⇒ एक वाटी पाण्यामध्ये आमसुलाचा एक तुकडा टाकून थोडा वेळ भिजू द्यावा. नंतर ते आमसूल पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी खाज होणाऱ्या भागावर लावले तर त्वरित खाज थांबते आणि स्किन नॉर्मल व्हायलाही मदत होते.
⇒ त्वचेला खाज सुटत असेल तेव्हा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने त्वचेची मालिश केल्याने खाज कमी होते.
⇒ वीस ते पंचवीस कडूलिंबाची पाने बारीक करून ती पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यावी आणि त्या पाण्याने अंघोळ केल्याने खाज दूर होते. हा उपाय सलग काही दिवस करावा. त्यासोबतच कडुलिंबाच्या झाडाची साल घेऊन ती उगाळून तिची त्याची पेस्ट खाज येणाऱ्या भागावर लावल्याने खाजेमध्ये त्वरित आराम मिळतो.
⇒ थोडासा चुना आणि खोबरेल तेल मिक्स करा ही पेस्ट होणाऱ्या भागावर लागल्याने कुठल्याही प्रकारची खाज असेल ती त्वरित थांबते.
⇒ लसूण ठेचून त्याचा रस खाज येणाऱ्या भागावर लावल्याने खाज दूर होते.
⇒ हिवाळ्यात तसेच अंघोळ झाल्यावर जर त्वचेला खाज सुटत असल्यास त्वचेला तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे याने खाज कमी होते.
⇒ खाजेसारख्या समस्यांमध्ये महामंजिष्ठाधी काढ्याचे तुम्ही सकाळ संध्याकाळ सेवन केले तर त्यामुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते आणि रक्तातील दोष दूर होतात यामुळे खाज बरी होते.
⇒ चिमूटभर काळी मिरी पावडर तुपाबरोबर मिक्स करून याची सेवन सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोनदा केल्यानेही खाज कमी व्हायला मदत होते.
⇒ बृहधरीत्रखंड चूर्णाचे सकाळ संध्याकाळ सेवन केलं तर स्किन एलर्जी चा त्रास कमी व्हायला मदत होते. हे चूर्ण मार्केटमध्ये सहजपणे मिळते.
⇒ जास्त प्रमाणात मळमळणे, छातीत जळजळ असे त्रास होत असतील तर आणि त्यासोबत अंगाला खाजही येत असेल तर अविपत्तीकर चूर्णाचे नियमितपणे सेवन करावे त्यानेही मदत मिळेल.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण अंगाला खाज सुटण्याची कारणे बघितली. आणि त्यावर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हे बघितले. जर तुम्हालाही त्वचेवर आज येण्याची समस्या असेल तर तुम्ही पण हे उपाय करून बघा. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ लाभेट देत रहा
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!