अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय करावे | ह्या आहेत काही सोप्या टिप्स

अनेक वेळा मुलांची अशी तक्रार असते की अभ्यास करताना खूप झोप येते असं का होतं ? आपण जेव्हा टीव्ही बघतो, मोबाईलवर गेम खेळतो किंवा बाहेर फिरायला जातो, तेव्हा फ्रेश वाटतं. पण अभ्यासाला बसलो की झोप यायला लागते. ह्या पोस्टमध्ये आपण अभ्यास करताना झोप का येते त्याची कारणे बघणार आहोत. तसेच अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय करावे असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आपण या लेखामधून बघणार आहोत.

अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय करावे

अभ्यास करताना झोप का येते ?

आजकाल हे समस्या वाढत चालली आहे. पुस्तक उघडले की लगेच झोप यायला लागते. भले रात्री झोप सात आठ तास झाली असेल पण अभ्यासाच्या वेळी परत झोप येतेच. जर तुम्ही पण असा problem face करत असाल, तर आधी जाणून घ्या – अभ्यास करताना झोप का येते ते.

⇒ आपण जेव्हा अभ्यास करत असतो, तेव्हा आपल्या शरीराच्या  muscles हालचाल होत नसते. शरीर शांत असल्यामुळे आणि डोळे, brain थकल्यामुळे मग झोप यायला लागते. तुम्ही पण त्यामधले असाल, ज्यांना हातात पुस्तक घेतल्या घेतल्यात झोप येते, तर तुम्हाला झोप येण्याचे कारण हे वेगळे असू शकते. तुम्ही ज्या टॉपिकचा किंवा विषयाचा अभ्यास करत असाल त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तरीही मन त्यामध्ये लागत नाही आणि मग झोप यायला लागते.

⇒ जर तुमची रात्री व्यवस्थित ( ६ ते ८ तास ) झोप झाली नसेल तरीही तुम्हाला अभ्यासाच्या वेळी झोप येऊ शकते.

⇒ जास्त जंक फूड, गोड पदार्थ खाऊन जर तुम्ही अभ्यासाला बसला तरी पण तुम्हाला झोप येऊ शकते.

⇒ एक सारखं खूप वेळ तुम्ही अभ्यास करत असाल तरीही तुम्हाला झोप येते.

⇒ तुम्ही करत असलेल्या विषय जर तुम्हाला कंटाळा आला असेल तरी पण तुम्हाला झोप यायला लागते.

अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय करावे ?

अभ्यास करताना झोप येण्याची कारणे आपण वर बघितली तर झोप न येण्यासाठी फॉलो करता येतील अशा काही टिप्स आपण आता बघू.

→ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री पुरेशी म्हणजे सहा ते आठ तास झोप ही आपण घेतलीच पाहिजे. म्हणजे शरीराला आणि मेंदूला पूर्ण आराम मिळेल.

→ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करण्याची जागा. तुम्ही जर हा बेडवर सोफ्यावर कुठेही बसून अभ्यास करत असाल तर तुम्हाला झोप येईलच. कारण तुमच्या मनाला क्लिअर सिग्नल जात नाही की आता स्टडी करायचा आहे.

→ त्यासोबतच अभ्यास करण्याची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असली पाहिजे. प्रसन्न वातावरणात आपल्या मनाला आतून आनंद वाटतो आणि मग अभ्यासात मन लागते.

→ अभ्यासासाठी एखादा टेबल जागा किंवा एखादा कोपरा तुम्ही फिक्स करून ठेवा. त्याच ठिकाणी बसून अभ्यास करत जा, म्हणजे त्या जागेवर गेलं की तुमच्या ब्रेनला नाही सिग्नल जाईल की आता अभ्यास करायचा आहे.

→ अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डायट. आजकाल बाहेरचे जंक फूड तळलेले वगैरे खाण्याचा प्रमाण खूप वाढलं आहे. ते खान तुम्ही कमी केलं पाहिजे.हा,  डायरेक्ट कमी होणार नाही. थोडं थोडं करून कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जास्त junk food खाल्ल्यामुळे आपल्या शरीर सुस्त बंद आणि मग मनही सुस्त बनते. आणि अभ्यास करण्याची इच्छा होत नाही.

→ जेवल्यानंतर एका तासाच्या नंतर अभ्यासाला बसू नका. कारण जेवल्यानंतर आपल्या शरीरातलं सर्व ऑक्सिजन ते अन्न पचवण्याचं काम करत असते. म्हणून brainला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि झोप येत असते.

→ दर 40 ते 45 मिनिटांनी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. यामध्ये तुम्ही घरातच थोडं फिरू शकता, शरीराला थोडं करू शकता, पाणी पिऊन येऊ शकता पण यावेळी मोबाईल बघू नका कारण मोबाईल घेतल्यावर त्या दहा मिनिटांचे 30 मिनिट कधी झाले ते तुम्हालाही कळणार नाही. आणि मग तुमचं मन त्यातील कोणत्यातरी गोष्टींमध्ये अडकून राहील आणि अभ्यासात मन लागणार नाही.

→ हे सर्व करून सुद्धा जर झोप येत असेल तर झोप यायला लागल्यावर चालता चालता वाचायचं आणि अभ्यास करायचा असं करताना झोप लगेच निघून जाईल. मग झोप केल्यावर तुम्ही आपल्या जागेवर बसून पुन्हा अभ्यास continue करू शकता.

→ अभ्यास करताना आपलं काही goal असणं ही खूप जरुरी असतं. म्हणजे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा स्वतःला सांगितलं पाहिजे की आता तुला हे टॉपिक करायचे आहेत. मग ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे केल्याने आपल्याला आता काय काय करायचे आहे ते क्लिअर असेल आणि तो अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि हे करण्यासाठी स्वतःला चॅलेंज केलं पाहिजे. एवढा मी आरामात करू शकते. हे खूप सोपं आहे. असे वाक्य स्वतःशीच बोला. त्यामुळे तुम्ही आतून motivate feel कराल आणि अभ्यासातही लक्ष लागेल.

समारोप –

तर आज आपण अभ्यास करताना झोप का येते आणि ती येऊ नये म्हणून काय करावे यासाठी करता येतील असे उपाय ही बघितले. तर तुम्ही पण हे उपाय करून बघा आणि झोपायला दूर सारून अभ्यासावर concentrate करा.

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top