जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती इतरांवर देखील छाप पडू शकतो आणि सर्वांना तो हवाहवासा वाटतो. कारण self-confidence मुळे त्याचे व्यक्तिमत्वच रुबाबदार दिसते. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो कि आत्मविश्वास हा आपल्या personality चा एक महत्वाचा भाग आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाशिवाय व्यक्ती काहीच साध्य करू शकत नाही. म्हणून तुमच्यामध्ये पण आत्मविश्वास कमी असेल आणि तो तुम्ही वाढवू इच्छित असाल तर या लेखामध्ये तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काय करावे यांच्या काही सोप्या टिप्स वाचायला मिळतील. त्या नक्कीच तुम्हाला कामात येणार आहेत म्ह्णून लेख पूर्ण जरूर वाचा.
चला तर मग सुरवातीला आपण बघू कि आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय ते.
# आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय ?
आत्मविश्वास म्हणजे आपला स्वतः वर असलेला विश्वास. म्हणजे आपण एखादी गोष्ट करत आहोत किंवा कुणीतरी आपल्याला ती करायला सांगितली आहे आणि तुम्हाला पूर्ण विश्वास असेल कि ती तुम्ही नक्कीच करू शकता याला आत्मविश्वास म्हणतात. हे आपण एका उदाहरणाने समजण्याचा प्रयत्न करू.
एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असतो कि मला ९० % मार्क्स मिळणारच किंवा कुण्या एका कॅम्पपनीच्या employee चा स्वतःबद्दल आत्मविश्वास असतो कि मी आजच प्रेझेन्टेशन बेस्टच देणार आहे. पण हाच आत्मविश्वास काहींमध्ये खूप कमी प्रमाणातअसतो. याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे काही गोष्टी करताना अशा व्यक्ती घाबरतात, आपण हे काम व्यवस्थित पूर्ण करू कि नाही अशी भीती त्यांना वाटतं असते. पण यामध्ये चूक त्यांची पण नसते. ज्याप्रकारे लहानपणी त्यांच्यावर जडण-घडण झालेली असते, तसाच स्वतःबद्दलचा विश्वास त्यांचा बनलेला असतो.
लहान असताना नातेवाईक, आई-वडील, शिक्षक जर आपल्याला हे तुझ्याकडून होणार नाही ? तुला हे जमणार नाही ? तुझ्या काही लक्षातच राहत नाही ? अश्या नकारात्मक टीका करत असतील तर त्या ऐकून ऐकून आपल्याला ते खरंच वाटायला लागते कि आपण काहीच मोठं करू शकत नाही.
आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. असा परिणाम आपल्या अंतर्मनावर होऊन जातो पण ते खर नाहीये. या जगात प्रत्येक व्यक्तीला काही स्पेशल गिफ्ट मिळाले आहे, सर्वांमध्ये काहीतरी टॅलेंट,गुण असतातच म्हणून आपण स्वतःला कमी लेखने हे आधी बंद केले पाहिजे. चला तर आता बघुयात आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात त्या.
# आत्मविश्वास वाढवण्याच्या सोप्या टिप्स –
१. जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा –
तुमच्याकडे जे आहे त्यासाठी तुम्ही आधी कृतज्ञ असले पाहिजे. म्हणून तुमच्याकडे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची यादी करा आणि त्यासाठी धन्यवाद माना. तुमच्याकडे जास्त काही नसेल तरी निरोगी शरीर असेल, त्याची पण किंमत करोडो रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणून त्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद माना.
राहायला घर असेल, दोन वेळेचं जेवण मिळत असेल, चांगला परिवार असेल, गाडी वगैरे असेल तर त्यांचा समावेश या यादी मध्ये करा. मग हि यादी वाचून तुम्हाला दिसून येईल कि आपल्याकडे खूप काही आहे. आपण खूप चांगलं जीवन जगत आहोत असं जीवन जगणं बऱ्याच जणांचं स्वप्न असत.
मग रोज रात्री हि यादी बघून देवाला धन्यवाद द्या. याने तुमच्यामध्ये स्वतःबद्दल आपल्या आयुष्याबद्दल चांगली भावना निर्माण होईल. यातून तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करू लागाल आणि तुमचा आत्मविश्वास पण वाढेल.
२. स्वतःची तुलना कुणासोबतही करू नका –
आपण सर्वात मोठी चूक हीच करतो. आपली तुलना नेहमी इतरांसोबत करत राहतो. यामुळे स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होऊन आपला आत्मविश्वास कमी होत असतो. आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकरले पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारू लागतो स्वतःवर प्रेम करू लागतो तेव्हाच दुसरे आपल्यावर प्रेम करतात. जगात प्रत्येक व्यक्ती हि स्पेशल असते. आणि तिची life journey पण तितकीच स्पेशल असते. म्हणून दुसऱ्याची प्रगती बघून जळू नका. हा तुम्ही पुढे जाण्यासाठी प्रयत्न मेहनत नक्की करा.
३. आपल्या कामामध्ये परफेक्ट बना –
कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, आपल्या क्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे. जर तुम्हाला आपल्या कामाबद्दल पूर्ण माहिती असेल तर आत्मविश्वास हा आपोआप वाढत जातो. म्हणून आपल्या कामामधील नवीन स्किल्स शिकून घ्या. अजून काही उपयोगी शिकण्यासारखे असेल, तर ते पण शिका. यामुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक ज्ञान तुमच्या कामामधलं असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असता.
४. स्वतःला छोटे छोटे टार्गेट द्या –
तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल. स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतःला छोटे टार्गेट देण्यापासून सुरवात केली पाहिजे. यासाठी तुम्ही रोजच्या कामांची लिस्ट करा जी महत्वाची आणि सोपी कामे आहेत त्यांचाच समावेश करा. खूप जास्त कामे पण घेऊ नका. ४ -५ कामे करण्याचं टार्गेट तुम्ही स्वतःला देऊ शकता. आणि हि कामे तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केली तर स्वतःला बक्षीसही द्या. जसे एखाद चॉकलेट देऊ शकता किंवा आवडीचे एक दोन गाणे ऐकू शकता.
हि पद्धत तुम्ही पुढचे २१ ते २८ दिवस वापरून बघा. तुमचा आत्मविश्वास किती तरी वाढेल. पण प्रत्येक कामे पूर्ण केल्यावर स्वतःला बक्षीस द्यायला विसरू नका. कारण त्याने तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढत जातो.
५. चांगल्याच व्यक्तींच्या सोबत राहा –
असे म्हणतात ज्यांच्यासोबत आपण राहतो तसेच आपण बनत जातो. आपली संगत हि महत्वाची असते. म्हणून आपली संगत हि चांगल्या व्यक्तींसोबत असली पाहिजे जी आपल्याला पुढे जायला मदत करतील, आपला स्वतःवर असलेला विश्वास वाढवतील. तुमचा मित्र, सहकारी तुमच्यासोबत नकारात्मक बोलत असेल, तुम्हाला कमी लेखत असेल, चुकीची कामे करण्यास भाग पडत असेल अशा लोकांपासून दूर राहणेच चांगले. कारण यामुळे तुमचा आत्मविश्वास हा कमी होतो.
६. ज्याची भीती वाट्ते ते करून बघा –
मित्रांनो आत्मविश्वास वाढवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करायला घाबरता त्याच आधी करून बघितल्या पाहिजे. सुरवातीला कठीण जाईल तुम्हाला खूप भीती वाटेल पण एकदा तुम्ही त्या करू लागाल तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास हळू हळू वाढायला लागेल. आपण हे करू शकतो म्हणजे काहीही करू शकतो अशी भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल.
७. आरशात बघून आत्मविश्वासाने स्मितहास्य करा –
आत्मविश्वास कमी असलेले लोक स्वतःवर खूप रागावलेले असतात. स्वतःला इतके कमी आणि तुच्छ समजत असतात कि आरशात स्वतःकडे पण प्रेमाने बघून हसू हि शकत नाहीत. हि छोटीशी क्रिया तुम्हाला स्वतःबद्दल चांगली चांगले विचार करायला लावेल. तुम्ही स्वतःबद्दल चांगले विचार करू लागल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल.
८. तुमचे नकारात्मक विचार दुर करा –
तुमच्या मनातले नकारात्मक विचार येत असतील तर ते तुम्हाला दूर केले पाहिजेत. जसे माझ्याकडे काहीच नाही, माझ्यासोबत नेहमी वाईटच होत अश्या प्रकारचे नकारात्मक विचार तुमच्या मनात येत असतील तर तेव्हाच त्यांना थांबवून त्या जागी सकारात्मक विचार करायला लागा. जसे मी हे नक्कीच करू शकतो , बाकीचे करू शकतात तर मी का नाही करू शकत ? असे सकारात्मक विचार काण्याची सवय स्वतःला लावून घ्या. यासाठी तुम्ही सकारात्मक पुस्तके वाचू शकता.
मला आवडलेलं एक चांगलं पुस्तक मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते ” The Power Of Your Subconscious Mind“- डॉ जोसेफ मर्फी यांचे पुस्तक तुम्ही मराठी मध्ये हि वाचू शकता.
हे पण नक्की वाचा :
समारोप –
मित्रांनो आज आपण या लेखामधून आत्मविश्वास वाढवण्याच्या काही सोप्या टिप्स बघितल्या. तुम्ही यांची प्रॅक्टिस सुरु करा आणि आपला आत्मविश्वास वाढवा. त्यासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. मानसिक आरोग्याबद्दल आणि आरोग्यविषयक अन्य लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या. आणि तुमचे काही सजेशन प्रश्न असतील तर मला खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा.
हि पोस्ट पूर्ण वाचल्यालाबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!