अनेकांच्या चेहऱ्यावर आणि पूर्ण शरीरावर खूप तीळ असतात. आपल्याला चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तीळ असतील तर ते आपली सुंदरता कमी करतात. तर हे तीळ आपल्या चेहऱ्यावरील का येतात ते आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. आणि अधिक तीळ न येण्यासाठी आपण काय करू शकतो त्याबद्दल ही माहिती बघणार आहोत. तिने अनेक प्रकारचे असतात म्हणजे काही डार्क काळ्या, लाल रंगाचे लहान मोठे असतात. काही तीळ हे जन्मताच आपल्या शरीरावर असतात, तर काही नंतर येत असतात सामान्यतः ती हे ३० ते ३५ वर्षांपर्यंत येतात.
सुरुवातीला आपण बघू ते म्हणजे नक्की काय असतं ते.
शरीरावरील तीळ म्हणजे नेमकं काय ?
आपली स्किन ही सेल्स पासून बनलेली असते. जी स्किन सेल्स असतात त्याला melanocytes म्हणतात. या melanocytes मधून मेलॅनिन नावाचा त्वचेला रंग देण्याचे काम करणारा द्रव पाझरत असतो. जेव्हा त्याच्या कामांमध्ये असंतुलन निर्माण होते. तेव्हा melanocytes च्या जागी Neo Melanocytes तयार होतात ते म्हणजेच तीळ. हे melanocytes एका ठिकाणी जास्त प्रमाणात जमा झाले तर डार्क स्पॉट तयार होतो त्यालाच आपण तीळ म्हणतो.
आपल्या शरीरावर तीळ येणे हे सामान्य आहे. जसे आपण मोठे होतो या तिळाचा आकार आणि रंग पण बदलतो आणि काही नवीन तीळही येतात. शरीरातील हार्मोन्स मध्ये झालेल्या बदलामुळे हे तीळ येत असतात. जसे तुमच्या प्रेग्नेंसी च्या दरम्यान हार्मोन्स मध्ये खूप जास्त बदल होत असतात त्यावेळी त्वचेवर नवीन तीळ येऊ शकतात.
जर वयानुसार तुमच्या तिळाचा आकार वाढत असेल आणि त्यामध्ये खाज येत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण हे स्किन कॅन्सरचं लक्षण ही असू शकते.
चेहऱ्यावर/शरीरावर तीळ कशामुळे येतात ?
ती येण्याची अनेक कारणे आहेत त्यातील महत्त्वाची कारणे आपण खाली बघू.
१. अनुवंशिकता –
तुमच्या फॅमिली मध्ये कुणाला जर खूप तीळ येण्याची हिस्टरी असेल. म्हणजे तुमच्या कुटुंबामधील कुणाला जर खूप तीळ असतील तर तुम्हाला पण जास्त वेळ येऊ शकतात.
२. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन –
जर तुम्ही उन्हात जास्त वेळ जात असाल तर उन्हाच्या अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे देखील तुम्हाला तीळ येऊ शकतात. म्हणून उन्हापासून पूर्ण शरीराचे प्रोटेक्शन जर तुम्ही केले तर तुम्ही तीळ येण्यापासून आपल्या त्वचेला वाचवू शकता.
३. आजार –
जर तुम्हाला एखादा आजार झाला असेल तर त्यामुळे देखील तीळ येण्याचे प्रमाण वाढू शकते.
४. तुमची स्किन लाईट असो वा डार्क कोणालाही तीळ हे येऊ शकतात.
अनेकांना वाटतं की फेस वॉश किंवा क्रीम बदलल्यामुळे, जागा बदलल्यामुळे किंवा खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे तीळ येत आहेत. पण या गोष्टीमुळे त्वचेवर तीळ येत नाहीत. तर तीळ येण्यासाठी वर सांगितलेल्या गोष्टी कारणीभूत ठरतात.
तिळाचे वेगवेगळे प्रकार –
तिळ हे वेगवेगळे प्रकारचे आपल्या शरीरावर बघायला मिळतात त्याबद्दल आता आपण बघू.
काही तीळ हे जन्मतः छोटे छोटे असतात तर काही जन्मानंतर येत असतात. वयाच्या साधारणता तीस ते पस्तीस वर्षांपर्यंत असे येत असतात.
काही तीळ हे जन्मतः आणि आकाराने मोठे असतात पण यांचे प्रमाण कमी असते.
१. Junctional Nevus –
तिळाचा पहिला प्रकार म्हणजे Junctional Nevus हहे तीळ आपल्या स्किनच्या इपिडरमिस आणि दरमिस या लेअरच्या मध्ये येतात. या प्रकारचे तीळ सपाट असतात आपल्या हाताला अजिबात जाणवत नाहीत आणि आकाराने ही छोटे असतात.
२. Intradermal Nevas –
यामध्ये जे तीळ येतात ते दरमिसच्या जो लेअर आहे त्या भागामध्ये येतात. हे तीळ आकाराने थोडे मोठे असतात. आपल्या हातांना ते जाणवतात.
३. Compound Nevus –
यामध्ये येणारे तीळ हे जंक्शनल आणि दरमिस या दोन्हींच्या मध्ये येतात. हे तीळ रंगाने डार्क आणि थोड्या मोठ्या आकाराचे असतात. हे आकाराने मोठे असल्यामुळे हाताला जाणवतात आणि कधी कधी यामध्ये केस देखील असू शकतात.
काहींच्या चेहऱ्यावर शरीरावर रेड कलर चे छोटे छोटे तीळ बघायला मिळतात त्याला Cherry Angioma असे म्हणतात. त्याचा आपल्या ला काही त्रास नसतो.
डॉक्टरांना कधी दाखवावे –
सुरुवातीला ती छोटा असेल आणि तुम्हाला जर असं जाणवलं की आता महिन्या दोन महिन्यांमध्ये त्याची साईज खूप वाढली आहे किंवा त्यामधून रक्त येत असेल खाज येत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचे आहे. आणि नॉर्मल तीळ असेल तर घाबरण्याची काही गरज नाही.
तीळ असतील तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात –
मित्रांनो चेहऱ्यावरील जास्त तीळ हे आपलं सौंदर्य कमी करत असतात. अशा मध्ये मग युट्युब वर किंवा गुगल वर बघून अनेक उपाय केले जातात. पण तीळ हे त्वचेच्या खूप आतल्या भागात असल्यामुळे या उपाययोजना करून तात्पुरते जाऊ शकतात. पण थोड्या दिवसांनी ते पुन्हा येतात. आणि सोडा विनेगर सारख्या वस्तू चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला इजाही होऊ शकते. म्हणून असे घरगुती उपाय मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत. पण जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात तीळ असतील तर तुम्ही स्किन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेऊ शकता.
समारोप –
तर मित्रांनो आज या लेखांमधून आपण बघितले की आपल्या चेहऱ्यावर तीळ कशामुळे येतात. तर घरगुती उपाय करण्याआधी आपल्या त्वचेचा विचार जरूर करा. आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे कारण असल्यामुळे पुन्हा जाताना संस्कृतचा वापर जरूर करा म्हणजे उन्हामुळे तरी तुमच्या त्वचेवर तीळ येणार नाहीत. तुमचे काही सजेशन असेल तर खाली कमेंट मध्ये जरूर सांगा.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!