दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ज्याने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे जनजीवन प्रभावित केले आहे. शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे म्हणून दुष्काळामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानाला सामोरे जावे लागते. भारतात दुष्काळ पडण्याचा मोठा इतिहास आहे. उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार दर आठ ते नऊ वर्षांनी देशाच्या काही ठराविक भागांमध्ये सरासरी एक दुष्काळ पडतो. १७व्या शतकात अनेक वेळा पाऊस न पडल्याने तसेच १९ व्या शतकात ब्रिटिशांचे राज्य होते, त्या काळात भारताने सर्वात वाईट मानवनिर्मित दुष्काळ पाहिला. कोणत्या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले ? ते आपण या लेखामधून बघणार आहोत.
कोणत्या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले ?
१) 1876-78 – या काळात पडलेल्या महादुष्काळ ५ ते १० दशलक्ष लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला.
२) 1899 – मध्ये पडलेल्या दुष्काळात ४.५ दशलक्ष पेक्षा जास्त मृत्यू झाले होते.
३) 1987 – मध्ये देखील खूप मोठ्या दुष्काळ भारताने बघितला. यामुळे८५ दशलक्ष लोक प्रभावित झाले.
भारतातील सर्वात मोठा दुष्काळ –
1876 -77 दुष्काळाला महादुष्काळ म्हणून देखील ओळखले जाते. जुलै १८७५ ते जून १८७७ या दोन वर्षांमध्ये उत्तर आणि ईशान्य भारतातील मोठ्या भागात पाऊस कमी प्रमाणात पडला त्यामुळे मोठ्या दुष्काळ यावेळी पडला होता. या दुष्काळाचा अन्नधान्याचे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली. त्यामुळे गव्हाचे भाव ३०० – ५०० टक्क्यांनी वाढले. उपासमारीने, कुपोषणामुळे ५ ते १० दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. भारतातील इतिहासातील नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या मृत्यूची ही सर्वात मोठी संख्या आहे.
भारतात पडून गेलेले काही प्रमुख दुष्काळ –
भारताने दुष्काळ अनेक वेळा पाहिले आहेत. आधीच्या रेकॉर्ड्स नुसार एखाद्या ठराविक भागांमध्ये दर आठ ते नऊ वर्षांनी दुष्काळ पडतो. सन १८७१ ते २००२ या काळामध्ये भारताने २२ मोठे दुष्काळ बघितले त्यातील काही प्रमुख दुष्काळ आपण खाली बघू.
⇒ 1876-1877 – आपण या दुष्काळाबद्दल वर बघितले. मोठ्या प्रमाणात नापिकी उपासमार या मुळे झाले होते. हा एक सर्वात वाईट भारतीय दुष्काळ मानला जातो.
⇒ 1899-1900 – या दुष्काळामुळे मोठा भाग प्रभावित झाला. उपासमार आणि रोगामुळे ४.५ दश लक्ष पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.
⇒ 1965 – या दुष्काळाचा देखील अनेक राज्यांना फटका बसला.
⇒ 1972 – यामध्ये राजस्थान गुजरात आणि इतर पाच राज्यांच्या काही भागां मध्ये याचा परिणाम झाला. या काळामध्ये धान्य उत्पादनात ३८ टक्क्यांनी घट झाली.
⇒ 1979 – उत्तर पूर्व पश्चिम भारतामध्ये या दुष्काळामुळे पिकांवर परिणाम झाला. पावसाच्या कमतरतेच्या बाबतीत हा सर्वात गंभीर दुष्काळापैकी एक आहे.
⇒ 1982 – कमी पावसामुळे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सोबत अनेक राज्यात दुष्काळ पडला.
⇒ 1987 – गेल्या शंभर वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी झाला होता. खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र प्रभावित झाले आणि पिकांचे नुकसान या दुष्काळामुळे झाले.
⇒ 2002 – यावर्षी ५६% पाऊस कमी पडला. त्यामुळे पाण्याची अत्यंत तीव्र समस्या निर्माण झाली. यामुळे ग्रामीण भागात दरिद्रता वाढली.
⇒ 2012 – महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि काही भागांमध्ये सामान्य पेक्षा ६० ते ७० टक्के कमी पाऊस झाला.
⇒ 2014-16 – मध्य भारतात असलेल्या बुंदेलखंड या भागाला सलग अनेक दुष्काळांचा सामना करावा लागला.
⇒ 2019 – तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दुष्काळाचे समाजावर आणि लोकांवर होणारे परिणाम –
दुष्काळाचे दूरगामी सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात. भारतात दुष्काळाचा झालेला परिणाम आपण जाणून घेऊ.
• अन्न टंचाई आणि कुपोषण –
दुष्काळात तीव्र अन्न त्यांचाही निर्माण होते. त्यामुळे अन्नधान्याच्या किमतीमध्ये खूप जास्त वाढ होते महागाई दर हा 17 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढतो. या धान्याच्या किमती महागण्याचा परिणाम गरीब कुटुंबावर जास्त होतो.
अशा परिस्थितीमध्ये लहान मुले आणि महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते कारण टंचाईमुळे पुरेसे जेवण मिळत नाही.
• शेती आणि उपजीविका –
शेतकरी ज्यांची पूर्ण उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असते त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान दुष्काळामुळे होते. पावसावर अवलंबून असलेल्या भागात शेतीची उत्पादकता २० ते ४० टक्क्यांनी कमी होते. ग्रामीण दुष्काळी भागातून कामाच्या शोधात स्थलांतराचे प्रमाण यावेळी वाढते.
• गरीबी आणि कर्ज –
दुष्काळामुळे वारंवार होणारे आर्थिक नुकसान झाल्यामुळे दरवर्षी अनेक कुटुंब गरिबीकडे ढकलले जातात. नुकसानाला सामोरे जाण्यासाठी दुष्काळा मध्ये शेतकरी कर्ज घेतात, पण नापिकेमुळे वेळेवर ते कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनतात.
समारोप –
तर आज या लेखांमधून आपण कोणत्या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले याविषयी माहिती बघितली. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!