मित्रांनो तुम्ही अनेकांना ऍसिडिटी मुळे हैराण झालेले पाहिले असेल. लोकं अनेकदा म्हणतात की माझ्या पोटात जळजळ होत आहे किंवा मळमळ होत आहे मला ऍसिडिटीचा त्रास होतो आहे ही ऍसिडिटी किंवा पित्त होण्याचे मुख्य कारण काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ? पित्त म्हणजे काय आणि पित्तासाठी करता येतील असे असरदार घरगुती उपाय आपण या लेखांमधून बघणार आहोत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी पित्ताला कारणीभूत आहेत. ऍसिडिटी होते त्याची माहिती तुम्हाला असेल तर त्या गोष्टी टाळून तुम्ही त्यापासून वाचू शकता.
पित्त कशामुळे होते ?
नॉर्मली जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा ते esophaagues अन्ननलिकेमधून आपल्या जठरामध्ये (stomach ) जाते. मग तिथून ते लहान आतडे आणि नंतर मोठ्या आतड्यांमध्ये जात असते. जठरामध्ये जेव्हा अन्न येते तेव्हा ते पचवण्यासाठी जठराच्या आतल्या भागामधून हायड्रोक्लोरिक ऍसिड सेक्रेशन सुरू होते. आणि ते अन्न पचते. पण समजा सकाळी उठल्यावर आपण थोडं त्यांना खाल्लं तरी जठर ते पचवण्यासाठी जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ऍसिड सिग्शन करते आणि हे अतिरिक्त ऍसिड म्हणून बाहेर येते. मग त्यामुळे आंबट ढेकर, अस्वस्थ वाटणे, काही खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे दिसू लागतात यालाच ऍसिड रिफ्लेक्स असे म्हणतात.
पित्ता पासून बचाव करण्यासाठी काही टिप्स –
⇒ तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर धूम्रपान करणे थांबवले पाहिजे.
⇒ तुमचे वजन जास्त असेल तरी तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून वजन नियंत्रीत ठेवलं पाहिजे.
⇒ पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तसेच इतरही सर्वांनी एकाच वेळी जास्त खाल्ल्यापेक्षा थोड्या थोड्या वेळानंतर थोडे थोडे खात राहिला पाहिजे. म्हणजे ऍसिडिटीचा त्रास होणार नाही तसेच भूक नसल्यावर खाऊ नये.
⇒ तळलेले मसालेदार अति तिखट पदार्थ तसेच फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे जे पित्तासाठी जबाबदार असतात.
⇒ ऍसिडिटी पासून वाचण्यासाठी तुम्हाला उपाशी राहणे टाळले पाहिजे नेहमी काही ना काही खात राहिला पाहिजे आणि उपाशीपोटी चहा पिणे ही टाळले पाहिजे. जेवढा उपाशीपोटी चहा तुम्ही प्याल तेवढी तुमची ऍसिडिटी वाढत जाईल.
⇒ जास्त प्रमाणात चिंता ताण तणाव यामुळे पित्ताचा त्रास होतो म्हणून त्यांना मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
⇒ रात्रीचे जागरण, जास्त राग चिडचिड या गोष्टीही ऍसिडिटीला कारणीभूत ठरतात म्हणूनच या टाळल्या पाहिजेत.
⇒ आहारात ताजी फळे, भाज्या, कडधान्ये यांचा समावेश केला पाहिजे.
पित्त /ऍसिडिटी ची प्रमुख लक्षणे –
⇒ पोटात जळजळ होणे
⇒ मळमळ होणे
⇒ छातीत आग होणे
⇒ उलटी होणे
⇒ करपट ढेकर येणे
⇒ आंबट कडू पाणी तोंडात येणे
⇒ अस्वस्थ वाटणे
⇒ तोंडाची चव कडवट होणे
पित्तासाठी असरदार घरगुती उपाय –
1. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून मग ते गाळून प्या. आणि हा पुदिन्याचा चहा तुम्ही नियमितपणे काही दिवस घ्या. पुदिनामुळे पचन चांगलं होतं आणि पोटातील ॲसिड कमी होण्यास मदत होते. तुम्ही पुदिन्याची पाने चावून देखील खाऊ शकता. यामुळे ऍसिडिटी झाली असल्यास लवकर आराम मिळण्यास मदत होते.
2. एक कप पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून ते थोडं गरम करा. जास्त वेळ उकळू देण्याची गरज नाही. हे जिऱ्याचे पाणी प्या आणि जिरेही सोबत चावून चावून खाऊन घ्या. हा उपाय तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी करायचा आहे. असे तुम्ही सलग 12 ते 15 दिवस करा. कोणत्याही प्रकारचे पित्त दूर व्हायला यामुळे मदत होते.
3. पिकलेली केळी खाल्ल्याने ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. म्हणून करपट ढेकर पोटात जळजळ असा त्रास होत असेल, तर एक पिकलेली केळी तुम्ही खाल्ली खाऊ शकता. म्हणजे त्वरित आराम मिळायला मदत होते.
4. बडीशेप, जिरे, धने यांची पूड करून ठेवा आणि रोज जेवण झाल्यानंतर एक चमचा ही पूड घेतल्याने ऍसिडिटीचा त्रास होणारच नाही.
5. वारंवार ऍसिडिटी चा त्रास होत असेल तर सकाळी उपाशीपोटी तसेच रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात एक चमचा आवळ्याचं चूर्ण घेतलं पाहिजे. यामुळे नेहमी नेहमी ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. यासोबतच ऍसिडिटी पासून वाचण्यासाठी रोज आवळा कॅन्डी, आवळा शरबत घेतलं पाहिजे.
6. पित्त कमी करण्यासाठी कोकम शरबत, थंड दूध तसेच नारळ पाणीही खूप उपयुक्त ठरते. त्यांचा देखील आपल्या आहारात समावेश करायला हवा.
7. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने देखील शरीरातील toxins बाहेर निघून जातात. आणि पित्त कमी होण्यामध्ये मदत होते. म्हणून आपण रोज 8 ते 10 ग्लास पाणी हे पिलंच पाहिजे.
समारोप –
या लेखामध्ये आपण पित्तासाठी असरदार घरगुती उपाय बघितले. त्यासोबतच पित्त कशामुळे होते ? तसेच पित्ताची प्रमुख लक्षणे कोणती असतात तेही बघितले. तुम्हालाही पित्ताचा त्रास होत असेल तर या उपायांनी तुम्हाला आराम मिळेल. अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!