महिलांच्या तसेच मुलींच्या चेहऱ्यावर काही वेळेला प्रमाणापेक्षा जास्त केस येतात. हे केस खूप विचित्र वाटतात, चेहऱ्याची सुंदरता घालवतात. मुलींमध्ये चेहऱ्यावर तसेच शरीरावर असे अतिरिक्त केस येण्यामागे काही मेडिकल प्रॉब्लेम्स आणि अन्य कारणे असू शकतात. यामध्ये चेहऱ्यावर नॉर्मल पेक्षा अतिरिक्त केस येतात महिलांमध्ये दाढी मिशांच्या ठिकाणी केस येतात. हे केस येणे मागे जेनेटिक किंवा हार्मोनल अशी कारणे असू शकतात. या लेखामध्ये आपण मुलींच्या चेहऱ्यावर केस का येतात याबद्दल जाणून घेणार आहोत
चेहऱ्यावर केस येणे म्हणजे नक्की काय ?
आपल्या सर्वांचे चेहऱ्यावर थोडे फार केस असतातच. त्यामध्ये चिंता करण्यासारखं काही नाही. पण जर हे जास्त प्रमाणात चेहऱ्यावर येत असतील तर मात्र डॉक्टरांना दाखवलेच पाहिजे. मुलींच्या चेहऱ्यावर केस येण्याचे मुख्यतः दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे अनुवंशिक कारण आणि दुसऱ म्हणजे harmonesचे बिघडलेले संतुलन.
चेहऱ्यावर जास्त केस असतील तर त्या स्थितीला शास्त्रीय भाषेमध्ये हायपर ट्रायकोसिस असे म्हणतात. हे केस येण्याच मुख्य कारण जर अनुवंशिक असेल तर त्याला जेनेटिक हायपरिस ट्रायकोसिस असे म्हणतात. आणि जर हे हार्मोन्सच्या बिघाडामुळे होत असेल तर त्याला हरस्यूटइज्म (Hirsutisms) असे म्हणतात.
चेहऱ्यावरच्या केसांमुळे करावा लागतो या गोष्टींचा सामना –
चेहऱ्यावर केस जरी काही मेडिकल कंडिशन मुळे येत असतील तरी याचा खोलवर परिणाम हा त्या मुलीच्या मनावर होत असतो. कारण समाजामध्ये, आजूबाजूच्या लोकांकडून अशा परिस्थितीमध्ये उपासाचा, चेष्टेचा सामना करावा लागतो. पण त्या मुलीच्या मनाची काय स्थिती असेल ? याचा विचार सर्वांनी करायला हवा. आणि ज्यांना या स्थितीचा सामना करावा लागत आहे, त्यांनी आपल्या मनातून या आजाराचा स्वीकार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कुटुंबातील इतर सदस्यांनी त्या मुलीला धीर दिला पाहिजे, समजून घेतले पाहिजे म्हणजे तिला आजाराशी लढण्याची ताकद मिळेल.
चेहऱ्यावर केस येण्याची कारणे आता आपण बघू.
मुलींच्या चेहऱ्यावर केस का येतात ?
मुलींमध्ये अँड्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त केस यायला लागतात. अँड्रोजन हार्मोन पुरुषांमध्ये असणार hormone असत. पण याचे प्रमाण ladies मध्ये जेव्हा जास्त होते. तेव्हा हे अतिरिक्त केस चेहऱ्यावर तसेच पूर्ण शरीरावर यायला लागतात. हे हार्मोन मुलींमध्ये वाढण्याचे काय कारणे आहेत.
१. Polycystic ovarian syndrome –
यामध्ये महिलांच्या ओवरीमध्ये LH luteinizing hormone आणि FLH follicle stimulating hormone यांचा समतोल बिघडतो. यामुळे त्यामध्ये stone ही बनू शकतात. तसेच अँड्रोजन लेवल ही डिस्टर्ब होऊ शकते. या मुळे मुलींमध्ये चेहऱ्यावर केस येतात .
२. Idiopathic –
⇒ म्हणजे बिमारीचे नक्की कारण काय आहे हे माहीत नसतं. यामध्ये हा प्रॉब्लेम नक्की कशामुळे होत आहे ते समजू शकत नाही. कधी कधी हे केस उगवण्यामागचं नक्की कारण काय आहे ते समजू शकत नाही. तेव्हा डॉक्टर त्याला Idiopathic कारण असे म्हणतात.
३. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय steroids चा उपयोग –
⇒ Athletes किंवा अन्य काही लोकही drugs, steroidsचा दुरुपयोग करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतात. त्यामुळे ही चेहऱ्यावर केस उगवू शकतात.
४. 21- hydroxylase या harmons कमतरतेमुळे –
⇒ शरीरामध्ये 21- hydroxylase या हरमनच्या कमतरतेमुळे ही चेहऱ्यावर केस येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
५. हार्मोन सिक्रेट होतात त्या ठिकाणी काही आजार झाल्यामुळे –
⇒ आपले harmons जिथून secrete होतात त्या जागेवर काही ट्यूमर वगैरे होत असेल तर त्यामुळे याचा प्रॉब्लेम बघायला मिळतो.
६ . अनुवंशिक कारणामूळे –
⇒ कुटुंबातील सदस्यांना जर असा प्रॉब्लेम असेल, तरीदेखील तुम्हाला हा त्रास होण्याचे चान्सेस असतात.
चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी काय उपाय करावेत ?
⇒ जास्त कॉस्मेटिक्सच्या वापरामुळे ही चेहऱ्यावर केस येऊ शकतात कारण त्यामध्ये अँड्रोजन हे हार्मोन वाढवणारे केमिकल्स वापरलेले असू शकतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तर तुम्हाला हे कॉस्मेटिक्स च्या वापराने हा त्रास होत असेल तर ते वापरण त्वरित बंद केले पाहिजे.
⇒ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे तसेच तेरॉईस घेतल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असेल, तर ते घेणे ही लगेच बंद केले पाहिजे.
⇒ चेहऱ्यावर जास्त प्रमाणात असलेले केस कायमस्वरूपी घालवण्यासाठी तुम्ही लेझर ट्रीटमेंट ची मदतही घेऊ शकता. लेझर ट्रीटमेंट महाग जरी असली, तरी कायमस्वरूपी हा उपाय तुम्ही करू शकता.
समारोप –
मित्रांनो या लेखांमधून आपण मुलींच्या चेहऱ्यावर केस का येतात याबद्दल माहिती बघितली. आणि त्याची कारणे ही बघितली. अन्य आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!