आपल्या रक्तामध्ये सर्वात जास्त भाग हा लाल रक्तपेशींचा (RBC) आणि या लाल रक्तपेशींचे काम असतं आपल्या शरीरातील ऑक्सिजन पूर्ण शरीरात पोहोचवणे आणि कार्बन डायऑक्साइड परत घेऊन जाण्याचे काम हे करतात. आपल्या रक्तातील जो घटक हे काम करतो त्याला हिमोग्लोबिन असे म्हणतात. हिमोग्लोबिन आपल्या रक्तामधील प्रमुख घटक असतो. जो फुफ्फुसांमधील ऑक्सिजन वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवतो. आपल्या शरीरात या हिमोग्लोबिनचे प्रमाण अगदी योग्य असले पाहिजे. चला तर मग हिमोग्लोबिन म्हणजे नक्की काय ? हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे कोणती आहेत ? हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय करावे ? हे सविस्तरपणे आपण या लेखांमधून बघू.
हिमोग्लोबिन म्हणजे काय ?
आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन हे एक पावरफुल प्रोटीन आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. प्रत्येक प्रोटीन हे लोह असलेल्या हेम गटाशी संबंधित आहे. ज्यामुळे हिमोग्लोबिन फुफुसातील ऑक्सिजन शी जोडला जातो आणि आवश्यक त्या टिशूज आणि अवयवांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचवतो. शरीरातील विविध भागांपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे महत्त्वाचे काम करण्यासोबतच तो रक्तातील पीएच लेवल मेंटेन ठेवण्याचा कामही करतो. तयार झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइड परत खूपसांपर्यंत घेऊन जाण्यास सही मदत करतो. चला तर मग आता हिमोग्लोबिनच्या महत्त्वाच्या कामाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ.
रक्तातील हिमोग्लोबिनचे काम –
1. ऑक्सीजनचे वहन –
हिमोग्लोबिनचे एक महत्त्वाचे काम म्हणजे पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करणे. शरीरात हिमोग्लोबिन नसेल तर अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा धोक्यात येईल त्यामुळे सेल्युलर डीस फंक्शन होते आणि अवयव निकामी होतात.
2. कार्बन डाय-ऑक्साइडचे वहन –
हिमोग्लोबिन ती शूज आणि बाकी अवयवांमधील कार्बन डाय-ऑक्साइड घेऊन ते परत फुफ्फुसांमध्ये मध्ये नेण्यास मदत करते. शरीरातील co2 बाहेर काढून टाकल्याने शरीरात विषारी टाकाऊ पदार्थ साचत नाही आणि आम्ल संतुलन व्यवस्थित राहण्यासाही मदत होते.
3. रक्ताचा रंग, गुण ठरवितो –
हिमोग्लोबिन आपल्या रक्ताला रंग आणि स्पेसिफिक वैशिष्ट्ये देण्यासाठी, आपल्या शरीरातील विविध समस्यांचे संकेत देण्यामध्ये हे महत्त्वाची भूमिका बजावतो.
4. आरोग्य स्थिती दर्शवतो –
आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची लेवल ही आपल्या आरोग्याची स्थिती दर्शवते. जसे लोहाची कमतरता, अशक्तपणा, रक्ताचे विकार, विटामिन ची कमतरता, आणि इतर आजार आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नियमित आपल्या हिमोग्लोबिनचे निरीक्षण करणे गरजेचे असते.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले की आपल्याला काही लक्षणे दिसून येतात ती आता आपण बघू.
हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असण्याची लक्षणे –
⇒ अति थकवा जाणवणे
⇒ धाप लागणे
⇒ हातपाय थंड होणे
⇒ अशक्तपणा जाणवणे
⇒ मेहनत न करू शकणे
शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर दिसून येणारी लक्षणे आपण बघितली आता आपण हिमोग्लोबिन कोणत्या कारणाने कमी होऊ शकतो ते बघूया.
रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे –
⇒ हिमोग्लोबिन कमी होण्याचे सामान्य कारण म्हणजे लोहयुक्त तसेच पोषण युक्त आहार न घेणे. योग्य संतुलित आहार न घेतल्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमी निर्माण होते.
⇒ बोन मॅरो मध्ये काही खराबी असेल किंवा काही आजारामुळे हिमोग्लोबिन कमी प्रमाणात बनतो.
⇒ किडनी खराब झाल्यामुळे ही हिमोग्लोबिन बनने खूप कमी होते.
⇒ मासिक पाळीच्या काळात स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
⇒ काही कॅन्सर मुळे, इन्फेक्शन मुळे देखील हिमोग्लोबिन कमी होते.
हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे आपण वर बघितली. आता आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे ते बघूया.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी हे खा –
शरीराला जास्त हिमोग्लोबिन हे हिरव्या पालेभाज्या मधून तसेच मीट मधूनही मिळते. त्याशिवाय सोयाबीन, डाळी, आटा ग्रेन्स, तांदूळ यामधूनही शरीराला हिमोग्लोबिन मिळते. हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंद आणि डाळिंब सारखी फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता. तसेच खजूरही भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत करतात म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूरही जरूर खाल्ले पाहिजे.
रक्तामध्ये हिमोग्लोबिनची पातळी किती हवी ?
सुरुवातीपासून आपण हिमोग्लोबिनची पातळी योग्य असल्याबद्दल बोलत आहोत. पण मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण नक्की किती असावे. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? चला तर बघूया. मानवी शरीरात हिमोग्लोबिनची पातळी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. ती वय, लिंग, अनुवंशिकता आणि अंतर निर्मित वैद्यकीय परिस्थिती या घटकांवर अवलंबून असते. तरीदेखील सामान्य साठी असणाऱ्या सामान्य खालील प्रमाणे आहेत.
मूल्य स्त्रियांसाठी. पुरुषांसाठी.
सामान्य → 11 ते 15.g/dL 13 ते 17 g/dL
श्रेणी
रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही टिप्स –
1.संतुलित आहार घ्यावा –
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवण्यासाठी जीवनसत्वे, खनिजे आणि पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे. संपूर्ण पोषण असलेला आहार घेतल्याने शरीरात हिमोग्लोबिन बाणांस मदत होते.
2. नियमितपणे व्यायाम करावा –
ब्लड सर्कुलेशन आणि ऑक्सिजनचे व्यवस्थित वाहन होण्यासाठी शरीराला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. जे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यात मदत करते. म्हणून चांगल्या आरोग्यासाठी आणि हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे
3. तणाव कमी करा –
तणावामुळे देखील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. म्हणून तणाव दूर ठेवण्यासाठी आपण पाऊले उचली पाहिजेत आणि आनंदी जीवन जगले पाहिजे.
समारोप –
या लेखामध्ये आपण हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे कोणकोणती आहेत ? हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय करावे ? आणि आपला शरीरात हिमोग्लोबिनची कामे काय आहेत हे सविस्तरपणे समजून घेतले. आपला शरीरात हिमोग्लोबिनची लेवल किती हवी ते पण बघितले आणि शेवटी हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवण्यासाठी काही टिप्स हि बघितल्या. तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली विचारू शकता. अन्य आरोग्यविषयक पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏