पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्यापैकी बहुतेकांना हा त्रास अधून मधून होत असतो. ही समस्या पचनामध्ये आलेल्या बिघाडामुळे होते. पचायला जड असलेले अन्न खाल्ल्यामुळे, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे ही गॅसेसचा त्रास होऊ शकतो. या लेखामध्ये तुम्हाला पोटात गॅस होण्याची लक्षणे कोणती असतात, कारणे आणि घरच्या घरी करता येतील असे काही घरगुती उपायही वाचायला मिळतील. चला तर मग सुरुवातीला आपण पोटात गॅस होण्याची कारणे कोणती असू शकतात ते बघूया.
# पोटात गॅस होण्याची कारणे –
1. अवेळी खाल्ल्यामुळे तसेच अति प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील अन्नाचे नीट पचन होत नाही. हे अन्न जेव्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये जाते, तेव्हा तेथील बॅक्टेरिया या अन्नावर कार्य करतात. त्यामुळे गॅस मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो.
2. चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ हे जास्त प्रमाणात घेत असाल, तरी देखील पोटातील अग्नी बंद होते त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि गॅस निर्माण होतो.
3. प्रोसेस किंवा पॅकेज्ड फूड जसे ब्रेड, जाम, सॉस आणि इतर पॉकेट मधले फूड यांचा नाश्ता आणि जेवणामध्ये जास्त प्रमाणात वापर करत असाल तर तुम्हाला गॅस होण्याचे प्रमाण वाढू शकतं.
4. पचायला जड असणारे पदार्थ जसे – आंबवलेले पदार्थ, दही, वडा, पावटा, बेसनाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्टस हे पचायला जड असतात. जेव्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये हे जातात तेव्हा तिथले बॅक्टेरिया त्याला पचवण्यासाठी जास्त गॅस तयार करतात मग गॅसेसचा त्रास सुरू होतो.
5. घाई मध्ये आणि नीट चावून न खाल्ल्यामुळे आपली लाळ अन्नासोबत मिसळली जात नाही. आपल्या लाळे मध्ये अमायलेज, लॅक्टोज, पपाईन डायजेस्टिव एंजाइम असतात. जे पोटात गेल्यावर अन्न पचायला मदत करतात. घाई घाईत जेवल्यामुळे ही Saliva अन्नामध्ये मिक्स होत नाही म्हणून अन्नाचे नीट पचन होत नाही त्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होतो.
# पोटात गॅस होण्याची लक्षणे –
पोटामध्ये गॅस झाल्यावर खालील लक्षणे दिसून येतात. या लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला होत असलेला त्रास पोटातल्या गॅसेसमुळे होत आहे की कोणत्या अन्य कारणामुळे.
⇒ पोट गच्च होणे / थोड खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणे
⇒ पोट फुगणे – पोटाचा आकार नेहमीपेक्षा वाढणे आणि पोट जड झाल्यासारखे वाटणे
⇒ पोटात गॅस होणे/ पोटातून गॅस बाहेर पडणे
⇒ खालच्या ओटीपोटात दुखणे – यामध्ये काहींना बेंबीच्या आसपासच्या भागामध्ये, काहींना पोटाच्या साइडच्या भागांमध्ये तर काहींना पोट आणि छातीच्या मध्यभागी दुखते. आणि हे दुखणे सतत नसते. कधी दुखते मग बसते नंतर परत दुखते असं होत.
⇒ डोकेदुखी होणे
⇒ अतिसार (जूलाब)
⇒ छातीत जळजळ होणे
⇒ पोटात कळा येणे
# पोटात गॅस झाल्यावर करता येतील असे घरगुती उपाय –
पोटात गॅस होण्याची लक्षणे आपण वर बघितली. आता आपण घरच्या घरी करता येतील असे सोपे घरगुती उपाय बघू.
» पाव चमचा ओवा पावडर भाजून घ्या. हे कोमट पाण्यामध्ये टाकून प्या. असे दोन-तीन दिवस रोज करून बघा यामुळे आराम मिळतो.
» गॅस पासून सुटका मिळवण्यासाठी हिंग देखील खूप फायद्याचे ठरते. ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा हिंग मिसळून प्यायला गॅस मध्ये आराम मिळतो.
» अर्धा चमचा बडीशेप पावडर घ्या त्यामध्ये चिमूटभर सुंठ पावडर आणि पाव चमचा धन्याची पावडर टाका हे ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून प्या. तीन दिवस दररोज सकाळी हा उपाय करा. तुम्हाला गॅसेस मध्ये आराम मिळेल.
» पोटावर योग्य पद्धतीने मसाज केल्याने ही पोटातील गॅस बाहेर पडायला मदत होते. यासाठी पाठीवर झोपून वेदना होणाऱ्या ठिकाणी सर्कुलर मोशन मध्ये हळुवारपणे मसाज करा.
» पोटातील गॅस कमी करण्यासाठी तुम्ही जेवण झाल्यावर दहा पंधरा मिनिटे तरी वज्रासनामध्ये बसलं पाहिजे यामुळे पोटात तयार झालेले गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते आणि अन्नाचे नीट पचन देखील होते. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल ते शतपावली देखील करू शकतात. जेवण झाल्यानंतर शंभर पावले चालल्यामुळे देखील पचन सुधारण्यास मदत होते.
# पचनशक्ती सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी खालील उपाय करा –
⇒ योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खा.
⇒ प्रोसेस्ड फूड खाणे टाळा. महिन्यातून एखाद दोन वेळेस खाऊ शकता पण सतत त्यांची सेवन करणे टाळले पाहिजे.
⇒ व्यायाम जरूर केला पाहिजे त्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
⇒ पचायला जड असणारे अन्नपदार्थ खाणे टाळा.
⇒ फायबर युक्त आहार घ्या. हे अन्नपचनामध्ये मदत करते.
⇒ धूम्रपान तंबाखू अल्कोहोल चे सेवन टाळा.
समारोप –
तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण पोटात गॅस होण्याची लक्षणे कारणे आणि त्यासोबतच काही घरगुती उपाय आहे बघितले. तू जर तुम्हालाही गॅसेसचा त्रास होत असेल तर हे उपाय करून बघा. तुम्हाला नक्की फायदा मिळेल. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!