डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याची कारणे आणि काय उपाय करावेत

डोकेदुखीचा त्रास हा जवळपास सर्वांनीच अनुभवलेला असतो. वय कमी असो किंवा अधिक डोकेदुखी ही सर्वांना कधी ना कधी होत असते. तिची तीव्रता कोणामध्ये कमी तर कोणामध्ये जास्त आढळून येते. पण जास्त त्रास होत असेल तर दैनंदिन कामात अडथळे ही डोकेदुखी निर्माण करते आणि वेदनाही खूप त्रासदायक असतात. डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार असतात. या लेखामध्ये आपण डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याची कारणे आणि काय उपाय करावेत ते बघणार आहोत.

अनेकांना डोक्याचे मागच्या बाजूस होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास होत असतो. अशा प्रकारची डोकेदुखी ही सामान्य प्रकारांपैकी एक आहे. हे दुखणे डोक्याच्या एका कोपऱ्यापासून सुरू होते नंतर हळूहळू आसपासच्या भागात आणि नंतर पूर्ण डोक्यामध्ये पसरते.

डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याची कारणे आणि काय उपाय करावेत

# डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होण्याची कारणे –

अशा प्रकारची डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोक्याच्या मागच्या भागाला झालेली दुखापत आणि अन्य कारणे जसे लिंफनोड मध्ये आलेली सूज, ऑक्सीपिटल न्यूरोलॉजीया, सायनोसायटीस, याशिवाय ताण तणाव तसेच गॅसेसच्या समस्येमुळेही डोक्याच्या मागच्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अन्य काही कारणे आपण खाली बघू.

1. मानेमध्ये एकावर एक असे सात छोटे छोटे डिस्क एकमेकांवर ती शेपमध्ये ठेवलेल्या असतात. त्यांच्या जोड (संधी) मध्ये जेव्हा वयानुसार ठिसूळपणा निर्माण होतो चेंजेस होतात त्यामुळे अशा प्रकारची डोकेदुखी होऊ शकते.

2.  कधीकधी कार एक्सीडेंट किंवा दुखापतीमुळे हे असे दुखणे होऊ शकते.

3. मानेच्या मसल्स मध्ये स्पॅजम असेल त्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते. कधी कधी मानेच्या डिस्कचा प्रॉब्लेम असेल आणि ते नसावर प्रभाव टाकत असेल त्यामुळे ही हा त्रास होऊ शकतो.

4. चुकीच्या posture मुळे. म्हणजे मानेला खूप वेळपर्यंत एकाच दिशेमध्ये ठेवल्यामुळे किंवा जास्त वेळ पुढच्या दिशेमध्ये वाकून काम केल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

तुम्हाला होणाऱ्या मानदुखी, डोकेदुखीचे कारण हे चुकीच्या उशीच्या वापर हेही असू शकते शकते.

# कसे ओळखाल की तुमच्या मान दुखी डोकेदुखीचे कारण हे तुमची उशी आहे ?

⇒ जर दिवसभर काम करून थकल्यानंतर जेव्हा रात्री तुम्ही झोपता तेव्हा झोपल्यावर जर तुम्हाला सारखे जाग येत असेल किंवा सकाळी उठल्यावर मान दुखत किंवा अकडल्यासारखी वाटत असेल तर तुम्हाला उशी बदलण्याची गरज आहे.

⇒ आणि जर तुम्ही रात्री शांत गाढ झोपत असाल आणि सकाळी उठल्यावर मान वगैरे दुखत नसेल तर तर मात्र तुम्ही वापरत असलेली अशी बरोबर आहे तुम्ही ती पुढेही वापरू शकता.

⇒ उशीमुळे जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला जास्त मोठ्या उशीवर झोपणे टाळले पाहिजे. कारण यामुळे तुमच्या मांसपेशींना योग्य सपोर्ट मिळत नाही. त्या स्ट्रेच होतात. आणि उशी न घेणं हे सुद्धा योग्य नाही. त्यामुळे ही तुमची मान आणि शरीर अलाइन राहू शकणार नाही आणि मान जास्त खाली राहिल्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासाठी तुम्ही अशा उशीचा वापर केला पाहिजे त्यामुळे तुमच्या मानेला योग्य सपोर्ट मिळेल. तुम्ही Cervical pillow  चाही वापर करू शकता.

फ्रेंड्स, आता आपण डोकेदुखी थांबवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय बघणार आहोत –

# डोक्याच्या मागील भागातील डोकेदुखी थांबवण्यासाठी सोपे उपाय –

बहुतेकांना डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याचा त्रास होत असतो. अशा डोकेदुखी मुळे बसायला तसेच झोपायलाही खूप त्रास होतो, तर तुम्हीही डोक्याच्या मागच्या बाजूस होणाऱ्या दुखण्यामुळे  त्रस्त असाल तर, हे घरगुती उपाय करून बघा यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

1. दालचिनी काळी मिरी मधाचा काढा –

त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये दालचिनीचा तुकडा तीन-चार काळीमिरी घेऊन हे मिश्रण पाण्याची क्वांटिटी हाफ होईपर्यंत उकळा नंतर यामध्ये एक चमचा मध टाकून प्या तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील टाकू शकता.  जर डोक्याच्या मागच्या बाजूला होत असलेली डोकेदुखी पोटातील गॅसेस मुळे होत असेल, तर हा काढा तुम्हाला आराम देण्यात खूप मदत करेल.

2. हेड मसाज –

कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असली तरी कोमट तेलाने मालिश केल्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे ताण तणाव दूर होऊन मांसपेशींना आराम मिळतो आणि तुम्ही रिलॅक्स फिल करता. हा डोकेदुखी वरील पावरफुल घरगुती उपायांपैकी एक उपाय आहे. यासाठी तुम्ही बदामाच्या, ऑलिव्ह ऑइलच्या, नारळाच्या किंवा तिळाच्या कोणत्याही तेलाचा वापर तुम्ही करू शकता. पण हेड मसाज तुम्ही जरूर केलं पाहिजे.

3. दूध आणि चिंचेचा उपयोग –

या उपायासाठी तुम्हाला दूध घ्यावे लागेल. यासाठी अर्धा लिटर दुधामध्ये तीन तोळे चिंच एका तासासाठी भिजत ठेवा. चिंच घेण्याआधी ती गरम पाण्याने धुऊन मगच घ्या. या दुधाला उकळायला ठेवा जोपर्यंत दूध फुटत नाही तोपर्यंत उकळू द्या दूध फुटल्यावर पनीर वेगळे करून घ्या आणि उरलेल्या पाण्या मध्ये थोडी साखर घालून गरजेप्रमाणे थोडे थोडे प्या. हा उपाय चार दिवस केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असली तरी ती दूर होण्यास मदत होते हा खूप पूर्वीपासून करत चालत आलेला उपाय आहे.  आणि डोकेदुखी मध्ये आराम देण्यात फायदेशीर आहे.

4. टॅपिंग टेक्निक –

आपले केस मागेच्या ठिकाणी संपतात त्याच्या थोड्या वर्षा बाजूला आपल्या दोन्ही हाताच्या मिडल फिंगरला ठेवा आता फर्स्ट फिंगर ने मिडल फिंगर च्या वर टॅप करा कमीत कमी दीड ते दोन मिनिट असे टाईप करत रहा असे केल्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारचे डोकेदुखीची लक्षणे दूर व्हायला लागतील आणि तुम्हाला चांगलं वाटेल.

5. स्ट्रेचिंग टेक्निक –

ही टेक्निक करण्यासाठी आधी एका ठिकाणी बसा. नंतर तुमच्या chin ला डाव्या खांद्याच्या दिशेने टेकवा. त्यानंतर त्याच पोझिशनमध्ये डावा हात डोक्यावर ठेवून डोकं पुढच्या दिशेला पूल करा. दहा पंधरा सेकंद अशाच स्थितीमध्ये राहा नंतर उजव्या बाजूने हीच क्रिया करा त्यानंतर याची तीन वेळा रिपीटेशन करा हे तुम्ही कधीही करू शकता ऑफिसमध्ये स्टडी करत असाल किंवा टेन्शन येत असेल, डोकं दुखत असेल तेव्हा तुम्ही हे केले तर खूप फ्रेश फील करा व.

समारोप –

तर फ्रेंड्स, आपण या लेखामध्ये आज डोक्याच्या मागील बाजूस दुखण्याची कारणे आणि कोणते उपाय घरच्या घरी करू शकतो ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस, डोकेदुखीपासून इन्स्टंट आराम मिळेल असे काही उपायही बघितले. तसेच मानदुखी आणि मागील बाजूस डोकेदुखी हि आपल्या उशीमुळेही होऊ शकते या बद्दल पण आपण माहिती बघितली. तुम्हाला हि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हे उपाय नक्की करून बघा. आरोग्य विषयक अन्य माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top