आपला चेहरा गोरा सुंदर असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. आपल्या चेहऱ्यावरील पिंपल, डाग, वयानुसार येत असलेल्या सुरकुत्या दूर करून चेहरा उजळण्यासाठी, चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला या लेखांमध्ये वाचायला मिळतील. मित्रांनो बाजारात मिळणाऱ्या स्किन प्रॉडक्ट च्या वापराने आपल्याला चांगले रिझल्ट तर मिळू शकतात. पण त्यामध्ये केमिकलचा उपयोग केलेला असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम ही आपल्या चेहऱ्यावर होत असतात. म्हणून घरगुती उपाय कधीही फायदेशीर ठरतात.
हल्ली आपल्या चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो हा हरवलेला दिसतो. आणि मेअपशिवाय चेहरा निस्तेज दिसायला लागतो. याची खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. अनहेल्दी लाईफस्टाईल, फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे तसेच वाढत्या वयानुसार चेहऱ्याची चमक, moisture कमी व्हायला लागते आणि योग्य ती काळजी न घेतल्यास त्वचा काळी पडू लागते काही आजारामुळे ही त्वचा काळी पडू शकते. उन्हात खूप वेळ गेल्यामुळे ही त्यामुळे त्वचा काळी पडते. त्वचेचा कलर सुधारण्यासाठी आणि चमकदार बनण्यासाठी काही घरगुती आता आपण बघू –
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Dark Skin In Marathi
1) टोमॅटो –
टोमॅटो हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप बेनिफिशियल आहे.
१. टोमॅटो हाफ कट करून त्यावर साखर टाका आणि याने पूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर हळुवारपणे सर्कुलर मोशन मध्ये मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील dead skin निघून जाऊन चेहरा स्वच्छ आणि क्लीन होतो.
२. तुम्ही टोमॅटोचा फेस पॅक ही बनवू शकता. त्यासाठी टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. 1 चमचा एलोवेरा जेल 2-3 ड्रॉप्स tea tree essential oil (टी ट्री इसेन्शियल )ओईल टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटे राहू द्या नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका.
( Note– कोणताही फेस पॅक लावल्यानंतर चेहरा हा नेहमी थंड पाण्याने धुतला पाहिजे. )
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. चेहऱ्याचा हरवलेला ग्लो परत आणण्यास आणि चेहरा उजळण्यास हा उपाय उपयुक्त आहे.
2) मध –
मध ही आपल्या स्किन साठी खूप चांगले आहे.
१. एक चमचा मधामध्ये चिमूटभर हळद घ्या. हे मिश्रण तुम्ही आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. यामुळे ही चेहरा उजळतो. हळद skin colour लाईट करायला मदत करते.
२. 1 चमचा मधामध्ये 1-2 चमचे कॉफी पावडर मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. दोन-तीन मिनिटे हळुवारपणे मसाज करा. पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या नंतर चेहरा धुऊन टाका. चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी हा पण एक प्रभावी उपाय आहे.
3) मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ –
तांदळाचे पीठ ही आपल्या स्किन साठी बेस्ट असते.
१. एक चमचा तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती 1-2 चमचे एलोवेरा जेल, 1 चमचा गुलाब जल, 3-4 थेंब टी ट्री इसेन्शियल ओईल/ बदामाचे तेल टाका याची स्मूथ पेस्ट बनवा. मिश्रण थोडे घट्ट वाटल्यास तुम्ही गुलाबजल add करू शकता ही पेस्ट चेहऱ्याला लावा. सुकल्यावर किंवा थोड्या वेळा पंधरा ते वीस मिनिटांनी धुऊन टाका. या उपायानेही चेहरा गोरा होण्यास मदत होते.
खूपच प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही हा एकदा करून बघितला पाहिजे.
( Note– अधिक चांगल्या परिणामांसाठी हे फेस पॅक लावणे आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे टोमॅटो स्लाईस आणि साखर घेऊन चेहरा क्लींस करावा म्हणजे जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतील)
4) बटाटा –
चेहऱ्यावरील काळेपणा उन्हामुळे झालेल्या टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा हा खूप उपयुक्त आहे.
१. एक चमचा बटाट्याचा रस घ्या. यामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस आणि थोडी हळद टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा चेहऱ्यासोबत हे तुम्ही मानेला तसेच हातापायांनाही लावू शकता.
२. बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावल्याने काळेपणा दूर होऊन चेहरा ग्लोइंग बनण्यास मदत होते.
5) दूध-
त्वचेचा कलर उजळण्यासाठी कच्चे दूध खूप उपयुक्त आहे.
१. कच्चे दूध घ्या कापसाच्या बोळ्याने पूर्ण चेहऱ्याला लावा. सुकू द्या नंतर धुऊन टाका. यामुळे चेहऱ्याचा मळ निघून जाण्यास मदत होते. आणि त्वचेवरील काळेपणाही दुधामुळे दूर होतो.
सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळ तुम्ही याचा उपयोग करू शकता. ऑईली स्किन वाले सोडले तर बाकी स्किन टाईप वाले हा उपाय नक्कीच करू शकता.
6) वाफ/ स्टीम घ्या –
चेहऱ्यावर स्टीम किंवा वाफ घेणे हे खूप फायद्याचे ठरते. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावरील बंद असलेली रोम छिद्रे खोलले जातात आणि dead skin पण दूर होते. ज्यामुळे त्वचा आतून साफ होते आणि रंग त्वचेचा रंगही सुधारतो. म्हणून तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर वाफ ही घेतली पाहिजे. week मधून २ ते ३ वेळा तुम्ही फेस स्टीम हि घेतलीच पाहिजे.
7) फेसऑइल मसाज –
चेहऱ्याची चांगल्या फेस ओईल ने मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. चेहऱ्यावर तुम्ही बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल चा वापर करू शकता. रात्री तोंड स्वच्छ धुऊन घ्या. थोडं तेल आपल्या हातामध्ये घेऊन सर्क्युलर मोशन मध्ये हळुवारपणे चेहऱ्याची मालिश वरच्या दिशेने करा दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही करू शकता. यामुळे स्किनचे टेक्स्चर सुधारण्यात मदत होते आणि स्किनही ग्लोइंग बनते.
8) संत्र्याच्या सालीची पावडर –
संत संत्र्यांच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते संत्र्यांची साले सुकवून त्याची पावडर करून घ्या यामध्ये दूध मिक्स करून पेस्ट बनवून घ्या यात चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण नीट मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला तसेच मानेला लावून घ्या वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका याच्या नियमित वापरा वापराने काळेपणा दूर होऊन त्वचेचा रंग उजळतो.
9) बेसन –
बेसनाचा उपयोग पूर्वीपासून आपल्याकडे केला जातो. एक-दोन चमचे बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि गुलाबजल टाकून. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा पंधरा-वीस मिनिटांनी धुऊन टाका या तसेच कोणत्याही घरगुती उपायांचा फरक हा तुम्हाला नियमित वापराने जाणवेल. म्हणून काही दिवस नियमित यांचा वापर करून बघा नक्की फरक पडतो.
10) मुबलक प्रमाणात झोप घ्या –
जर रोज तुम्ही आठ तास झोप घेत नसाल, तर हे तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम करू शकते. झोपेमध्येच त्वचेला आणि शरीराला पूर्ण आराम मिळत असतो. म्हणून व्यवस्थित झोप घेतल्याने त्वचा तजेलदार बनण्यास मदत होते.
चेहरा उजळण्यासाठी काही उपयुक्त टिप्स –
- केमिकल प्रोडक्टचा वापर करणे टाळावे रोज रोज मेकअप करणे ही आपण टाळले पाहिजे.
- नियमितपणे वाफ घेतल्याने चेहरा उजळण्यात मदत खूप मदत होते.
- week मधून एकदा तुम्ही आपला चेहरा scrubच्या साहाय्याने एक्सफॉलीयेट केला पाहिजे. यामुळे dead skin निघून जाण्यास मदत होते.
- जेवढे होईल तेवढं उन्हापासून स्वतःला वाचवलं पाहिजे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर आपल्या त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे सूर्याच्या युवी लाईट पासून त्वचे संरक्षण होते म्हणून बाहेर जाताना स्टार छत्रीचा उपयोग करा तसेच संस्कृतही लावले पाहिजे.
- तुम्ही मेकअप करत असाल आणि किंवा नसाल रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे.
- पोषण युक्त आहार हा तुम्ही घेतलाच पाहिजे. जसे आपण खातो तसे दिसतो. विटामिन के, सी, ई आणि झिंक (Zinc) हे तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. म्हणून या व्हिटॅमिन्स चा आहारात समावेश केला पाहिजे आणि जंक फूड पासून दूर राहिले पाहिजे.
समारोप –
मित्रांनो या लेखामध्ये आपण चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय बघितले. चेहरा गोरा सुंदर बनवण्यासाठी महागड्या क्रिम्स लावण्याची आणि ब्युटी पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही कारण घरीच उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून पार्लरसारखेच रिजल्ट्स आपल्या स्किनवर बघू शकता. मी स्वतः पण यातल्या काही उपाय स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते. जो तुम्हाला आवडतो तो उपाय तुम्ही करू शकता. पण तो नियमितपणे करणे हे गरजेचे आहे. तरच तुम्हाला व्हिजिबल रिजल्ट्स दिसतील. जास्त नाही ३ ते ४ आठवडे तुम्ही हे उपय करून बघा आणि तुम्हाला मिळालेले रिजल्ट्स कॉमेंट मध्ये सांगू शकता.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
Pingback: चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल