वाचा धाप लागल्यावर करता येतील असे सोपे घरगुती उपाय

मित्रांनो, अनेकदा काही व्यक्तींना व्यायाम, ओझे उचलणे अशी शारीरिक कष्टाची कामे केल्यावर धाप लागते. ते तर सामान्य आहे. फिटनेसच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं; पण काहींना चालतानाही धाप लागते, ही अत्यंत गंभीर बाब असू शकते. धाप लागण्याची कारणे काय असतात, त्याकडे कधी लक्ष दिले पाहिजे आणि कधी दुर्लक्ष केले पाहिजे, त्याची लक्षणे कोणती, डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे, तसेच धाप लागल्यावर करता येतील असे घरगुती उपाय कोणते करावेत हे तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल.

सुरुवातीला आपण बघू धाप किंवा दम लागणे आपण ज्याला म्हणतो तो का लागतो :-

धाप लागल्यावर करता येतील असे सोपे घरगुती उपाय

# धाप / दम लागण्याची कारणे :-

आपण खूप जोरात धावलो, व्यायाम केला , swimming वगैरे केल्यावर आपल्याला धाप लागते. श्वास पुरत नाहीये असं वाटतं. असं का होतं? त्यामागचं वैद्यानिक कारण काय आहे? तर यामध्ये काय होतं, जेव्हा आपण श्रम करतो तेव्हा आपल्याला जास्त ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा शरीराकडून glucose + oxygen च्या माध्यमातून पूर्ण होत असते.

आपण जेवढे जास्त श्रम करू तेवढी जास्त ऊर्जेची गरज आपल्याला भासेल आणि तेवढं जास्त glucose आणि oxygen खर्च करावं लागेल.जेव्हा आपण jogging , running यासारख्या exercises करतो तेव्हा कमी वेळात जास्त energy आपण वापरात असतो. त्यामुळे तिची गरज जास्त निर्माण होते .जसे आपण वर बघितले energy पुरवण्यामध्ये oxygen पण लागतो. जेवढा oxygen खर्च होईल मग तेवढा रक्तामधील अधिक oxygen वापरला जातो आणि रक्तामधील oxygen वापरला गेल्यावर त्याची अधिक गरज निर्माण होते.

हा oxygen रक्तामध्ये फुप्फुसांच्या माध्यमातून येत असतो. फुप्फुसांमध्ये हा oxygen जमा होण्यासाठीच आपल्याला धाप लागते. अशा प्रकारे धाप लागणे हे सामान्य आहे. थोडा वेळ आराम केला, मोकळ्या हवेत बसलं तर आपोआप आपल्याला बरं वाटायला लागतं.

आयुर्वेदमध्ये धाप लागण्याचे २ प्रकारात विभाजन केलं आहे.

1)श्रमज श्वास – म्हणजे श्रम केल्यावर लागणारी धाप. त्याबद्दल आपण वर बघितले.

2)क्लम श्वास – म्हणजे श्रम न करता लागणारी धाप. या धापेसोबत अशक्तपणा, गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे पण दिसून येतात.

सामान्यतः धाप लागण्याची ३ कारणे असू शकतात –

१] पहिलं कारण म्हणजे फिटनेसची कमी हे असू शकत. जास्त श्रम करण्याची सवय नसेल तर सुरुवातीला असा त्रास होतो. मग सवय झाल्यावर हा त्रास आपोआप कमी होतो.

२] दुसरं कारण म्हणजे लठ्ठपणा. जास्त वजन असलेल्या लोकांना दम लवकर लागतो. कारण फुप्फुसांत मुबलक प्रमाणात oxygen चा पुरवठा होत नाही.

३] तिसरं कारण म्हणजे ताणतणाव. जे लोक खूप तणावामध्ये असतात त्यांनाही श्वास घेण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यांना छातीमध्ये जडपणा जाणवतो. त्यामुळे श्वास घेण्याची गती मंदावते.

या सामान्य कारणांसोबतच अन्य काही कारणांमुळे ही धाप लागू शकते. ती कारणे आता आपण बघू.

१. ऍनिमिया म्हणजे रक्ताची कमी असेल तरी धाप लागू शकते. जसं आपण सुरुवातीला बघितले की ऊर्जा बनवायला शरीरातील oxygen चा important रोल असतो आणि रक्ताची कमी असेल तर ओक्सयजन ची कमी ही आपोआप तयार होते आणि मग श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

२. ह्र्दयाच्या आजारांमुळे ही धाप लागू शकते. जसे अंजायना तसेच हार्ट मध्ये blockages असतील आणि हार्ट मध्ये hole असले तरी धाप लागू शकते.

३. हृदयाशिवाय फुप्फुसांच्या आजारामुळेही धाप लागू शकते. जसे अस्थमा (वेगवेगळ्या प्रकारचे अस्थमा यामध्ये येतात) , फुप्फुसांचे infection किंवा कोणत्या तरी कारणाने फुफुसांना सूज अली असेल तरी धाप लागते.

४. वातावरणामुळे म्हणजे अति उष्ण वातावरणामध्ये सुद्धा धाप लागू शकते.

काहींना थोड्या २-३ पायऱ्या चढल्या तरी खूप दम लागतो. असे होत असेल तर ही गंभीर बाब आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांना दाखवले पाहिजे म्हणजे ज्या कारणामुळे हे होत असेल ते माहित होऊन योग्य तो इलाज करता येईल.

# धाप लागल्यावर करता येतील असे सोपे घरगुती उपाय –

धाप लागण्याची कारणे आपण वर बघितली. आता आपण बघूया धाप लागल्यावर लगेच करता येतील असे सोपे घरगुती उपाय.

  • दम लागल्यावर एका ठिकाणी बसलं पाहिजे. बसताना आपल्या शरीराला पुढच्या दिशेला वाकून बसले पाहिजे, यामुळे श्वास घेणे सोपे होईल. जर तुमच्याकडे table वगैरे असेल तर table वर डोकं ठेऊन काही वेळ पडून राहिलात तरी आराम मिळतो.
  • याशिवाय दम लागल्यावर तुम्ही नाकाने दीर्घ श्वास घेऊन शिट्टी वाजवतो तसे ओठ करून तोंडावाटे श्वास सोडा. यामुळे पण तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ओक्सयजन मिळेल. जर तुम्ही बाहेर असाल तर दम लागल्यावर सरळ उभे राहू नका. पुढच्या दिशेला कशाचातरी आधार घेऊन वाकून उभे राहा. यामुळे श्वासाची गती नॉर्मल होण्यास मदत होईल.
  • उभे असल्यावर तुम्ही एखाद्या भिंतिचाआधार घेऊन टेकून उभे राहू शकता. यामुळे तुमच्या फुप्फुसांना सपोर्ट आणि आराम मिळेल.
  • तुळशीचे झाड सर्व घरांमध्ये असते. तुळस पण श्वासाच्या आजारांमध्ये लाभकारी आहे. तुळशीच्या पानांचा रस मधामध्ये टाकून पिल्याने आराम मिळतो आणि श्वास घेण्याची समस्या दूर होते.
  • दम लागल्यावर आल्याचा चहा पिल्यानेदेखील आराम मिळतो कारण आल्यामध्ये anti bacterial , anti viral गुणधर्म असतात. त्यामुळे हा चहा पिल्यामुळे श्वास घ्यायला होणार त्रास कमी होतो.
  • ब्लॅक कॉफी घेतल्यामुळे लागलेला दम कमी होण्यास मदत मिळते.

कधीतरी श्रमामुळे किंवा एखाद्यावेळी धाप लागल्यावर तुम्ही हे उपाय करू शकता पण जर नेहमी नेहमी धाप लागतं असेल तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे.

समारोप –

तर मित्रांनो आज आपण धाप लागल्यावर करता येतील असे घरगुती उपाय बघितले. धाप/दम लागण्याबद्दल बरीच माहिती जाणून घेतली. तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा आणि अन्य आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट जरूर द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top