अनेकदा आपल्या शरीराची उष्णता हि वाढत असते. पण उष्णता वाढणं म्हणजे नक्की काय ? आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यावर आपल्याला आतून गरम वाटणे, घाम जास्त येणे, डोळ्यांची तसेच हातापायांची जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसतात. पण हि उष्णता का वाढते त्याची करणे आणि शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे आणि हि उष्णता कमी करण्याचे उपाय हि तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळतील. म्हणून जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.सुरवातीला आपण बघू उष्णता वाढते म्हणजे नेमकं काय होत.
शरीरातील उष्णता वाढणे म्हणजे नेमकं काय ?
जेव्हा कोणी म्हणत असेल माझ्या शरीराची उष्णता वाढली आहे. म्हणजे त्याला ताप आला असतो असे नाही. त्याच्या शरीराचे तापमान सामान्य असते. तर ती व्यक्ती उष्णता वाढली असं का म्हणत असते ? तर हे दुसरं काही नसून शरीरातील पित्ताचा असमतोल आहे. पित्त म्हटलं कि बऱ्याच जणांना ऍसिडिटी म्हणजेच पित्त असं वाटतं. पण पित्त ऍसिडिटी पुरत मर्यादित नाही.
मूळव्याध सुद्धा पित्तानेच होत असतो. सर्दीसुद्धा पित्तामुळेच झालेली असू शकते. त्यामुळे पित्त व्यापक असते. हे पित्त वेगवेगळ्या कारणांनी शरीरात वाढते आणि हे जेव्हा उष्णतेमुळे वाढते त्याला आपण उष्णतेचा त्रास होतो आहे असे म्हणतो. हे पित्त म्हणजेच उष्णता शरीरामध्ये का वाढत ते आपण बघू.
शरीरामध्ये उष्णता वाढण्याची कारणे –
१. उष्णता वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी असतो आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो प्रज्वलित होत असतो. आणि अशा वेळी आपण जेवण केले नाही किंवा चहा कॉफी, पिझ्झा बर्गर सारखे फास्ट फूड खाल्ले तर हि अग्नी पूर्णपणे शांत होत नाही. आणि उष्णतेच्या माध्यमातून पूर्ण शरीरात पसरते.
२. अवेळी आणि अतिप्रमाणात खाल्ल्याने देखील शरीरातील उष्णता वाढते. तुम्ही रोज ठरलेल्या वेळेवर आणि भूक असेल तेवढच खाल्लं पाहिजे. आज तुम्ही १२ ला जेवले काल ११ ला जेवला होता तर उद्या २ ला जेवाल याला अवेळी जेवण म्हणतात. अति प्रमाणात खाणे म्हणजे आपल्याला भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे. असे केल्यामुळे शरीराला ते पचवण्यासाठी अधिक हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट करावं लागत. ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता वाढते.
३. आपल्या शरीरात वेगवेगळ्या शारीरिक क्रिया होत असतात. त्यातून अनेक विषारी घटक तयार होतात. हे toxins वेळच्या वेळी शौच च्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढून टाकणे गरजेचे असते. ते शरीरात तर जमा झाल्यामुळे ही उष्णता वाढत असते.
४. अजीर्ण झाल्यावर पुन्हा जेवल्यानेदेखील उष्णता वाढते. जेव्हा आपण आधी काही खाल्लेलं असत आणि ते पूर्ण पचलेलं नसत, त्यामुळे तुम्हाला भूक नसते. पण तरीही वेळ झाली म्हणून तुम्ही जेवण करता. यामुळे शरीरातील उष्णता वाढते.
५. पित्तकर पदार्थ म्हणजे ज्यामुळे पित्त जास्त निर्माण होते. यांचे सेवन केल्याने पण उष्णता वाढते. जसे तूरडाळ, दही, हरभरा, आंबवलेले पदार्थ, बेसन यांसारखे पदार्थ. हे जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे.
६. अनेकदा आपण खूप मसालेदार आणि अति तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खात असतो. त्यामुळे आपल्या शरीरात जास्त पित्त तयार होत. हे पित्त मग शरीरातील रक्तामध्ये मिसळून शरीराची उष्णता वाढवू शकते.
७. चहा कॉफीचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळे आणि रात्रीच जागरण, दिवसा झोपणं यामुळे पण शरीरात उष्णता वाढते.
८. अँटिबायोटिक किंवा ऍलोपॅथीच्या गोळ्यांचं जास्त सेवन केल्यामुळेही शरीरातील उष्णता वाढते.
९. आजकाल सर्वांमध्ये दिसून येणार कारण म्हणजे ताण तणाव. जास्त स्ट्रेस घेतल्यामुळेही ऍसिडिटी वाढत असते. म्हणून आपण चिंतामुक्त जीवन जगायला शिकलं पाहिजे.
मित्रांनो शरीरामध्ये उष्णता कोणकोणत्या कारणांनी वाढते ते आपण वर बघितले. आता तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली आहे का हे कसे ओळखाल ? तर त्याची लक्षणे आता आपण खाली बघूया.
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे –
१. शरीरात उष्णता वाढल्यावर दिसून येणारे सर्वात पहिले लक्षण म्हणजे खूप घाम येणे. तुम्ही फॅन खाली जरी बसले असाल तरी घाम येतो. शरीर जमा झालेली उष्णता घामावाटे बाहेर टाकतं. पण तरीही उष्णता कमी झाली नाही तर आपल्या शरीरातील इतर ओपनिंग जसे नाक,तोंड, डोळे कान यांच्या मार्फत बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.
अशा मध्ये तुम्हाला नाकातून रक्त येणे,त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे, वारंवार तोंड येणे (mouth alsar) लघवी करताना जळजळ होणे, डोळे जळजळणे, टॉयलेटला गेल्यावर जळजळ होणे अशी लक्षणे दिसून येतात.
२. उष्णतेमुळे चेहरा काळा हि पडू शकतो तसेच चाऱ्यावर पिंपल्सचे प्रमाणही वाढू शकते.
३. उष्णता वाढल्यामुळे डोकेदुखीसोबतच केसांची मूळे कमजोर होऊन केस गळणे तसेच अवेळी सफेद होणे हि लक्षणेही दिसू शकतात.
४. उष्णता वाढल्यामुळे रक्त पातळ होते. म्हणून शरीरातील कुठल्याही भगतुन रक्तस्त्राव होऊ लागतो. जसे नाकातून रक्त येते, हिरड्यामधून रक्त येते, स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त अंगावर जाते.
५. ओठ फाटणे, टाचांना भेगा पडणे अशी लक्षणेही दिसून येतात.
६. तळहात किंवा तळपाय बाकी शरीराच्या तुलनेत गरम असणे, नाका तोंडातून गरम वाफा येणे, शरीरामध्ये आतून गरम वाटणे हि पण उष्णता वाढण्याची लक्षणे असतात.
७. उष्णता वाढल्यामुळे डोळ्यांखाली काळेपणाहि येऊ शकतो. आणि तो कितीही उपाय करुन कमी होत नाही. हे पण शरीरातील उष्णतेचे एक लक्षण असू शकते.
८. बऱ्याच लोकांना तळपायाला तसेच तळहातांना खूप घाम येतो. त्याला आपण हातापायांची सर्दी असे म्हणतो. हे पण शरीरातील उष्णतेमुळे होत असते.
९. सारखी सारखी तहान लागते. हे पण उष्णता वाढल्यामुळे असू शकत.
आपण उष्णता वाढल्यावर दिसून येणारी लक्षणे वर बघितली. यामधली काही किंवा एखादे पण जर खूप प्रमाणात तुम्हाला तुमच्यामध्ये दिसून येत असेल तर तुमच्या शरीरामध्येही उष्णतेचे प्रमाण वाढलेले असू शकते. त्यासाठी कोणते उपाय तुम्ही केले पाहिजेत ते आपण खाली बघूया.
शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय –
1. शरीरातील उष्णता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पित्त म्हणून शरीरातील पित्ताची निर्मिती जिथे होते ते बंद कारणे गरजेचे आहे. त्यासाठी पोट साफ झाले पाहिजे. यासाठी तुम्ही १ कप सुंठ घातलेल्या दुधामध्ये किंवा सुंठीयुक्त कोऱ्या चहामध्ये २ चमचे एरंडेल तेल घालून तुम्ही रात्री झोपताना घेतले पाहिजे. ज्यामुळे सकाळी २-३ वेळा संडास होऊन तुमचे पोट साफ होईल आणि पित्त बाहेर निघून जाईल. तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता असेल. तर तुम्ही हे सलग २-३ दिवस घेऊ शकता.
2. उष्णता म्हणजेच पित्त. आणि पित्त कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट औषधी आयुर्वेदामध्ये सांगितली आहे ती म्हणजे तूप. आपल्या रोजच्या आहारात १ -२ चमचे तुपाचा समावेश तुम्ही केला पाहिजे.
3. १ चमचा सब्जा १ ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपताना भिजत टाका. आणि रोज सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करा.
4. ताक थंड प्रकृतीचे असते. दररोज दुपारी १ ग्लास ताक जिऱ्याची कोथिंबिरीची फोडणी देऊन घेतले पाहिजे.
5. दुर्वा – ज्या आपण गणपतीला वाहतो त्या दुर्वा मिक्सरमध्ये बारीक करून २ चमचे हि पेस्ट १ ग्लास पाण्यामध्ये टाकून हे पाणी प्या. रोज सकाळी उपाशीपोटी हे घ्या. तुम्ही सलग ७ दिवस हा रस घ्या. खूप चांगले रिजल्ट्स याचे मिळतात. हे घेतल्यावर १/२ ते १ तास काही खाऊ पिऊ नका.
6. खडीसाखर हे देखील एक उत्तम शीतकर आहे. दिवसातून कधीहि तोंडात टाकून चघळले तरी शरीरातील उष्णता कमी करण्यामध्ये मदत करते.
7. १ ग्लास कोमट पाण्यामधेय २ – ३ चमचे गुलकंद टाकून रात्रभर भिजत ठेवा. दररोज सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करा.
8. कोकम शरबत हेदेखील थंड प्रकृतीचे असते. तुम्ही सकाळी, दुपारी कधीही कोकम शरबत पिलं तरी चांगले आहे.
9. जास्त प्रमाणात आणि अवेळी खाणे तुम्ही बंद केले पाहिजे. भूक असेल तेवढेच खाल्लं पाहिजे.
10. पित्तवर्धक पदार्थ खाणे टाळले पाहिजे जसे तूरडाळ, हरभरा, हरभऱ्याची डाळ असे पचायला जाड असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
पाण्याचे प्रमाण भरपूर असलेली फळे जसे टरबूज, डाळिंब, अंजीर, मोसंबी, संत्री अशा फळांचे सेवन केले पाहिजे. तसेच मुबलक प्रमाणात पाणी हि पिले पाहिजे.
समारोप –
तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे कारणे आणि तसेच उपायही बघितले. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही तूप, ताक ह्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. हि लक्षणे तुम्हाला आढळून येत असतील तर त्याचे नक्की कारण काय आहे ते शोधून त्यावर योग्य उपाय हे वेळीच कारणे गरजेचे असते. नाहीतर उष्णतेमुळे अन्य गंभीर आजार होण्याची संभावना असते. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट यामध्ये नक्की विचारा आणि अधिक आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!