पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय

आजकाल लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. बदलेली जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळें वजन हे प्रमाणापेक्षा जास्त वाढते. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी, लुक तर बिघडतोच पण हे अतिरिक्त वजन अनेक आजारांना निमंत्रण देत असते. म्हणून वेळीच वजन कमी करणे हे आपल्या चांगल्या आरोग्यसाठी खूप महत्वाचे आहे. या लेखामध्ये आपण पोटावरची तसेच आपल्या शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय बघणार आहोत. आपल्या किचन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा उपयोग करून आणि काही सवयी बदलून आपण आपल्या शरीरावरील चरबी कमी करू शकतो. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण आपला शरीरामध्ये कॅलरी चा इन्टेक कमी केला पाहिजे आणि फॅट बर्न जास्त करायला हवे जेणेकरून आपली exess चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल. चला तर मग वळूया आपल्या उपायांकडे –

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय

# पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय –

१. कार्बोहैड्रेट कमी प्रमाणात घ्या –

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही आपल्या डाएट मधून कार्बोहायड्रेट चे प्रमाण कमी केले पाहिजे. कारण हे एक्सट्रा कार्बोहायड्रेट जे असतात, ते इन्सुलिनला स्टिम्युलेट करतात. आणि इन्सुलिन या कार्बोहायड्रेट्सला आपल्या शरीरावर fat च्या form मध्ये store करायला सुरवात करते. म्हणून आपल्याला रोजच्या डाएट मधून भात, ब्रेड, मैदा, पास्ता सारखे पदार्थ जेवढे होईल तेवढे टाळले पाहिजे. आणि good source of carbohydrates चा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. जसे फ्रुट्स, गव्हाची चपाती तुम्ही ब्रेड ऐवजी प्रिफर करू शकता.

२. लिमिटेड प्रमाणात फॅट्स पण घ्या –

मित्रांनो हा समज चुकीचा आहे कि वजन कमी करायचं असेल तर आपण तेल, तूप, बटर पूर्णपणे बंद केलं पाहिजे. तुम्ही रोजच्या आहारात तूप, बटर, व्हेजिटेबल ऑइल यांचं समावेश करू शकता. पण फक्त ते कमी प्रमाणात घ्या. याशिवाय काजू, बदाम, आक्रोड सारखे नट्स पण घेऊ शकता. जे फॅट्स चे चांगले स्रोत आहेत आणि त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट च प्रमाण भरपूर असत.

सोबतच तुम्हाला ट्रान्स फॅट घेणं पूर्णपणे बंद केले पाहिजे. ट्रान्स फॅट आपल्याला तळलेल्या पदार्थामधून, stored food मधून मिळते. म्हणून ते खाणे आपण बंद केले पाहिजे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय खावे?

३. प्रोटीनचे प्रमाण वाढवा –

आपल्या दैनंदिन आहारात प्रोटीनचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे आपलं muscle mass खूप कमी असत. प्रोटीनमुळे आपल्या शरीरात पेप्टाइड, सॅटायटी सारखे हार्मोन्स रिलीज होत असतात. ज्यामुळे आपल्याला खूप वेळपर्यंत पोट भरलेलं आहे अशी फीलिंग येते. ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि आपण कमी खातो. त्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत होते.

अंडी, पनीर, टोफू (सोया पनीर ), सोयाबीन चिकन, मीट, फिश, यासर्वांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर, सोयाबीन, टोफू यांना आपल्या डाएट मध्ये include केले पाहिजे. आणि नॉन व्हेजिटेरियन आपल्या आहारात अंडी, फिश, मीट घेऊ शकता. पण फक्त ते कमी तेलात बनवलेले असले पाहिजे.

४. Intermittent fasting करा –

जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही Intermittent fasting पण करू शकता. हा एक उपवास असतो. पण तो दिवसा करायचा फास्ट नसतो. यामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळी ७ च्या आधीपर्यंतच जेवण करून घेतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच खात नाहीत. डायरेक्ट ११ वाजता तुम्ही काही खाऊ शकता. रात्री ७ वाजतापासून सकाळी ११ पर्यंत असा तुमचा १६ तासांचा उपवास होतो. एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही उपाशी असता, तेव्हा तुमचं शरीर, शरीरावर जमा झालेल्या फॅटचा वापर करणे सुरु करते. त्या फॅट पासून ऊर्जेचं निर्माण करते. ज्यामुळे अतिरिक्त फॅट अगदी सोप्या रीतीने कमी व्हायला लागते. हा खूप सोपा आणि असरदार असा उपाय आहे. जर तुमच्याकडून उपाशी राहणं होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि स्वतःला त्रास देऊन हे ट्राय करू नका त्याऐवजी दुसरे उपाय करा.

५. वारंवार खाणे टाळा –

जास्त वजन असलेल्या maximum लोकांना सतत काही ना काही खाण्याची सवय हि असतेच. भूक असो किंवा नसो हे लोक नेहमी खात राहतात. जर तुम्हाला पण अशी सवय असेल तर तुम्हाला ती सोडायची आहे. आतापासूनच निर्धार करा कि मी भूक असल्याशिवाय काही खाणार नाही. जेव्हा खरंच भूक लागेल तेव्हाच काही खायचे आहे.

६. चांगली झोप घ्या –

तुम्ही शांत आणि पुरेशी झोप हि सुदधा घेणे गरजेचे आहे. झोप हि आपल्या मसल्स ची recovery करते. मांसपेशींना मजबूत बनवण्याचं पण काम करते. जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा Ghrelin  hormone च प्रमाण तुमच्या शरीरात वाढायला लागत, जो एक hunger harmon आहे. ज्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागते. जास्त भूक लागल्यावर तुम्ही जास्त कॅलरीज घेता. म्हणून योग्य झोप घेणे गरजेचे आहे.

७. शरीराचं मेटाबॉलिज्म वाढवा –

आपण बघतो कि काही जण खूप खातात आणि तेवढं पचवतात पन. म्हणून त्यांचं वजन पन जास्त नसत. दुसरीकडे काही जण असे असतात कि जे कमी खातात तरी त्यांचं वजन वाढत हे मेटाबॉलिज्म नसल्यामुळे होत.

चला तर आधी समजून घेऊ मेटाबॉलिज्म काय असत ते ?

  • आपल्या शरीराच्या माध्यमातून ज्या पण क्रिया आपण करतो जसे बोलतो, रोजची कामे करतो, तसेच शरीरातील आतील क्रिया जसे हृदय धडकते, सेल्स रिन्यू होतात, या सर्व गोष्टी आपली एनर्जी युज करत असतात, हि एनर्जी बनवण्याचं काम मेटाबॉलिज्म करतो.
  • म्हणजे converting food into energy is called metabolism . हे जर फास्ट असेल तर वजन जास्त वाढणार नाही.
  • मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी तुम्हाला शरीरात good bacteria च प्रमाण वाढवण्याची आवश्यकता असते. त्यासाठी दिवसभरातून एक फळ जरूर खा. बाकी नेहमीचा आहार घ्या. ज्यामुळे good bacteria वाढतील.
  • शरीरातील good bacteria ना कमी करण्याचे काम करते ते म्हणजे – आपापला ताण तणाव. stress तुमच्या मानसिक आरोग्यालाच नाही तर शरीरातील सर्व सिस्टमना डिस्टर्ब करते. जर कधी तुम्ही टेन्शन घेत असाल, त्यावेळी हे लक्षात ठेवा कि यामुळे आपले good bacteria कमी होत आहेत, मेटाबॉलिज्म slow होत आहे, फॅट वाढते आहे आणि आपण अन्य आजारांना निमंत्रण देत आहोत.
  • याशिवाय छोट्या छोट्या कारणासाठी औषध गोळ्या घेणे हि आपण टाळले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक घेणेही टाळले पाहिजे. हे पण आपले good bacteria कमी करत असतात.

 पोटाच्या चरबीसाठी कोणता व्यायाम चांगला आहे?

८. व्यायाम जरूर करा –

व्यायाम करणे तर चरबी कमी करण्यासाठी मस्ट आहे. याला काही ऑप्शन नाही. तुम्ही रोज अर्धा तास कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम केलाच पाहिजे. ज्या व्यायामामुळे हृदयाची गती वाढेल असे कोणतेही व्य्याम तुम्ही करू शकता.  ज्यासाठी तुम्ही comfortable आहेत तो व्यायाम करू शकता. जसे योगासने, जॉगिंग, जिम, डान्स, ऐरोबिक व्यायाम वॉकिंग कोणताही workout करू शकता. लहान मुलांबरोबर खेळानेही त्यात समाविष्ट आहे. पण रोज exercise  केली पाहिजे. चरबी कमी करण्यासाठी कमी कॅलरीज घेण्यासोबत exess fat बर्न करणेही तितकेच जरुरी आहे.

# चरबी कमी करण्यासाठी काही असरदार हेल्थ ड्रिंक्स –

१. दालचिनीचा काढा –

वजन कमी करण्यासाठी दालचिनी खूप उपयोगी आहे. दालचिनी आपली insulin sensitivity वाढवते आणि ब्लड मधील शुगर लेवल चे प्रमाण कमी करते. वजन कमी करण्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याचसोबत दालचिनी मेटाबॉलिज्म वाढवण्याचं पण काम करते.

कोणते पदार्थ चरबी कमी करतात?

कृती –

  • हा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये १-२ दालचिनीचे तुकडे टाका.
  • मध्यम आचेवर हे मिश्रण उकळू द्या. पाण्याचा रंग बदलल्यावर आणि अर्धा ग्लास एवढं पाणी शिल्लक असेल तेव्हा खाली उतरून हे गाळून घ्या.
  • ह्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस टाकून कोमट झाल्यावर प्या.
  • हा काढा तयार व्हायला २० -२५ मिनिटे लागतात. एवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दालचिनीची पावडर बनवून त्याचा वापर करू शकता. त्यामुळे काढा लवकर तयार होईल.

कसा घ्यावा –>>

  • शरीरावर असललेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही हा काढा दररोज घेऊ शकता.  सकाळी नाश्त्याआधी तुम्ही हा काढा घ्या.
  • याच्या अर्ध्या तासानंतरच काही खा.
  • एक महिना तुम्ही हा काढा घ्या. त्यानंतर थोडे दिवस गॅप देऊन तुम्ही हा परत सुरु करू शकता.

२. जिऱ्याचा काढा –

वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे फायदे तर तुम्ही ऐकले असतीलच. इथे आपण जिच्यासोबत ओवा आणि मेथीदाण्याचा उपयोग करणार आहोत. हि सर्व सामग्री एकत्रित आल्यावर चांगले रिजल्ट्स देते.

कृती –

  • प्रत्येकी १ चमचा मेथी, जिरं, ओवा घेऊन रात्री १ ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
  • सकाळी हे मिश्रण पाण्याचा कलर बदलेपर्यंत १० -१५ मिनिटे उकळू द्या. कोमट झाल्यावर हा काढा प्या.

३. व्हिनेगर हेल्थ ड्रिंक –

ऍपल साईडर व्हिनेगर सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

कृती –

१ ग्लास पाण्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा ऍपल साईडर व्हिनेगर टाकून प्या.

४. सब्जाची हेल्थ ड्रिंक –

कृती –

  • रात्री १ ग्लास पाण्यामध्ये २ चमचे सब्जाच्या बिया भिजत टाका.
  • सकाळी यामध्ये १ चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण प्या.
  • खूप पावरफुल अशी हि वेट लॉस ड्रिंक आहे. याचा उपयोग सुरु केल्यानंतर २० – २५ दिवसातच तुम्हाला याचा असा दिसायला लागेल.

यामधील कोणत्याही ड्रिंक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आदळून बदलून घेऊ शकता.

 

# वजन कमी करताना या गोष्टींची काळजी घ्या –

  • वेट लॉस करताना कधीही exess diating किंवा exess exercise करू नका. हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. हेल्थी वेट लॉस करणे कधीही चांगले.
  • रोज तुम्ही ८ ते १२ ग्लास पाणी जरूर पिलं पाहिजे. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच आपली बॉडी डिटॉक्स करायला पण मदत करते. पाणी जास्त पिल्यामुळे तुम्हाला जास्त भूक पण लागणार नाही.
  • तुमच्या शरीराला दिवसभरामध्ये जास्तीत जास्त ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. एका ठिकाणी बसून काम करत असाल तरी दार दोन तासांनी थोडं थोडं तरी चालत जा.
  • साखर, गूळ यांचं प्रमाण तुमच्या आहारातून शक्य होईल तेवढं कमी करा.
  • रात्रीचे जेवण ७ ते ७.३० पर्यंत करण्याचा प्रयत्न करा. रात्री तुम्ही जे जेवण करता ते पचत नाही आणि त्याच फॅट बनत. वजन कमी करण्यासाठी नाही तर सर्वानीच आपलं जेवण रात्री ८ च्या आधीच करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण झोपेपर्यंत ते पचून जाते. तसेच रात्रीचे जेवण हे हलके पण असले पाहिजे.

 

समारोप –

या लेखामध्ये आपण पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय बघितले. यामध्ये सुरवातीला आपण खाण्या पिण्याच्या सवयींबद्दल जाणून घेतले. वजन कमी करण्यासाठी आपल्याला डाएट मध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट्स चे प्रमाण कमी करून प्रोटिन्स जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत. त्यानंतर आपण वजन कमी करताना घेता येतील, अशा काही वेट लॉस ड्रिंक्स हि बघितल्या. तुम्ही पण हे उपाय करून बघा शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी व्हायला नक्की मदत होईल. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये विचारू शकता.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!

 

FAQs

Q1. 10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी करावी?

Ans  – यासाठी प्रोटीनने भरपूर असा आहार तुम्ही घेतला पाहिजे. १० दिवसात तर नाही पण अजून काही दिवसांमध्ये तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. कारण अनेक अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे कि प्रोटीन युक्त आहार घेणाऱ्या लोकांचे फॅट हे कमी प्रोटीन घेणाऱ्या लोकांपेक्षा कमी असते.

Q2. पोटाच्या चरबीसाठी कोणता व्यायाम चांगला आहे?

Ans  – पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही चालणे, धावणे, पोहणे, ऐरोबिक व्यायाम, डान्स ज्यासाठी तुम्ही कॅम्फटेबलआहेत ते करू शकता पण त्यानेतुमच्या हृदयाची गती वाढली पाहिजे.

Q3. कोणते पदार्थ चरबी कमी करतात?

Ans  – पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करू शकणाऱ्या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे तसेच अंडी सोयाबीन सारखे प्रोटीनयुक्त पदार्थ येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top