पित्त झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये | Pitt Jhalyavar Kay Khave Aani Kay Khau Naye

आपल्याला अनेकदा पित्ताचा त्रास होत असतो. आयुर्वेदनुसार आपलं स्वास्थ्य हे तीन गोष्टींवर अवलंबून असते ते म्हणजे – वात, पित्त आणि कफ. या तिन्हींचा बॅलेन्स बरोबर असणे गरजेचे असते. नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार होताना बघायला मिळतात. पित्त हे आपल्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे होते.

पित्त झाल्यावर आपल्याला भूक पण खूप जास्त लागते. दर दोन तीन तासांनी भूक लागते. अशा वेळी काय खावे काय नाही समजत नाही. जर तुम्हाला पण पित्ताचा त्रास होत असेल आणि पित्त झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये हे समजत नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये मी तुम्हाला पित्तामध्ये तुम्ही काय खाऊ शकता आणि काय खाणे तुम्ही टाळले पाहिजे ते पण सांगणार आहे. तर लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

# पित्त झाल्यावर काय खावे ?

१. तूप –

पित्त झाल्यावर तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुपाचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये समावेश केला पाहिजे. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रोज १ ते २ चमचे तूप हे खाल्लेच पाहिजे. ते तुम्ही चपातीला लावून, डाळ-भातावर, खिरीमध्ये कसेही घेऊ शकता. आयुर्वेदामध्ये तूप हे पित्तामध्ये फायद्याचे सांगितले आहे.

२.  केळी –

पित्त झाल्यावर केळी खाणे हे फायद्याचे मानले जाते. केळी खाल्ल्याने आपल्याला थंड वाटते आणि पित्त कमी होण्यास मदत होते. तसेच छातीत जळजळ होत असेल तर ती हि यामुळे थांबते. केळीसोबतच तुम्ही डाळिंब, सफरचंद, कलिंगड यांसारखी फळे खाऊ शकता.

३. आवळा –

आयुर्वेदामध्ये आवळा हा पित्तासाठी बेस्ट सांगितलेला आहे. आवळा व्हिटॅमिनसी ने भरपूर असतो. आवळ्याला वात- पित्त -कफ या तिन्हींना बॅलेन्स करणारा म्हटले गेले आहे. म्हणून पित्तामध्ये हा फायद्याचा आहे. म्हणून आवळ्याचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. आवळा कँडी, आवळा मुरंबा किंवा आवळ्याची चटणी अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता.

४. काळे मनुके –

काळे मनुके हि पित्तामध्ये फायद्याचे आहेत. रात्री काही काळे मनुके गरम पाण्यात १ तास भिजत घालून तुम्ही हे घेऊ शकता. रात्रीचे जेवण झाल्यावर तुम्ही हे खाऊ शकता. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच यामुळे पोट साफ होण्याशी मदत होते.

५. गुलकंद –

गुलकंद हे पित्त कमी करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे छातीमध्ये होणारी जळजळ हि कमी होण्यास मदत होते. सकाळी उपाशी पोटी १ चमचा गुलकंद तुम्ही खाऊ शकता. किंवा दुधामध्ये टाकून देखील घेऊ शकता.

६. त्रिफळा चूर्ण –

पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण मिसळून कोमट  झाल्यावर हे पाणी पिल्याने आराम मिळतो.

७. दूध –

कोमट दुधामध्ये सुंठ आणि इलायची पावडर टाकून हे दूध पिलं पाहिजे. यामुळे जळजळ कमी होते. weakness पण कमी होतो आणि डोकेदुखीपण थांबते.

८. पंचामृत –

हे आपण पूजेच्या वेळी बनवतो, तेच पंचामृत पित्त कमी करण्यामध्ये उपयोगी आहे. दूध, तूप, दही, साखर आणि मध यापासून बनवलेले पंचामृत तुम्ही पित्त झाल्यावर खाल्ले पाहिजे. दिवसातून दोनदा याचे सेवन केल्याने फायदा होतो.

९. काकडी, बीट –

काकडी, बीट हे थंड प्रकृतीचे असतात. हे आपण पित्तामध्ये खाऊ शकतो. यामुळेही आपल्याला आराम मिळतो.

 १०. तांब्याच्या भांड्यातील पाणी –

ज्यांना नेहमी पित्ताचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे. यामुळे पण पित्त कमी होण्यात मदत होते.

११. गोड ताक –

घरी बनवलेल ताज गोड ताक तुम्ही खडीसाखर घालून घेतले पाहिजे पित्तामध्ये हे लाभकारी आहे. तसेच दुपारच्या जेवणानंतर गलसभर ताक घेणे फायद्याचे ठरते.

पित्त झाल्यावर काय खाऊ नये-

  • पित्त झाल्यावर आणि नेहमी पित्त होणाऱ्यांनीही जास्त मसालेदार तेलकट, चायनीज वगैरे सारखे पचायला जाड असणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
  • चहा – कॉफी घेणेही पित्तामध्ये टाळले पाहिजे.
  • तसेच ओले खोबरे, कच्चे शेंगदाणे आणि कच्चा टोमॅटो  पित्तामध्ये खाणेही तुम्ही तुम्ही टाळले पाहिजे.
  • नेहमी नेहमी पेनकिलर घेणेही टाळले पाहिजे.
  • मिठाचा जास्त वापर केला असेल असे पदार्थ जसे चिप्स, कुरकुरे वगैरे आपण टाळले पाहिजे.
  • प्रत्येकाला माहित असत कि आपल्याला पित्त कशामुळे होत. काहींना शेंगदाण्यामुळे, काहींना पोह्यामुळे, काहींना तुरीच्या डाळीमुळे तर काहींना साबुदाण्यामुळे ऍसिडिटी होते. ते पदार्थ खाणे आपण टाळले पाहिजे.
  • आंबट दही, लोणचं, इडली , डोसा सारखे आंबवलेले पदार्थ तसेच बेकरीतील खारी, बिस्कीट सारखे फरमेंटेड पदार्थ आपण पित्तामध्ये टाळले पाहिजेत.

 

पित्तामध्ये कधी आणि काय खावे ?

  1. पित्त असणाऱ्यांना सकाळी सकाळी खूप भूक लागते. अशावेळी त्यांनी थोडा गुलकंद आवळा कँडी असं काहीतरी थोडं गोड खाल्लं पाहिजे. त्यांनतर वेळेवर नाश्ता केला पाहिजे.

2. चहा कॉफी जेवढं होईल तेवढं टाळलं पाहिजे.

3. नाश्त्यामध्ये तुम्ही उपमा, हिरव्या मुगाचा डोसा, वेगवेगळे पराठे घेऊ शकता. पण त्यासोबत दही, लोणचं खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही खोबर, पुदिना कोथिंबिरीची चटणी घेऊ शकता.नाश्ता तुपामध्ये बनवला. तर शरीराला बल देण्यात मदत करते.

4. दुपारचं जेवण तुम्ही १ वाजतापर्यंत जास्तीत जास्त २ पर्यंत करून घेतले पाहिजे. जास्त उशिरा जेवण केल्यामुळे ते व्यवस्थित पचत नाही आणि अपचनाच्या तक्रारी निर्माण होतात. जेवण झाल्यावर गुळाचा तुकडा खाल्ला पाहिजे. त्यामुळे जेवण पचायला मदत होते.

5. संध्याकाळी ड्राय फ्रुटस, खजूर एखादे फळ घेऊ शकता. बिनदुधाचा चहा तुम्ही घेऊ शकता.

6. आणि रात्रीचे जेवण ७ ते ८ च्या दरम्यान करून घेतले पाहिजे. रात्री उशिरा जेवल्याने पित्ताचा त्रास वाढतो.

 

समारोप –

मित्रांनो या लेखामध्ये आपण पित्त झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये हे बघितले. तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन असतील तर मला खाली कमेंट मध्ये सांगा. आणि अन्य आरोग्यविषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद !!!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top