आपले केस दाट, सुंदर लांब असावेत असे प्रत्येक मुलीची इच्छा असते. अलीकडे केस गळतीच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केस गाळण्याची करणे हि प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात. हार्मोन्सचा इम्बॅलन्स, केमिकलयुक्त प्रोडक्ट्स चा वापर, कोणत्यातरी आजारामुळे किंवा औषधाच्या साइड इफेक्ट मुले पण केस गळू शकतात.
केस गळणे हि एक सामान्य प्रक्रिया आहे. ज्यामध्ये जुने केस गळून त्या जागी नवीन केस येत असतात. पण समस्या तेव्हा उध्दभवते जेव्हा हे केस जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि त्याजागी नवीन केस उगवत नाहीत. जर तुमचेही केस गळत असतील तर काळजी करू नका, आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा उपयोग करून आपण केसांना मऊ, चमकदार आणि निरोगी बनवू शकतो. या लेखामध्ये आपण केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय बघणार आहोत. त्या आधी आपण बघूया केस गाळण्याची कारणे कोणती असू शकतात.
केस गाळण्याची कारणे –
केस गळणे, पातळ होणे या समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. मी वर सांगितल्याप्रमाणे केस गाळण्याची कारणे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. म्हणून तुमचे केस गळण्याचे कारण तुम्हाला आधी शोधावे लागेल म्हणजे त्यावर योग्य तो उपाय करून तुम्ही केस गळणे थांबवू शकता. ब्युटी एक्स्पर्ट शेहनाज हुसेन यांनी सांगितलेली केस गाळण्याची कारणे आपण खाली बघू –
१. केस गाळण्याची सामान्य कारणे –
केस गळण्याचे सर्वात कॉमन कारण म्हणजे डँड्रफ / कोंडा, ताण तणाव, आजार, औषधे, संकल्प मध्ये एक्सट्रा ऑइल, पोषक तत्वाची कमी हे आहेत. तसेच प्रेग्नेंसी च्या नंतर होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्स मुळे, मोनोपॉज च्या दरम्यान पण केस गळू लागतात.
२. केसांना टाईट बांधणे –
जर तुम्ही आपल्या एकसाची टाईट पोनीटेल बांधत असाल तर असे करू नका. टाईट बांधल्यामुळे केसांना खूप नुकसान होते, केसांची मुळे कमजोर होतात. केस बांधत असाल तर लूज बांधा म्हणजे केसांच्या मुळांवर ताण येणार नाही.
केस बांधायला रबर बँडचा उपयोग करू नका. त्यामुळे पण केस तुटतात. त्याऐवजी तुम्ही सिल्क किंवा सॉफ्ट मटेरियल पासून बनलेला रबर बँड वापरा, जो केसांसाठी कोमल असेल.
३. स्वच्छतेची काळजी घ्या –
संकल्प आणि केसांची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने केसांमध्ये डॅन्ड्रफची समस्या व्हायला लागते. आणि केस गळायला लागतात. म्हणून आठवड्यातून किमान दोनदा तरी तुम्ही आपले केस स्वच्छ धुतले पाहिजेत.
४. थायरॉईड –
थायरॉईड हेसुद्धा तुमच्या केस गळण्याचे कारण असू शकते. जर तुम्हाला थायरॉईड असेल आणि केसही गालात असतील तर डॉक्टकडे जा आणि यावर योग्य तो उपचार करा. डॉक्टर सांगतील तसा पूर्ण उपचार केल्यावर तुमचे केस गळणे बंद होतील.
५. पौष्टिक आहाराची कमी –
केस गाण्याचं हे एक सामान्य कारण आहे. आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरामध्ये पोषणतत्वांची कमी होऊन केस गळू शकतात. म्हणून आपले डाएट हेल्थी असणे गरजेचे आहे. केसांबरोबरच शरीराच्या आरोग्यासाठी पण ते महत्वाचे आहे. केसांना हेल्थी बनवण्यासाठी आपल्या आहारात अंकुरित कडधान्यांचा समावेश करा. अंकुरित कडधान्यांमध्ये अमिनो ऍसिड असते जे केसांसाठी फायदेशीर असते. ड्राय फ्रुटस, हिरव्या पालेभाज्या दही यांचा आहारात समावेश करा.
६. ताण – तणाव –
ताण तणाव हे तुमचे केस गांयचे एक मोठे कारण असू शकते. आजच्या कॉम्पिटिशन च्या वातावरणामध्ये तणावापासून वाचणे कठीण आहे. तणावांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी तुम्ही डीप ब्रेथिंग, मेडिटेशन करायला हवे. आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवे.
७. वारंवार केस धुणे –
नेहमी केस धुतल्यामुळे पण केस गळायला लागतात. हे केस धुतल्यामुळे माही गळत तर हेअर प्रोडक्टस च्या जास्त वापरामुळे गळतात. आपण वापरतो त्या शाम्पू, कंडिशनर मध्ये केमिकलचा वापर केला असतो, ते केसांना नुकसान पोहोचवतात. ज्यामुळे केस गळायला लागतात.
केस गाळण्याची कारणे काय असू शकतात ते आपण वर बघितले आता आपण केस गळणे थांबवण्यासाठी घरच्याचारीच करता येतील असे उपाय बघू.
केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय –
1. केसांची मालिश –
केस गळणे कमी करण्यासाठी तुम्ही पहिली स्टेप घेऊ शकता ती म्हणजे – तेलाने आपल्या डोक्याची मालिश करणे. मूळांची व्यवस्थित मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे मुळांची ताकद वाढण्यात मदत होते. त्यासोबत डोक्याची मालिश केल्याने तुम्हाला आराम मिळतो आणि relaxation फील होत.
आपल्या केसांसाठी तुम्ही बदामाचे, खोबऱ्याचे, एरंडेलचे, जैतुनाचे(ऑलिव्ह ऑइल ) , तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. अधिक पराभवासाठी तुम्ही या तेलामध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑईलचे काही म्हणजे २-३ थेम्ब टाकू शकता. आपल्या बोटांनी हलका दाब देऊन डोक्याची मालिश करा. आठवड्यातून कमीतकमी दोनदा तरी जरूर करा.
2. कढीपत्ते –
कडीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. कढीपत्त्यामध्ये असे गुण असतात जे केसांना लांब आणि मजबूत बनवतात. कढीपत्त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन B6 , बीटा केरोटीन असतात. जे केसांचे पातळ होणे थांबवतात आणि केसांचे पूर्ण आरोग्य सुधारतात. याचा उपयोग तुम्ही केसांना लावण्यासाठी करू शकता.
कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट बनवा. हि पेस्ट केसांना लावून घ्या अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
केसांना लावण्यासोबत तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचे सेवन पण करू शकता. रोज कढीपत्त्याची काही पाने चावून चावून खा. असे एक महिना करून बघा. तुम्हाला आपल्या केसांमध्ये फरक दिसून येईल.
तुम्ही कढीपत्त्याचे तेलही बनवू शकता. खोबऱ्याचं, तिलाच किंवा जे तेल तुम्ही वापरता ते ताल एका भांड्यामध्ये मध्ये घ्या. त्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने टाका. हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या. पाने काली झाल्यावर उतरून घ्या. केस धुण्याच्या १ ते २ तास आधी या तेलाचा वापर करा.
3. आवळा हेअर मास्क –
आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी पण आवळा खूपच उपयोगी आहे. आवळा हे पोषक तत्वांचे पावर हाऊसच आहे. खासकरून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्याची आपल्या शरीरामध्ये कॉलेजन चे निर्माण करण्यात महत्वाची भूमिका असते. कॉलेजन स्किन आणि केस दोन्हींसाठी महत्वाचे असते, कारण हे आपल्या मुळांना आतून मजबूत बनवून केसांच्या वाढीसाठी मदत करते. हा
तुम्ही आवळा पावडर मध्ये शिकेकाई पावडर, रिठा पावडर टाकून त्यांची पेस्ट बनवा. ती आपल्या केसांना लावा. ६०-७० % सुकेपर्यंत राहू द्या नंतर केस धुवून टाका. खूपच असरदार असा हा उपाय आहे. याच्या काही वापरानंतरच तुम्हाला फरक दिसायला लागेल.
4. मेथी –
मेथी दाणे पण केस गळण्याचे थांबवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात. जे केसांच्या वाढीसाठी, आरोग्यसाठी चांगले असतात. यामध्ये असलेले प्रोटीन, निकोटेनिक ऍसिड केसांना आतून पोषण द्यायला मदत करते. त्यासोबत यामध्ये लेसिथीन हे तत्व पण असते जे केसांना मजबूत आणि मुलायम बनवते.
रात्री मेथीदाणे पाण्यात भिजत टाका. दुसऱ्या दिवशी हे मेथीदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या त्यामध्ये लिंबाचा रस आणि खोबऱ्याचं तेल टाका. आणि हि पेस्ट केसांच्या मुलांना लावा पूर्ण केसांना पण लावू शकता. १- २ तासांनी केस धुवून घ्या. आठ्वड्यामधून एकदा तुम्ही हे करू शकता. काहीच दिवसांमध्ये केस गळणे बंद होईल.
मेथी दाणे तेलामध्ये मंद आचेवर उकळून, थंड झाल्यावर तुम्ही त्या तेलाचा वापर करा. या तेलाच्या नियमित वापराने तुमचे केस दाट व्हायला लागतील.
5. कांदा –
कांदा हा केसांसाठी किती चांगला आहे हे तर आता सर्वांनां माहीतच आहे. कांद्याचा रस केस गाळाने थांबवण्यासाठी प्रभावशाली आहे. यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक,व्हिटॅमिन -सी सारखे पोषक तत्व असतात, जे केसांचे सौन्दर्य वाढवण्यात मदत करतात.
कांद्याचा रस आपल्या केसांचं मुळांना लावा. केसांना पण लावू शकता. सुकल्यानंतर केस धुवून टाका. यामध्ये तुम्ही खोबरेल तेल मिक्स करूनपण लावू शकता.
हे उपाय पण करून बघा –
केसांना दही लावा. दह्यामध्ये असलेले तत्व केसांना मजबूत बनवतात.
केसांना तांदळाच्या पाण्याने (rice water ) धुवा. rice water बनवण्यासाठी तुम्ही २-३ चमचे तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्या. मग ते १ कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाळून घ्या तुमचं rice water तयार आहे.
केस धुताना शाम्पू मध्ये कॉफी मिक्स करून धुवा.
एरंडेल तेलाचा वापर करा हे तेल केसांना मॉइस्चराइज करते, सोबतच यामध्ये व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात असते.
केसांचे गळणे थांवण्यासाठी तुम्ही आपल्या डाएट मध्ये व्हिटॅमिन्स ए, बी, सी, डी, इ आणि प्रोटिन्स यांचा समावेश करा.
केस खूप गळत असतील तुम्ही केसांना अंडे देखील लावू शकता. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.
समारोप –
तर मित्रांनो आज या लेखामध्ये आपण केस गळणे थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय बघितले. हे सर्व नाही केले तरी चालतील, पण यातले काही उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमचे केस गळणे थांबतील. आपल्या हेल्थी डाएट कडे लक्ष देणेंहि तेवढेच जरुरी आहे. तुमचे काही प्रश्न, सजेशन असतील तर मला खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा. आणि आरोग्यविषयक अन्य पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!
FAQs
Q1. केस गळू नये म्हणून काय करावे?
Ans – केस गळू नये म्हणून तुम्ही ताणतनवापासून दूर राहा. तणावामुळे केस गळ्याला लागतात. तसेच केसांना पोषक तत्वांची कमी न होण्यासाठी तुम्ही पोषक आहार घेणे गरजेचे आहे. सोबतच मुबलक प्रेमात पाणी पिणेही जरुरी आहे. यामुळे तुमच्या केसांसोबत पूर्ण शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
Q2. डोक्याचे केस का गळतात?
Ans – केस गळण्याची कारणे हि प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. पण केस मुख्यतः डँड्रफ, ताणतणाव तसेच आजार, हार्मोन्स इम्बॅलन्स यामुळेही गळू शकतात.
Q3. केस वाढण्यास किती वेळ लागतो?
Ans – सरासरी महिन्याला अर्ध्या इंचापर्यंत केस वाढतात.प्रत्येकाचा केस वाढण्याचा वेग हा वेगवेगळा असू शकतो.