आजच्या काळात विशेषतः कोरोनानंतर खूप जणांचं आर्थिक, व्यावसायिक आणि पारिवारिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बहुतेक जण नैराश्याची (डिप्रेशन)शिकार झालेले बघायला मिळतात. आज प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, बेरोजगारी, गरिबी, नापिकी यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याकडे नैराश्याचे प्रमाण आधीच्या तुमलनेत खूप वाढले आहे. या नैराश्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हे माणसाला आत्महत्येपर्यंत घेऊन जाऊ शकते. या लेखामध्ये मी तुम्हाला नैराश्य कसे दूर करावे ? हे सांगणार आहे. यासाठी मी काही बुक्स आणि इतर माध्यमातून माहिती गोळा केली आहे आणि ती इथे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.
नैराश्य कसे दूर करावे ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नैराश्य म्हणजे नेमके काय आणि त्याची लक्षणे कोणती ? प्रकार कोणते हे समजून घ्यावे लागेल. तेव्हाच ते आपल्याला दूर करणे सोपे होईल. चला तर मग सुरवातीला बघू नैराश्य म्हणजे काय ते.
नैराश्य म्हणजे काय ?
नैराश्य किंवा डिप्रेशन मनाची अशी स्थिती आहे, जी व्यक्तीला अस्वस्थ करते आणि नकारात्मक भावनांनी भरून टाकते. मनात सतत नकारात्मक विचार एकामागून एक येत राहतात. कोणतेही काम करण्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. सततचे निगेटिव्ह विचार व्यक्तीला आपण कमी असल्याची भावना उत्पन्न करतात.
आपल्यासोबत काहीतरी वाईटच होणार आहे. अशा प्रकारचे विचार येत राहतात. शेवटी हे विचार व्यक्तीला आत्महत्येपर्यंत घेऊन जातात. नैराश्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. ते आपण खाली बघूयात. डिप्रेशन वर वेळीच उपचार केले तर व्यक्ती पूर्ण बरा होतो.
नैराश्याची कारणे कोणती आहेत ?
आयुष्यामध्ये नैराश्य येण्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी करणे असू शकतात. यामध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात ज्या व्यक्तीच्या मनावर आघात किंवा विपरीत परिणाम करतात. त्यातील काही मुख्य करणे आपण खाली बघुयात –
→ अपेक्षाभंग / इच्छा पूर्ण न होणे –
आपण बघितलं तर mostly आपल्या दुःखाचे कारण इच्छाच असतात. समोरच्याने आपल्या इच्छेनुसारच वागलं पाहिजे. जर तसे नाही झाले तर प्रॉब्लेम्स सुरु होतात. आजच्या तरुण पिढीमध्ये ब्रेकअप किंवा प्रेमामध्ये धोका हे नैराश्याचे प्रमुख कारण बनले आहे. कित्येक जीव त्यामुळे जात आहेत आणि युवावर्ग नैराश्यासोबत व्यसनाच्या आधीन जात आहे.
→ अपयश येणे –
अपयश पचवणे हे कुणासाठीही कठीण असते आणि आजच्या स्पर्धेच्या युगात तर आलेलं अपयश हे आत्मविश्वास संपवून टाकते. अपयश आल्यावर आपण मागे राहिल्याची भावना निर्माण होते. त्यामधून आपल्यामध्ये काही कमी असल्याची जाणीव होते आणि नैराश्य येते.
→ प्रियजनांचा मृत्यू –
बहुतेकवेळा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला व्यक्ती स्वीकार करू शकत नाही. त्याच्या मनावर जवळची व्यक्ती सोडून गेल्याचा खोलवर आघात होतो. आणि व्यक्ती निराशेमध्ये बुडून जाते.
→ कौटुंबिक कारणे –
प्रत्येक कुटुंबात काही प्रॉब्लेम्स तर असतातच. पण हे वाद प्रॉब्लेम्स जास्तच वाढले तर त्याचा व्यतीच्या मनावर परिणाम होऊ लागतो. आपले फॅमिली मेंबर्स ज्यांच्यसोबत आपण भावनांनी सर्वात जास्त जुळलेले असतो. त्यांच्या मानसिक दुराव्यामुळे नैराश्य वाढू लागते. आई वडिलांची नेहमी भांडणे होत असतील तर मुलांमध्ये नैराश्य येते.
→ सामाजिक कारणे –
काही व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. त्यामुळे ऑफिस, कॉलेज स्कूल मध्ये त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि स्वतःबद्दल कमीपनाची भावना निर्माण होऊन नैराश्य येते.
मित्रांनो , काही नैराश्याची काही मुख्य कारणे आपण वर बघितली. आता आपण नैराश्याचे प्रकार बघणार आहोत. नैराश्याचे वेगवेगळ्या प्रकारात विभाजन केले गेले आहे. चला बघुयात ते कोणकोणते आहेत.
नैराश्याचे प्रकार –
मुख्य नैराश्य (Major Dipression) –
⇒ जर तुम्हाला रोजच नकारात्मक विचार जास्त येत असतील आणि तुम्ही डिप्रेस फील करत असाल. तर याला Major Dipression म्हणतात. यामध्ये दिसून येणारी लक्षणे –
⇒ दैनंदिन कामामध्ये लक्ष न लागणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, झोप न येणे, बैचेनी वाटणे, नेहमी थकलेलं वाटणे, अपराधीपणाची(guilty) भावना वाटणे, आत्महत्येचे विचार येणे
⇒ जर हि लक्षणे तुम्हाला कोणामध्ये दिसून येत असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवले पाहिजे.
पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर (Persistent dipressive disorder ) –
⇒ जर तुम्ही २ किंवा त्यापेक्षा जास्त काळ तणावामध्ये आलं तर तुम्ही या डिसऑर्डर ने पीडित आहात. अशामध्ये तुम्हाला एक तर गरजेपेक्षा जास्त भूक लागते किंवा अजिबातच भूक लागत नाही. झोप पण खूप कमी किंवा खूप जास्त येते.
बीओपोलार डिसऑर्डर (Biopolar disorder ) –
⇒ या प्रकारात मूड मध्ये अचानक उत्तर चढाव बघायला मिळतात. हे डिप्रेशन भयानक रूप घेऊ शकते अशा स्थितीमध्ये मेडिकेशन जरुरी असते.
सिजनल अफेक्टिव डिसऑर्डर (seasonal affective Disorder)-
⇒ या प्रकारचे डिप्रेशन म्हणजे ऋतुसोबत होणारे डिप्रेशन आहे. जनरली हे हिवाळ्यात सुरु होते आणि वसंत , उन्हाळा येईपर्यन्त संपून जाते.
सायकिक डिप्रेशन (Psychotic Dipression) –
⇒ या प्रकारचे डिप्रेशन गंभीर असते. या मध्ये व्यक्तीला चुकीचा भ्रम होत राहतो. आपल्याला जे वाटत आहे तेच बरोबर आहे असे त्याला वाटत राहते म्हणून समोर दिसणाऱ्या सत्याला स्वीकारणे टाळतो. आपला जो भ्रम आहे त्याच गोष्टी त्याच्या मनात येत राहतात ज्यामुळे तणाव वाढतो.
गर्भावस्थेमध्ये होणारे डिप्रेशन (Pregnency Dipression)-
⇒ Pregnenchy दरम्यान प्रसूतीच्या बाबतीत महिलांमध्ये तणाव उत्पन्न होतो. अशा वेळीही चिंता वाटणे तणाव होणे साहजिक आहे. म्हणून या वेळी महिलेसोबत तिच्या परिवाराचा मानसिक सपोर्ट खूप गरजेचे आहे.
वर आपण नैराश्याची करणे आणि मग प्रकार बघितले आता आपण लक्षणे बघुयात.
नैराश्याची लक्षणे –
मित्रांनो नराश्यावर उपचार करण्याआधी त्याची लक्षणे ओळखता यायला हवीत. त्यासाठी खाली आपण नैराश्याची लक्षणे बघणार आहोत.व्यकितच्या रोजच्या वागणुकीतून आणि व्यवहारातून आपण हा आजार सहज ओळखू शकतो.
नेहमी उदास वाटणे / चिंता करणे –
⇒ जर मनावर पूर्णपणे नैराश्याचे साम्राज्य पसरले तर व्यक्ती तणावाच्या अधीन होऊन जातो. या चिंतेची खूप करणे असू शकतात. जसे भविष्याची चिंता, परिवारातील प्रॉब्लेम्स, भूतकाळातील चुका, लहान मुलांबद्दल वाटणारी काळजी, अपयशामधून उत्पन्न होणारी चिंता. अशा व्यक्ती आपल्याच विचारात मग्न असतात. समोरच्याच्या बोलण्याकडे ह्या व्यक्तींचे लक्षच नसते.
झोपेची समस्या –
⇒ नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला सर्वात आधी झोपेची समस्या उद्भवते. अशा व्यक्तीला रात्री खूप वेळपर्यन्त झोप लागत नाही. डोक्यात सुरु असलेले विचार प्रयत्न करून पण थांबवता येत नाहीत. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
चिडचिड होणे –
⇒ लहान सहान गोष्टींचा पण खूप राग अशा व्यक्तींना येत असतो. छोट्या छोट्या गोष्टीचा एकामागून एक असं रागाचं चक्रच सुरु होत. त्यातून मग चीड चीड होते आणि मग भांडणे आणि तणाव उत्पन्न होतो.
नीरसता वाटणे –
नैराश्यग्रस्त व्यक्तीचे कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही. कोणतेही काम करण्यात interst वाटतं नाही. पूर्वी आवडीचे असलेले काम करण्यात पण आत त्यांना रस वाटत नाही. पूर्वी खूप वेळ tv बघणारी व्यक्ती नैराश्येमध्ये tv बघणे सुद्धा टाळते.
अन्य काही लक्षणे –
वरील लक्षणासोबत अजूनही बरीच लक्षणे नैराश्यग्रस्त व्यक्तीमध्ये आपण बघू शकतो.
→ जीवनाविषयी रागाची / निरर्थकतेची भावना वाटणे.
→ भूक कमी होणे किंवा सारखी भूक लागणे.
→ कोणतेही निर्णय घेण्यात असमर्थतेची भावना
→ विनाकारण शारीरिक दुखणे होणे. अशा व्यक्तींना मानसिक थकवटीमुळे अंग दुखणे, डोके दुखणे सारखी दुखणे सतावतात.
नैराश्य दूर करण्याचे उपाय –
नैराश्य हा मानसिक आजार वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केले तर हा नक्कीच बरा होतो. हे उपाय आपण खाली बघूया.
स्वतःला नेहमी व्यस्त ठेवा –
⇒ तुम्ही स्वतःला कधीही रिकामे आणि एकटे ठेऊ नका. कारण जेव्हा व्यक्तीचे मन खाली असते तेव्हाच नकारात्मक विचार जास्त येतात आणि मग मन कमजोर व्हायला लागते. म्हणून नेहमी कोणत्या तरी कामात स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
⇒ यासाठी तुम्ही आपली महत्वाची कामे वेळेवर करण्याला प्राधान्य देऊ शकता. रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या आवडीचे काम करू शकता. बुक्स वाचू शकता किंवा मित्रांसोबत काही वेळ घालवू शकता.
नकारात्मक गोष्टी विसरायला शिका –
⇒ कधी कधी आयुष्यामध्ये अशा घटना घडतात ज्या स्वीकारणे आपल्याला कठीण होते. त्यांचा ताण आपल्या मनावर होतो. हे टाळण्यासाठी आपण अशा नकारात्मक घटनांचा सारखा सारखा विचार करत न बसता त्यामधून शिकून पुढे काय करता येईल ते बघितले पाहिजे.
आपले विचार बदला –
⇒ निराश व्यक्ती आपल्या नकारात्मक विचारांच्या चक्रामध्ये फसून जाते आणि मग त्यातून बाहेर येणे कठीण होऊन जाते. म्हणून आपला दृष्टिको सकारात्मक बनवा. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. हा आपले मन स्ट्रॉंग बनवण्याचा एक सोपा उपाय आहे. विचार पॉसिटीव्ह बनवण्यासाठी तुम्ही आपल्या मनाला त्याच प्रकारचे डाएट देण्याची गरज आहे.
⇒ मनाचे डाएट म्हणजे दिवसभरातून आपण जे बघतो, ऐकतो, वाचतो, ज्यांच्यासोबत राहतो हे सर्व Positive असले पाहिजे. सुरवातीला तुम्हाला आपल्या विचारांवर लक्ष ठेवावे लागेल पण काही दिवसांनंतर तुम्हाला स्वतःच सकारत्मक विचार करण्याची सवय होईल.
स्वतःला महत्व द्या –
⇒ निराशेमधून बाहेर येण्यासाठी स्वतःबद्दलचा आदर, आत्मसम्मान पण तुमची मदत करेल. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्यायला लागता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि परिणामी कर्तृत्व पण पहिल्यापेक्षा अधिक चांगलं व्हायला लागत. तेव्हा मी हे करू शकणार नाही, हे खूप कठीण आहे त्याजागी माझ्याकडून हे सहज होईल, माझ्यासाठी काहीच कठीण नाही असे विचार मनात येऊ लागतात.
आपली इतरांसोबत तुलना करणे टाळा –
⇒ बऱ्याच वेळा आपण इतरांसोबत आपली तुलना केल्यामुळे निराश होत असतो. पण आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि प्रत्येकाची life, challenges आणि journey हि वेगवेगळी आहे. म्हणून स्वतःचे कुणासोबतही comparision करून त्रास करून घेण्याची गरज नाही.
⇒ इतरांच्या प्रगतीपासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा.
स्वतःवर लक्ष केंद्रित करा –
⇒ आपण निराशेच्या दिशेने चाललो आहोत, हे ओळखण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे – जागरूकपणे स्वतःच्या विचारांकडे लक्ष केंद्रित करणे हा आहे. हा बिलकुल !!!!!!!!
⇒ असे वारंवार केल्याने तुम्ही समजू शकता कि तुमच्या मनात नकारात्मक विचार येणे कसे सुरु होते आहे. आणि त्याची करणे ओळखून तुम्ही ते रोखण्यासाठी प्रयत्न देखील करू शकता.
नकारात्मक लोकांपासून दूर राहा –
⇒ सकारात्मक बनून राहण्यासाठी तुम्हाला तुमचे मनोबल कमजोर करणाऱ्या लोकांपासून दूर राहायला हवे. कारण अश्या व्यक्तींसोबत राहिल्यास तुम्ही कधीच निराशेमधून बाहेर येऊ शकत नाही. तसेच त्याच त्याच गोष्टींचा विचार करणे पण तुम्हाला सोडून द्यायला हवे.
खुश राहायला शिका –
⇒ जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास आणि सम्मान वाढेल. कितीही छोटी गोष्ट का असेना पूर्ण मनापासून करा. आपलं १०० % द्या. मग त्याचा result कसाही असू दे.
⇒ आपल्याला जे करता येईल ते आपण केलं याच समाधान आपल्याकडे असेल. त्याचा विचार करून खुश व्हा. हे मिळाल्यावर मला ख़ुशी मिळेल (गाडी , बंगला , नोकरी , मुलं, लग्न) ते झाल्यावर आनंद मिळेल, असा विचार करू नका. आजच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिका.
समारोप –
तर मित्रांनो , लेख थोडा जास्त मोठा झाला त्यासाठी माफ करा. पण यामध्ये मी तुम्हाला नैराश्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. या मध्ये आपण बघितले कि नैराश्याची लक्षणे, कारणे आणि प्रकार पण बघितले. आणि नैराश्य कसे दूर करावे ? याचे काही उपाय पण आपण लेखाच्या शेवटच्या भागामध्ये बघितले. तुमचे काही सजेशन असतीलकिंवा प्रश्न असतील तर मला खाली कंमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अधिक आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!