संधिवात कशामुळे होतो जाणून घ्या संधिवात होण्याची कारणे

संधिवात हा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – संधी + वात. संधी म्हणजे जॉइंट्स. जसे आल्या सर्वांना माहित आहे, आपल्या शरीरामध्ये एकूण २०६ हाडे असतात. हि सर्व हाडे संधीच्या माध्यमातून जोडलेली जोडलेली असतात. ह्या संधीमध्ये जेव्हा दुखते, संधी लाल होतात, सूज येते तर त्याला आपण संधिवात असे म्हणतो. सोप्या शबदात सांगायचे झाले तर शरीरातील किठालाही सांधा दुखत असेल आणि हे दुखणे जर १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत असेल तर त्याला आपण संधिवाताचे लक्षण समजू शकतो. या लेखामध्ये आपण संधिवात हा नेमका कशामुळे होतो ? हे बघणार आहोत. सोबतच संधिवात असल्यास कोणते उपचार करावेत तेही आपण बघणार आहोत. चला तर तर मग लेखामध्ये पुढे वळूया.

संधिवात कशामुळे होतो

संधिवात कोणाला होतो ?

साधारणतः संधिवात हा २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. असे असले तरी हा कोणत्याही लहानांपासून वृद्धापर्यंत वयोगातील व्यक्तींना होऊ शकतो.  याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. काही संधिवात जसे पाठीच्या मणक्याचा संधिवात हा तरुणांमध्ये अधिक बहाल मिळतो.

संधिवात कशामुळे होतो ?

संधिवाताचे नेमके कारण तर आपण सांगू शकत नाही. पण अनुवंशिकता, वातावरण, व्यसन यामुळे हि होऊ शकतो हे संशोधनात दिसून आलं आहे.
एकेकाळी हा आजार वृद्धांचा आजार समजला जायचा पण आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइल मुळे तिसी पस्तीशीमध्येच हा आजार होताना बघायला मिळत आहे. यालाच इंग्लिशमध्येआरथ्रायटिस असे म्हणतात.
हा मुख्यतः रोगप्रतिकार क्षमतेमध्ये असलेल्या खरबीमुळे होतो. ज्यामध्ये शरीर संधीमध्ये आपल्याच पेशींवर हमला करते.
संधिवात हा मुख्यतः दोन कारणामुळे होतो.

१. ऑस्टियो आर्थरायटिस –

वयोमानानीसार आपली हाडे हि ठिसूळ होतात आणि त्यामधील घर्षण कमी व्हायला लागते. अश्यावेळी सांध्यांमध्ये, गुडघ्यामध्ये, हाताच्या जॉइंट्स मध्ये दुखते.

हा वयाच्या ५० – ५५ वर्षांनंतर होतो ज्याला ऑस्टियो आर्थरायटिस किंवा झिजेचा आर्थरायटीस असेही म्हणतात. हा आजार मुख्यतः वय जास्त झाल्यावर बघायला मिळतो. यामध्ये जास्त चालल्यावर, पायऱ्या चढ उत्तर केल्यावर गुडघ्यामध्ये दुखते.

२. इंफ्लामेटरी आर्थरायटिस –

या प्रकारामध्ये सांध्यामध्ये सूज येते. सकाळी हाडांमध्ये घट्टपणा जाणवतो. आपल्या शरीरामध्ये इम्यून सिस्टिम असते, जी बाहेरून आपल्या शरीरावर हल्ला करणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरस ना ओळखून त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्यापासून आपले रक्षण करत असते.

पण जेव्हा इम्युनिटी चे बाहेरून हल्ला करणाऱ्या घटकांना ओळखण्याच्या mechanism मध्ये बिघाड होतो, तेव्हा हि इम्युनिटी आपल्या शरीरातील cell लाच बाहेरचा घटक समजून त्यावर हल्ला करतात याला auto immune condition म्हणतात. हा इंफ्लामेटरी आर्थरायटिस चा एक पार्ट आहे. इंफ्लामेटरी आर्थरायटिसचे १०० पेक्षाजास्त प्रकार आहेत. यातले common types म्हणजे Rheumatoid, Psoriatic, Spondylitis हे आहेत.

या मध्ये सांध्यामध्ये सूज दिसून येते आणि सकाळी जास्त त्रास जाणवतो. सकाळी उठल्यानंतर हाडांमध्ये घट्टपणा (toughness) जाणवतो.  हा त्रास तुम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जाणवत असेल. तर ते नॉर्मल नाहीये. त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळीलक्षणे असू शकतात. रुमेटॉइड आर्थ्रायटिस हा आजार महिलांना साधारणतः तिशीनंतर होत असतो.  लठ्ठपणा शरीराच्या सांध्यामध्ये जास्त pressure देण्याचं काम करतो.

संधिवात कशामुळे होतो

संधिवात होण्याची इतर काही कारणे –

  • आजकाल असं दिसून येते कि एखाद व्हायरल इन्फेकशन झालं कि त्यानंतर सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. कधी कधी काही महिन्यांपर्यंत हा त्रास होतो.
  • तुमच्या रक्तामध्ये युरिक ऍसिड चे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला संधिवात होऊ शकतो.
  • कधी कधी संधिवात कोणत्याही कारणाशिवाय होऊ शकतो याला इडियोपॅथिक आर्थरायटीस म्हणतात.
  • सध्या म्हणजे कोविड नंतर एक विशिष्ट प्रकारचा संधिवात आपल्याला पाहायला मिळत आहे. जो कोविड च्या औषधांमुळे किंवा कोविड झालेल्या लोकांना कोविड चा सीडी इफेक्ट म्हणून होतो.
  • ज्या लहान मुलांना हा होतो. त्यांच्यामध्ये अनुवंशिकता, जनुकांमध्ये काही दोष, व्हायरल आजार किंवा इतर आजारांचे कॉम्प्लिकेशन तसेच काही औषधांचे साइड इफेक्ट मुळे हा लहान मुलांमध्ये बघायला मिळू शकतो.
  •  अनुवांशिक कारणांमुळे पण संधिवात हा बऱ्याच केसेस मध्ये होत असतो.
  • जर तुम्ही धूम्रपान करता आणि शरीराची हालचाल पण खूप कमी करत असाल तर तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस आहेत.

संधिवात झाल्यास कोणती काळजी घ्याल –

जर तुम्हाला हा आजार असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण लिकांमध्ये असा गैरसमज आहे कि संधिवात हा बारा होत नाही. पण आता मेडिकल सायन्स ने प्रगती केली आहे. खूप औषधे आता संधिवातावर उपलब्ध आहेत. या उपचारांसोबत तुम्ही एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकता.

दुसरा एक गैरसमज या आजारांच्या उपचारांबाबत असे आहेत कि याचे साइड इफेक्ट खूप असतात पण डॉक्टर्स असे सांगतात कि असे काही नाही 98 % लोकांमध्ये या उपचारांचे औषधांचे साइड इफेक्ट दिसून येत नाही.

योग , प्राणायाम रोज नियमित पणे कोणत्यातरी प्रकारचा व्यायाम तुम्ही अर्धा तास तरी करायला हवा. त्यामुळे इम्युनिटी चान्गली राहते आणि संधिवाताबरोबरच इतर आजारांपासून आपण वाचू शकतो.

आपल्या शरीराची नियमित आणि योग्य हालचाल सुरु ठेवावी. त्रास होत असेल तरी जितकी होईल तितकी आपली दैनंदिन कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करावा.

हा आजार आपल्याला होऊच नये म्हणून तुम्ही balance diet घेतले पाहिजे. म्हणजे आहारामध्ये सर्वच व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन चा समावेश केला पाहिजे.

संधिवातावर काही घरगुती उपाय –

संधिवात झाल्यावर तुम्ही नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे. नेहमी म्हणजे सर्व ऋतूंमध्ये उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही थोडे कोमट पाणी च पिलं पाहिजे. यामुळे तुमच्या सांध्यांना लुब्रिकेशन मिळेल.

हाफ हाफ quantity मध्ये ओवा आणि गूळ (गूळ बारीक करून घ्यावा किंवा गूळ पावडर तुम्ही वापरू शकता) एकत्र करून घ्यावा. हे मिश्रण एका बरणीमध्ये भरून ठेवावे. दिवसातून तीन वेळा चघळत चघळत खावे. हे दोन्ही आपल्या सांध्यांसाठी खूप चांगले आहेत.

थोडं आलं (ginger) आणि काही काळीमिरी हे १ ग्लास पाण्यामध्ये टाकून. हे चांगलं उकळू द्या नंतर कोमट झाल्यावर हा काढा प्या. हा पण तुमच्या जॉइंट्सना आरामम देण्याचं काम करतो.

वरील उपाय जर तुम्ही नियमितपणे काही महिने केलेत तर तुमचा त्रास हा खूप प्रमाणात कमी झालेला तुम्हाला दिसेल.

समारोप –

मित्रांनो , आज आपण बघितले कि संधिवात कशामुळे होतो ? त्याची कारणे काय काय असू शकतात हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. यामध्ये आपण बघितले कि अनुवंशिकता आणि आपल्याच बिघडलेल्या इम्म्युनिटी सिस्टिम च्या मेकॅनिझम मुळे आपल्याला संधिवात होऊ शकतो. तर तुमच्या काही प्रतिक्रिया, सजेशन असतील तर ते मला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आरोग्यविषयक अधिक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट द्याल विसरू नका.

FAQs

Q1. संधिवात मुख्य कारण काय आहे?

Ans – संधिवाताचे नेमके कारण नक्की काय आहे हे कळू शकले नाही. पण अनुवंशिकता, धूम्रपान, लाठपणा, रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढल्यामुळे आणि इम्युनिटी सिस्टीम मध्ये झालेल्या बिघाडामुळे होऊ शकतो.

Q2.सांधेदुखीसाठी काय करावे?Ans – सांधेदुखी मध्ये आराम मिळण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करा –

जर तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करा. रोज थोडा वेळ तरी व्यायाम जरूर करा.तुमच्या डॉक्टरांकडून फिसिओथेरॅपी शिकून घ्या ती नेहमी करत जा. डॉक्टरला दाखवून योग्य ती औषधे निमित्त घेत जा.

Q3. संधिवात सर्व वेळ दुखत आहे का?

Ans – संधिवातामध्ये वेदना कधी कधी होऊ शकतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरहोऊ शकतात. संधिवाताच्या प्रकारानुसार लक्षणे वेगळी दिसू शकतात.

Q4. माझे घोटे आणि मनगट का दुखतात?.

Ans – वाढत्या वयानुसार, तुमचीहाडेठिसूळ होऊ लागतात. ते एकमेकांना घासायला लागतात ज्यामुळे ती दुखायला लागतात.

Q5. गुडघ्याची सूज कशी कमी करावी?

Ans – गुडघ्याची सूज आणि दुखणे कमीकरण्यासाठी दर २ ते४ तासांनी गुडघ्याला बर्फ लावा. असे १५ते २० मिनिटे करा. झोपताना गुडघ्याला आराम मिळावा म्हणून गुडघ्याखाली उशी ठेवा .  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top