मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? आजच करून बघा हे उपाय

आजकाल मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांना पण कशाची तरी भीती वाटत राहते. हि संशय आता वाढत चालली आहे. याचे मुख्य कारण बघण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात येईल कि आपल्या मनाला आपण जसा आहार देतो तसाच तो बनतो. मोठे काय लहान काय सगळेच मोबईल वर TV वर aggresive , हिंसक कार्यक्रम , मुव्हीज बघत असतात. त्याचा परिणाम हा आपल्या मनावर होणारच असतो. हा विचार आपण करत नाही. या लेखामध्ये आपण बघणार आहोत कि मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ?

भीती म्हणजे दुसरे काही नसून मनातील एक भावना आहे. ज्यामुळे व्यक्ती असुरक्षित फील करतो. या भीती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जसे –

मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे

  • कुणाला आजारी पडण्याची भीती वाटते.
  • कुणाला नापास होण्याची.
  • शेकतकऱ्याला पीक न होण्याची भीती वाटते.
  • कुणाला आपल्या करियरची, जॉब न मिळण्याची
  • तर कुणाला गर्दीमध्ये जाण्याची भीती वाटते.
  • हि न संपणारी यादी आहे.

तर या सर्व प्रकारच्या भीती माणसाला का वाटतात ?आपण जर थोडं २० – २५ वर्षे मागे जाऊन बघितलं. तर आपल्या असं लक्षात येईल कि, पूर्वी जवळजवळ सर्वच लोक सिख समाधानाने जीवन जगत होते. जरी त्यावेळी विज्ञानाची प्रगती झाली नव्हती जास्त सुखसोयीची साधने नव्हती तरी लोक तंदरुस्त आणि समाधानी होते. त्यांना तणाव माहित नव्हता ना मनाचे आजार माहित होते.

मागच्या जवळपास १० वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून स्मार्टफोन माणसाच्या हातात आला आहे. जग खूप प्रगत झालं आहे. पण याचा फायद्यापेक्षा नुकसानच जास्त बघायला मिळत आहे. बहुतांश लोक tv , मोबईल वर नकारात्मक गोष्टीच जास्त बघतात. ज्यामुळे आज पूर्ण वातावरणच नकारात्मक बनत चाललं आहे. त्यामुळे आपलं मन वातावरणात पसरलेली भीती कॅच करते आणि आपल्याला पण असुरक्षित वाटायला लागत.

मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ?

1. सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करा –

भीती हा एक नकारात्मक भावना आहे. आपले मन जर सकारात्मक असेल तर भीत आपल्या मनात टिकू शकणार नाही. सकारात्मक बनण्यासाठी आपण दिवसभरामध्ये काय बघतो, वाचतो, ऐकतो याकडे लक्ष दिले पाहिजे. नेगेटिव्ह आणि हिंसक गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवले पाहिजे. सकारात्मक गोष्टीच बघण्याची, वाचण्याची स्वतःला सवय लावली पाहिजे. ज्यामुळे आपले विचार पॉसिटीव्ह बनतील आणि मग आपण पॉसिटीव्ह बनू.

यासाठी तुम्ही जीवनाला प्रेरणा देणारी पुस्तके वाचू शकता. मोटिवेशनल व्हिडिओज किंवा मुव्ही बघू शकता.

2.मनातील भीतीचा सामना करा –

ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते ते सर्व एका पेपर वर लिहून काढा. आणि एक एक करून त्या गोष्टी करायला सुरवात करा. सुरवातीला कठीण जाईल पण जसे जसे तुम्ही त्या गोष्टी करत जाल भीती गायब होत जाईल.

हे आपण उदाहरणाने समजून घेऊ –

प्रिया उंच ठिकाणाची खूप भीती वाटते. तर प्रिया सुरवात थोड्या उंच ठिकाणी फिरायला जाऊन करू शकते. जसे कमी उंचीचे पर्वत थोडा चढून प्रिया आपल्या भीतीचा सामान करू शकते. आणि हि लोळवेल हळू हळू वाढवू शकते.

मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे

3. काही वेळ ध्यान , मेडिटेशन करा –

मेडिटेशन केल्याने मन शांत आणि मजबूत होते. जर तुम्हाला येत नसेल तर youtube वर खूप सारे व्हिडिओज available आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही साधे सोप्या पद्धतीने ध्यान करायला शिकू शकता. रोज कमीत कमी १० मिनिटे ध्यान जरूर करा. कोणतेही यान येत नसेल तर आपले विचार थांबवून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा.

४. आपला आत्मविश्वास वाढवा –

आपला स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. कोणतीही परिस्थिती आली तर तिचा सामना करण्याचे पूर्ण सामर्थ्य माझ्यात आहे, असा विश्वास आपल्या मनात हवा. म्हणजे आपण कठीण परिस्थितीमध्ये घाबरून जाणार नाही. आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण अध्यात्मिक, पॉजिटीव्ह विचार ऐकू किंवा वाचू शकतो. किंवा सुरवात आपण स्वतःला छोटी छोटी टार्गेट देऊन ती पूर्ण करून करू शकतो. यामुळे आपला स्वतःबद्दलचा विश्वास वाढायला लागेल.

५. व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा –

जेव्हा आपण काही काम करत नसतो. तेव्हा पण आपले विचार हे अविरतपणे सुरूच असतात. आणि बहुतेकवेळा ते नकारात्मकच जास्त असतात. विचार करत करत आपले मन भविष्यातील किंवा भूतकाळातील घटनांचा विचार करून चिंता करत बसते नाहीतर होणाऱ्या परिणामांबद्दल घाबरत राहते. म्हणून नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर त्यावेळेत काही नवीन शिकू शकता किंवा आपल्या प्लांट्सची काळजी घेण्यात, पेंट्स बरोबर किंवा पुस्तक वगैरे वाचू शकता.

६. डीप ब्रीदिंग रिलॅक्सेशन टेक्निक –

ज्या वेळी तुम्हाला घाबरल्यासारखे किंवा मनावर दडपण आपल्यासारखे वाटेल तेव्हा आपले पूर्ण शरीर रिलॅक्स करा ढिले सोडून द्या वाटल्यास डोळेही बंद करू शकता आणि मग खोल श्वास घ्या. श्वसनावरच लक्ष देण्याचा प्रयत्न करा. असे ५ ते १० मिनिटे करा. हे केल्यावर तुमचे शरीर शांत झाल्यामुळे मन पण शांत व्हायला लागेल आणि मनातील भीती दूर होऊन जाईल. हे तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता. खूप पावरफुल अशी हि टेक्निक आहे.

७. भीती हि कधी कधी चांगली पण असते –

भीती नेहमीच वाईट असते असे नाही. आपल्या मनात थोड्या फार प्रमाणात भीती हि असायला हवी. त्याशिवाय आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करणार नाही. आपल्याला आपल्या तब्येती बद्दल काही भीती नसेल तर आपण त्याकडे लक्ष देणार नाही. काही पण खाऊ कसे पण राहू शरीराची योग्य ती काळजी घेणार नाही. तसेच लहान मुलांना आई वडिलांची किंवा कोणाचीच भीती नसेल तर ते जे वाटेल तेच करतील कुणाचं ऐकणार नाहीत. म्हणून थोड्या प्रमाणात भीती हि आपल्या मनात असणे जरुरी आहे.

 

समारोप –

तर मित्रांनो आज आपण मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? हे बघितले. आपल्या मनातील भीती ओळखून ती घालवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. याचे उपाय आपण वर बघितले. तर तुमचे काही प्रश्न, सजेशन असतील तर मला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

हा लेख वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

 

FAQs

Q1.माझ्या मनातील भीती मी कशी घालवू?

Ans – मनातील भीती लगेच घालवण्यासाठी तुम्ही खोल श्वास घेण्याचा सर्व करा. यासाठी सर्वात आधी तुम्ही आपले पूर्ण शरीर हलके सोडा आणि मग काही वेळ दीर्घ आणि खोल श्वास घ्या. याशिवाय तुम्ही ध्यान, मेडिटेशन पण करू शकता.

Q2. मरणाची भीती का वाटते?

Ans – आपण केलेले वाईट कर्म, आपल्या मित्र, परिवार आणि धन संपत्ती गमावण्याची भीती वाटत असल्यामुळे कदाचित मारी भीती वाटत असेल. 

Q3.मी माझी भीती आणि चिंता कशी नियंत्रित करू शकतो? 

Ans – भीती आणि चिंता आपण रिकामे असल्यावरच जास्त होते कारण आपल्या मनात तेव्हानकारात्मक विचार येत असतात. आपण स्वतःला नेहमी कामात व्यस्त ठेऊनहिचिंता आणि भीती नियंत्रित करू शकतो. 

Q4. मला प्रत्येक गोष्टीची भीती का वाटते?

Ans  – तुमच्याबाबतीत पण असे होत असेल तर तुम्हाला मानसिक आजार General  Anxiety Disorder (GAD) असू शकतो. पण याचे टेन्शन घेण्याचं काह गरज नाही. या आजाराची लक्षणे माहित करून घेऊन तुम्ही तुम्हाला हा आजार आहे कि नाही हे निश्चित करू शकता आणि असल्यास मानसोपचारतज्ञाकडे जाऊन योग्य तो उपचार करून घेऊ शकता.

Q5. भीती वाटणे म्हणजे काय?

Ans  – भीती हि मनातील एक नकारात्मक भावना आहे. बहुतेकदा वेळ, प्रसंगी भीती वाटणे हे नॉर्मल असते. जसे – tv वर एखादे भयानक दृश्य बघून किंवा कधी साप, पाल वगैरे दिसल्यावर, अपघात किंवा हिंसक दृश्य बघून भीती वाटते.काही वेळा भीती हि अनामिक असते. कोणत्याच कारणाशिवाय हि भीती वाटतं असते.

1 thought on “मनातील भीती घालवण्यासाठी काय करावे ? आजच करून बघा हे उपाय”

  1. Pingback: चांगले विचार कसे करावे | Changale Vichar Manat Kase Annavet

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top