कावीळ हा लिव्हरची संबंधित आजार आहे. यामध्ये लिव्हरचे काम बिघडते. कावीळ लवकर बरी होण्यासाठी औषधांसोबत योग्य आहार घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत आणि आपण लवकर बरे होतो. या लेखात आपण कावीळ झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल सविस्तरपणे माहिती बघणार आहोत.
कावीळ झाल्यावर पचायला हलका असलेला आहार आपण घ्यायला हवा. कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे ते आपण बघू.
काविळ झाल्यावर काय खावे ?
१) फळे आणि त्यांचे रस घ्यावेत – कावीळ झाल्यावर काही खायची इच्छा होत नसेल तरी फळे जरूर खावीत. आणि गरम पाण्याचे सेवन करावे यामुळे पोट साफ होते.
1) पपई – पपईमध्ये असलेले एन्झाइम्स पचन आणि यकृताच्या कार्यावर चांगला परिणाम करतात.
2) मोसंबी, संत्री, अननस -यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते ते शरीरातील विषारी घटक काढून टाकतात.
3) डाळिंब – यामध्ये अँटिऑक्सिडन्स असतात जे यकृताचे काम व्यवस्थित करण्यात मदत करतात.
२) पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करावे – भरपूर पाणी कावीळ झाल्यानंतर आपण पिलं पाहिजे कारण शरीर हायड्रेट राहणे गरजेचे आहे. यावेळी तुम्ही नारळपाणी, गोड ताक, उसाचा रस, फळांचे रस, भाज्यांचे सूप यांसारख्या द्रव पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.
२) पचायला हलका आहार घ्यावा – कावीळ झाल्यावर पचायला हलका असलेला आहार घेणे गरजेचे असते. अन्यथा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
1) खिचडी – तांदूळ आणि मूग डाळीची पातळसर खिचडी तुम्ही हखाऊ शकता.
2) ओट्स आणि दलिया – ही पचायला हलकी आणि फायबरने भरपूर असतात त्यांचं सेवानही तुम्ही करू शकता.
3) मऊ, पोळी, भात भाजी– ताजी बनवलेली मऊ पोळी, भात आणि साधी भाजी (जास्त मसाला न घातलेली ) त्यांचे सेवन तुम्ही करू शकता.
4) हिरव्या पालेभाज्या – शिजवलेल्या पालक मेथी कोथिंबीर सारख्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करू शकता.
काविळ झाल्यावर काय खाऊ नये ?
काही पदार्थ आणि सवयी टाळणे गरजेचे आहे कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या यकृतावर होतो. खालील पदार्थ आहारातून टाळावेत.
1) तळलेले आणि तेलकट पदार्थ – वडे समोसे भजी यांसारखे तळलेले पदार्थ खाणे आले पाहिजे. यामुळे यकृतावर ताण येतो. तसेच जास्त चरबीयुक्त आणि मसालेदार पदार्थ ही खाणे टाळले पाहिजे.
2) स्पायसी आणि प्रोसेस फुड – पिझ्झा बर्गर आणि इतर जंक फूड हीआपण टाळले पाहिजे. साखर घातलेले पदार्थ हे खाणे टाळावे.
3) मांसाहार टाळावा – फिश मटन चिकन यांसारखे पचायला जड असलेले मांसाहारी पदार्थ आपण टाळले पाहिजेत. जास्त प्रमाणात अंडी खाणे ही टाळावेत.
4) दूध आणि दुधाचे पदार्थ – म्हशीचे दूध, दही यासार हे पदार्थ पचायला जड असतात. यावजी थोड्या प्रमाणात पनीर आणि गोड ताक तुम्ही घेऊ शकता.
5) आंबट फळे – खूप जास्त आंबट असलेली फळे जसे लिंबू, चिंच, कोकम खाणे टाळावे. लोणचं टोमॅटो सॉस यांसारख्या पदार्थामुळे पचायला अडथळा निर्माण होतो म्हणून ते टाळावे.
6) मद्यपान आणि धूम्रपान – मद्यपान आणि धूम्रपान केल्यामुळे लिव्हरला नुकसान पोहोचते. म्हणून ते त्वरित बंद केले पाहिजे.
7) कॅपिन युक्त पेये – चहा कॉफी आणि कोल्ड्रिंक पिणे टाळावे यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास अडथळा निर्माण होतो.
काही महत्त्वाच्या टिप्स –
१) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा – कोणताही आहार सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या आरोग्यानुसार पदार्थ ते तुम्हाला सजेस्ट करतील.
२) थोड्या थोड्या वेळाने खा – दिवसातून 5-6 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात हलका आहार घ्यावा त्यामुळे पचन सुधारते आणि यकृत्यावरचा भार कमी होतो.
3) पुरेसा आराम करा – शारीरिक क्षम कमी करावेत आणि पुरेसा आराम करावा यामुळे आरोग्य पुरवत व्हायला मदत होते.
4) आहारात विविधता ठेवा – शरीराला पूर्ण पोषण मिळण्यासाठी भारत वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा.
समारोप –
कावीळ झाल्यावर आहाराची योग्य काळजी घेतल्यास आजार लवकर बरा होण्यात मदत होते. या काळात पचायला हलका आणि पोषण युक्त आहार घेणे महत्त्वाचे असते म्हणून आपण बाहेरील पदार्थ खाणे यावेळी टाळलेच पाहिजेत.कावीळ झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल माहिती बघितली. योग्य आहार, औषध उपचार आणि पुरेसा आराम यामुळे कावीळ मधून आपण लवकर बरे होऊ शकतो.