अनेक महिलांची कंबर दुखते, अंग दुखते अशी तक्रार असते. शरीरात असलेल्या आर्यन आणि कॅल्शियमच्या कमीचे हे लक्षण आहे. आपल्या हाडांसाठी कॅल्शियम खूप आवश्यक असते. शरीरात कॅल्शियम कमी झाल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक जण कॅल्शियम ची कमी दूर करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या घेत असतात त्यांचा आरोग्यावर आणि लिव्हरवर विपरीत परिणाम होतो. म्हणून कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय आपण या लेखामध्ये बघणार आहोत. त्यासोबतच कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये absorb होण्यासाठी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते ? ते सुद्धा बघणार आहोत. म्हणून पूर्ण माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
कॅल्शियम म्हणजे काय ?
कॅल्शियम हे आपल्या शरीरातील एक खनिज आहे, जे शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. आपले दात आणि हाडांमध्ये पूर्ण शरीरात आढळणाऱ्या कॅल्शियम पैकी 99% कॅल्शियम आढळते. कॅल्शियम हे आपल्या हाडांना रचना आणि टणकपणा देण्याचे काम करते.
कॅल्शियम शरीरात absorb होण्यासाठी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते ?
⇒ आपण जेव्हा दूध, मासे यांसारखे पदार्थ घेतो, तेव्हा हे कॅल्शियम विटामिन डी च्या साह्याने आपल्या digestive system मधून आपल्या शरीरात absorb होत असते.
⇒ जेव्हा आपल्या शरीरात विटामिन डी ची कमी असते तेव्हा कॅल्शियम absorb होऊ शकत नाही.
⇒ त्यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.
⇒ कॅल्शियम हे आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कॅल्शियम असतात.
१)बोन कॅल्शियम २) सिरम कॅल्शियम
आपल्या शरीरातल्या सर्व मांसपेशींना मजबुती देण्याचं काम हे कॅल्शियम करत असतात. तसेच रक्तामध्ये जेव्हा कॅल्शियम वाढते तेव्हा त्याचं deposition हाडांवर होतं. त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. याच्या उलट जर आपल्या शरीरात कॅल्शियम कमी असेल तेव्हा आपल्या मांसपेशी कमजोर होतात. आपण काही काम करतो तेव्हा त्या लगेच दुखतात म्हणजे यामध्ये अंग दुखी होते जरा वेळ उभे राहिल्यावर लगेच पाय दुखतात.
आपल्या शरीरातल्या कॅल्शियम कमी झाल्यावर body आपल्या हाडावरचा कॅल्शियम रक्तामध्ये मिसळायला सुरुवात करते. यामुळे मग osteoporosis होतो आणि आपली हाडे थोडा मार लागला तरी लगेच फ्रॅक्चर होऊ शकतात. तर आपल्या शरीरात कॅल्शियम सोबत विटामिन डी चे प्रमाण योग्य असणे हे खूप जरुरी असते त्यामुळे आपण घेत असलेले कॅल्शियम शरीर absorb करते. म्हणून शरीरात विटामिन डी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय आपण बघू.
शरीरात विटामिन डी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय –
1. सकाळचे म्हणजे सकाळी नऊच्या आत मधले जेवून असते त्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे आपण बसलं पाहिजे म्हणजे आपले विटामिन डी ची कमी भरून निघते.
2. आपल्या अंगाला तेल लावल्याने किंवा तेलाची मालिश केल्यानेही स्किन जास्त प्रमाणात विटामिन डी उत्पन्न करू शकते.
3. आपल्या आहारातून विटामिन डी आपण घेऊ शकतो. यासाठी तुम्ही मशरूम, मासे, दुधाचे पदार्थ, सोयाबीन सोया मिल्क यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय –
एका प्रौढ व्यक्तीला दिवसभरातून एक ग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आणि कॅल्शियम चे प्रमाण वाढवण्यासाठी करता येतील असे सोपे घरगुती उपाय आपण बघू.
१) दुपारी जेवणाच्या तासभर अगोदर ओल्या /सुक्या खोबऱ्याचा तुकडा, गुळाच्या खड्या सोबत चावून खावा.
२) शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी आपल्या नेहमीच्या आहारात नाचणीच्या पिठाचा वापर तुम्ही जरूर केला पाहिजे.
नाचणी हे कॅल्शियम चा एक उत्तम स्त्रोत आहे. नाचणीच्या पिठामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तांदळाचे गव्हाचे उडदाचे पीठ थोड्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ओवा, जिरे, मसाले आणि भाज्या घालून त्याचे डोसे बनवू सकाळी नाश्त्याच्या वेळी घेऊ शकता. किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता.
३)सकाळी उपाशीपोटी दोन ते चार खारीक चावून खाल्ल्याने किंवा त्याची पावडर करून ते दुधासोबत घेतल्याने देखील कॅल्शियम वाढण्यास मदत होते.
४) दूध हे कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत दुधामधून आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळते. म्हणून आपल्या रोजच्या आहारात दूध, तूप, लोणी यांचा समावेश तुम्ही जरूर केला पाहिजे.
५) मेथीदाण्याचे लाडूंमध्ये दिनकर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तुम्ही हे लाडू महिनाभर घेतले तर शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघायला मदत होते. मेथी आणि इतर ड्रायफ्रूट गरम असल्यामुळे तुम्ही हे लाडू थंडीच्या दिवसांमध्ये घेणे फायद्याचे ठरते.
६) काळे तीळ हे सुद्धा कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. पाव चमचा काळे तीळ तुम्ही गुळा सोबत चाऊन खाऊ शकता.
७) आपल्या हेल्थ आणि आवडीनुसार कोणताही व्यायाम आपण रोज किमान अर्धा तास जरूर केला पाहिजे. कारण व्यायामामुळे आपले हाडे बळकट, मजबूत होत असतात. म्हणून चालणे, सूर्यनमस्कार, योगासन, स्ट्रेचिंग यातील कोणताही व्यायाम तुम्ही नियमितपणे जरूर केला पाहिजे.
समारोप –
आज या पोस्टमध्ये आपण सुरुवातीला कॅल्शियम म्हणजे काय ते बघितले मग कॅल्शियम बद्दल बरेच काही जाणून घेतले आणि शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी करता येतील असे घरगुती उपाय बघितले. तुम्ही पण आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा आणि अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!