आपला असा समज असतो की, जंत हे लहान मुलांनाच जास्त होतात मोठ्यांना होत नाहीत. पण असं नाही वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तींनाही जंत होऊ शकतात. आपल्या पोटात जंत झाले आहेत का ते आपण कसे ओळखावे. तर आज या लेखांमधून आपण पोटात जंत झाल्यावर दिसणारी लक्षणे कोणती असतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत.
आयुर्वेदामध्ये जंताला ‘ कृमी ‘ असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये पोटात जंत झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. पोटात जंत होणे हे जरी सामान्य वाटत असले तरी अनेक दुसऱ्या आजार त्यामुळे होऊ शकतात. मग आपण त्या आजारांवर उपचार करून घेतो. पण मूळ कारण तसंच राहून जातं. आणि मग अनेक समस्या आपल्याला बघायला मिळतात.
जर तुम्हालाही जंत झाल्यावर दिसून येणारी लक्षणे माहित करून घ्यायची असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप useful करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण बघूया पोटात जंत झाल्यावर दिसणारी लक्षणे –
पोटात जंत झाल्यावर दिसणारी लक्षणे –
→ पोटात जंत झाल्यावर दिसणारं सामान्य लक्षण म्हणजे शी करण्याच्या जागेवर खाज येणे. मुख्यतः हि खाज रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात होते.
→ वारंवार होणारी पोटदुखी हे पोटात जंत असण्याचं लक्षण असू शकतं. लहान मुलांचं पोट दुखत असेल, तेव्हा आपण गॅस, पित्त झालं असेल असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याची गोळी देतो. त्यामध्ये तेवढ्यापुरता आराम मिळतो. पण जर वारंवार हा त्रास जर बघायला मिळत असेल, तर हे पोटात जंत असण्याचं लक्षण असू शकतं.
→ यासोबत दिसणारे कॉमन लक्षण म्हणजे, चेहऱ्यावर पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे चट्टे दिसायला लागतात. तसेच चेहरा कोरडा आणि निस्तेज दिसायला लागतो. खरं तर लहान मुलांच्या चेहरा तेजस्वी असा दिसायला हवा. पण जर तो कोरडा, निस्तेज, रूक्ष दिसत असेल, तर त्याचे कारण त्यांच्या पोटात असलेले जंत हे असू शकते. आणि हे फक्त लहान मुलांच्या बाबतीत दिसते असं नाही मोठ्यांच्याही पोटात जंत झाले असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर अशी लक्षणे दिसू शकतात.
→ आयुर्वेदामध्ये ताप येणे हे सुद्धा जंत असण्याच एक लक्षण असू शकत असं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला अधून मधून ताप येत असेल आणि टेस्ट केल्यावर मलेरिया, डेंगू नसेल तर तुम्हाला जंतांचे इन्फेक्शन असण्याची दाट शक्यता आहे.
→ जर व्यवस्थित आणि पोषण युक्त आहार घेऊन पण जर तुमची तब्येत सुधारत नसेल आणि वजन अजून कमी होत चालले असेल, तर हे पोटात जंत असण्याचे लक्षण असू शकतं.
→ उत्साह न वाटणे, आळस येणे, सारख्या जांभळ्या येणे हे पोटात जंत असण्याचं लक्षण असू शकतं.
→ छातीमध्ये टोचल्यासारखे वाटणे किंवा दुखणे. आणि त्याचं कुठलंही निदान न होणे तरी छातीत वारंवार दुखत असेल तर हे सुद्धा पोटात जंत असल्याचं लक्षण असू शकत.
→ जेवण समोर आल्यावर ते खाण्याची इच्छा न होणे, अन्नाबद्दल तितकारा वाटणे हे सुद्धा जंत असलेल्या लहान मुलांमध्ये बघितलं गेलं आहे.
→ तोंडाला पाणी सुटणे, मळमळ होणे, उलटी होणे हे सुद्धा जंत असण्याचे लक्षण असू शकत. इतर कोणत्याही आजार शिवाय जर उलटी मळमळ होत असेल तर त्या व्यक्तीला जंतांच इन्फेक्शन असू शकतं.
→ नियमितपणे जुलाबाचा त्रास होणे हे सुद्धा जंतांच लक्षण असू शकत असं आयुर्वेद सांगते.
→ शरीरातील रक्त कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे हे सुद्धा पोटात जंत असल्याचं एक लक्षण असू शकतं.
वर आपण पोटात जंत असल्यावर दिसणारी लक्षणे बघितली. यातली काही लक्षणे तुम्हाला दिसत असतील, म्हणजे तुमच्या पोटात जंत आहेत असं नाही. तर वर सांगितलेले त्रास तुम्हाला वारंवार होत असतील आणि तेवढ्यापुरते उपचार घेऊन बसत असतील आणि पुन्हा तो त्रास होत असेल तर तुम्हाला जंतांच इन्फेक्शन झालेलं असू शकत.
जंतांवर उपचार कसे करावेत ?
⇒ जंतांवर वर उपचार करून घेताना आपण अनेकदा जंतांची गोळी किंवा एखादं औषध घेतो. ज्यामुळे पोटात असलेले जंत बाहेर निघून जातात.
⇒ पण तेवढाच इलाज न करता जंतांचा समूळ नाश करणे गरजेचे असते. जेणेकरून जंतांचा त्रास आपल्याला परत होणार नाही.
⇒ म्हणून जंतांवर उपचार करताना चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून योग्य चिकित्सा करून घेतली पाहिजे.
समारोप –
आपल्या पोटात जंत झाल्यावर दिसणारी लक्षणे आज आपण बघितली. जर तुम्हाला पण अशी लक्षणे दिसत असतील किंवा काही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून उपचार करून घेतले पाहिजेत. मला आशा आहे की तुम्हाला या लेखामध्ये जंतांच्या लक्षणांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली असेल. अधिक आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!