ब्रेस्ट कॅन्सरची कारणे आणि लक्षणे | Causes And Symptoms Of Breast Cancer In Marathi

भारतातल्या महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. हा पाश्चात्य  देशांमध्ये खूप common आहे, पण आता आपल्याकडेही याचे प्रमाण खूप वाढले आहे. साधारणतः Breast Cancer वयाच्या 35 ते 40 शी नंतर होतो.  ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे ओळखून जर सुरुवातीलाच उपचार करून घेतले तर तो पूर्णपणे बरा होतो. या लेखामधून आपण ब्रेस्ट कॅन्सरची कारणे आणि लक्षणे कोणती असतात याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या देशात हा कॅन्सर वाढण्याची भरपूर कारणे आहेत ती आपण सुरुवातीला बघू.

ब्रेस्ट कॅन्सरची कारणे
आणि लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे –

⇒  पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. पुरुषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर दिसून येतो पण याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत खूप कमी असते.

⇒ आज जर आपण बघितलं तर आधीच्या तुलनेने भारतीय महिलांची जीवनशैली खूप बदलली आहे. हे ब्रेस्ट कॅन्सरचं कारण असू शकतं. त्यांना कामाचा ताण खूप जास्त असतो.  घर आणि जॉब दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत.

⇒  आज-काल शिक्षण, करियर यामुळे मुलींचे लग्नाचे वय वाढले आहे आणि फॅमिली प्लॅनिंग ही त्या उशिरा करतात. तर उशिरा लग्न आणि जास्त वयात मूल होणं हे देखील ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचं कारण असू शकतं.

⇒  अनेक वेळा  बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान केले जात नाही. ज्या स्त्रिया स्तनपान करत नाही किंवा खूप कमी प्रमाणात करतात. त्यांना पण ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो.

⇒  जर तुम्ही ताजे, पौष्टिक अन्न घेत नसाल. तसेच processed food जास्त प्रमाणात घेत असाल, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात preservatives असतात. हे पण ब्रेस्ट कॅन्सरचे कारण बनू शकतं.

⇒  आपल्या जीवनात व्यायामाचा अभाव असेल तर तेही प्रेस कॅन्सरच्या कारण बनू शकते.

⇒  वर आपण जी कारण बघितली, ती टाळून आपण कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करू शकतो. पण जे आपण बदलू शकत नाही ते कारण म्हणजे Genetic Factor. जो आपल्या family मध्ये आई बहीण किंवा मावशीला असेल तर तो आपल्यालाही होण्याचे खूप जास्त chances असतात. अशा स्थितीमध्ये वयाच्या तिशीनंतर तुम्हाला preventive test, check up करून घेणे जरुरी असते. जेणेकरून आपण तो सुरुवातीलाच ओळखून दूर करू शकतो.

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे आपण बघितले आता आपण ब्रेस्ट कॅन्सर होण्याची लक्षणे कोणती असतात ते बघू ‌‌.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे –

⇒  जेव्हा बेस्ट कॅन्सर ची आपल्या शरीरात सुरुवात होते, तेव्हा आपल्याला काहीच फील होत नाही. तरी स्तनांमध्ये येणारी गाठ हे ब्रेस्ट कॅन्सरचं महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण असू शकतं.

⇒  तुमच्या स्थानांमध्ये टणक गाठ असेल ती हलत नसेल, तर ते breast cancer चे लक्षण असू शकते. अनेकदा या गाठी दुखत नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

⇒  स्तन आतल्या बाजूला ओढले जाणे आणि स्तनांचा आकार बदलणे हे देखील ब्रेस्ट कॅन्सरच एक लक्षण असू शकत.

⇒  स्तनांमधून स्त्राव येणे, कधी तो सफेद, कधी लाल तर कधी हिरवा स्त्राव स्तनांमधून येतो. जर असे होत असेल तर तुम्हाला जागरूक राहिलं पाहिजे.

⇒  स्तनांच्या त्वचेचा कलर बदलणे, ते संत्र्याच्या सालीसारखी दिसायला लागले खडबडीत होणे आणि रॅशेस सारखं येणे.

⇒ काखेमध्ये गाठ होणे.

⇒  स्तनांमध्ये जखम होणे.

आजाराच्या सुरुवातीला जर त्याचे निदान करून उपचार केले तर तेच कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि जर हेच उशिरा लक्षात आलं उपचाराला वेळ झाला तर मात्र आजार पूर्णपणे बरे होणे कठीण होते.

समारोप –

तर आज आपण या लेखांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची कारणे आणि लक्षणे कोणती असू शकतात याबद्दल माहिती बघितली. जर तुम्हालाही काही लक्षणे आढळून येत असतील तर त्यात काय टेस्ट करून घ्या. आणि अन्य आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या ‌

लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top