पावसाळ्यात कोणती फळे येतात | Which Fruits Available In Rainy Season

मित्रांनो, पावसाळा आता सुरू झाला आहे. या काळात पावसामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. या काळामध्ये आपली पचनक्रिया मंदावलेली असते. दूषित पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याचा धोका अनेक पटीने वाढलेला असतो. फळ खायला सर्वांना आवडतात. अनेकदा आजारी असल्यावर डॉक्टरकडूनही फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. विटामिन आणि मिनरल्स मिळत असतात. म्हणून आपल्या रोजच्या डायट मध्ये सिजनल फळांचा समावेश आपण जरूर केला पाहिजे. या लेखामध्ये आपण पावसाळ्यात कोणती फळे येतात हे जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात कोणती फळे येतात

पावसाळ्यात कोणती फळे येतात –

पावसाळ्यात आपल्याकडे काही विशेष फळे येत असतात. त्यांचे सेवन आपण आपल्या आहारात आवर्जून केले पाहिजे. आहाराकडे लक्ष दिले तर वारंवार आजारी पडण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. चला तर मग बघूया आपल्याकडे पावसाळ्यात कोणती फळे येतात ते.

१. जांभूळ –

जांभूळ हे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्येच मिळत असते, बाकी दिवसांमध्ये हे फळ मिळत नाही. जांभूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे असते. यामध्ये पोटॅशियम आयरन फॉरेन आणि विटामिन चे प्रमाण भरपूर असते. पावसाळ्याच्या दिवसात तांदळाचे सेवन केल्याने पोटदुखी इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो. डायबिटीस आणि कर्करोगामध्ये हे फळ खाणे फायद्याचे ठरते

२. नासपती (Pears) –

दिसायला थोडा थोडे पेरू सारखे दिसणारे हे फळ खूप गोड आणि मधुर असते. हे फायबर ने भरपूर असते. त्यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडंट ही भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यामध्येही हे फळ उपयुक्त ठरते. नासपतीचे सेवन केल्याने मधुमेह, हायपर टेन्शन तसेच हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

३. डाळिंब (Pomegranate) –

डाळिंब हे बाराही महिने आपल्याला बाजारात मिळत असतात. पण पावसाळ्यात हे फळ आपण आवर्जून खाल्लं पाहिजे. फायबर आणि विटामिन सी भरपूर असलेल्या डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आपले अनेक आजारांपासून रक्षण होत असते.

४. आलूबुखार (Plum) –

आलू बुखार ला इंग्लिश मध्ये Plum असे म्हणतात. हे फळ चवीला आंबट असते. हाडांच्या मजबुतीसाठी तसेच रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्या मध्ये हे मदत करते. पावसाळ्यात पोटा संबंधित अनेक आजार होत असतात. आलू बुखारचे नियमितपणे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट मुळे आजारी पडण्यापासून आपले रक्षण होते. त्वचा चांगली ठेवण्यामध्येही हे फळ मदत करते.

५. चेरी (Cherry) –

चेरी हे आकारामध्ये खूप लहान आणि चवीला आंबट गोड असणारे फळ आहे. यामध्ये विटामिन ए बी सी बी केरोटीन कॅल्शियम आयरन आणि पोटॅशियम असते. विटामिन सीने भरपूर असलेल्या या फळाचे नियमित सेवन केल्याने इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो. चेरी मुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहण्यात हे मदत करते. चेरीच्या सेवनाने स्मरणशक्ती सुधारण्यातही मदत होते.

६. पीच (Peech) –

हे फळही आलू बुकाराच्या आकारा इतकेच असते. पण रंग आणि चवीमध्ये हे वेगळे असते. याचा रंग पिवळसर ऑरेंज सारखा असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे फळ तुम्हाला सर्वच फळ विक्रेत्यांकडे दिसत असते. हे विटामिन्स आणि मिनरल्स ने भरपूर असते. पीच या फळाची चव थोडीशी गोडसर अशी असते. पचनशक्ती वाढवण्याचे तसेच ऍलर्जी कमी करण्याचे काम हे फळ करते. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारणांमध्ये ही मदत करते.

७. लीची (Lichi) –

लिची हे जाड साल असलेले फळ आहे. ही साल काढून आतील पारदर्शक गर खायचा असतो. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. आरोग्य सुधारण्यासोबतच लिची रक्त वाढवण्यासाठी ही मदत करते.

समारोप –

तर आज आपण पावसाळ्यात कोणती फळे येतात ते बघितले. तर तुम्ही या पावसाळ्यात बाहेरचे पाच प्रकार ऐवजी भरपूर फळे खा आणि स्वस्थ रहा. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top